दिवस सातवा, बळीराजाचा संप सुरुच
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
सांगलीचे शेतकरी विजय जाधव यांचं पुणतांबामध्ये आमरण उपोषण, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर उपोषणाला सुरुवात
सांगलीचे शेतकरी विजय जाधव यांचं पुणतांबामध्ये आमरण उपोषण, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर उपोषणाला सुरुवात
अहमदनगर : शेतकरी संपाची धग सातव्या दिवशी कायम, राहाता तालुक्यातील लोणी येथील आजचा आठवडे बाजार आणि बैल बाजार बंद, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील आठवडी बाजारही बंद
अहमदनगर : शेतकरी संपाची धग सातव्या दिवशी कायम, राहाता तालुक्यातील लोणी येथील आजचा आठवडे बाजार आणि बैल बाजार बंद, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील आठवडी बाजारही बंद
सोलापूर : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वतः संपर्क कार्यालयाला टाळ लावून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. बार्शीतील त्यांचं निवासस्थान हेच त्यांचं संपर्क कार्यालय आहे.
सोलापूर : शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी बांधणारे शेतकरी जन आंदोलन समितीचे 10 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
वर्धा : आर्वीमध्ये कडकडीत बंद, आर्वी, वर्धा, अमरावती, तळेगाव पुलगाव मार्गावर टायर जाळले. शहरातील बाजारपेठ, दुकानं बंद ठेवून संपाला पाठिंबा. प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांचा नेतृत्त्वात मोर्चा
वर्धा : आर्वीमध्ये कडकडीत बंद, आर्वी, वर्धा, अमरावती, तळेगाव पुलगाव मार्गावर टायर जाळले. शहरातील बाजारपेठ, दुकानं बंद ठेवून संपाला पाठिंबा. प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांचा नेतृत्त्वात मोर्चा
नंदुरबार : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकरी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार इथे खासदार हीना गावित, आमदार विजयकुमार गावित, काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती.

अहमदनगर : आमदार आणि खासदारांच्या घराला टाळं ठोकण्याचा शेतकरी संघटनांचा इशारा, भाजप खासदार दिलीप गांधीसह लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त
वर्धा : इंझाळा येथील चौरस्त्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन, भाजीपाला, दूध फेकत रास्तारोको, आंदोलनात इंझाळा, विजयगोपालसह आसपासच्या शेतकऱ्यांचा सहभाग, रास्तारोकोमुळे पुलगाव-यवतमाळ मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
वर्धा : इंझाळा येथील चौरस्त्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन, भाजीपाला, दूध फेकत रास्तारोको, आंदोलनात इंझाळा, विजयगोपालसह आसपासच्या शेतकऱ्यांचा सहभाग, रास्तारोकोमुळे पुलगाव-यवतमाळ मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
वर्धा : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच, आर्वी पुलगाव मार्गावरील विरुळ येथे शेतकरी संघटनेचे गजानन निकम यांच्या नेतृत्त्वात शेतकरी संघटनेचा रास्तारोकोसह ठिय्या आंदोलन, रस्तारोको करत वाहनं अडवली, संपूर्ण कर्जमाफी सरकारचा निषेध करत घोषणा, पोलिसांनी 60 ते 70 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी भाजीपाला 1533 क्विंटल, फळं 918 क्विंटल, कांदा-बटाटा 5397 क्विंटलची आवक
नाशिक मार्केटमध्ये भाज्यांचे दर
कोथिंबिर - आज 30 ते 40 रुपये जुडी, काल 80 ते 100 रुपये जुडी
मेथी जुडी - आवक नाही
टोमॅटो - आज 20 ते 30 रुपये किलो, काल 60 रुपये
भेंडी - आज 30 रुपये किलो, काल 50 रुपये किलो
भेंडी - आज 30 रुपये किलो, काल 50 रुपये किलो
बटाटे - आज 30 रुपये किलो, काल 10 रुपये किलो
वांगी - आज 25 रुपये किलो, काल 50 रुपये किलो
फ्लॉवर - आज 10 ते 20 रुपये किलो, काल 50 रुपये
नाशिक : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी भाज्यांची आवक वाढली. त्यामुळे
कडाडलेले भाव पुन्हा पूर्वपदावर आले आहेत.
कडाडलेले भाव पुन्हा पूर्वपदावर आले आहेत.
कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी भाजीपाला 1533 क्विंटल, फळं 918 क्विंटल, कांदा-बटाटा 5397 क्विंटलची आवक
दादर मार्केटमध्ये आजचे भाज्यांचे भाव
दुधी भोपळा - काल 70 रुपये किलो, आज 30 रुपये किलो
गवार - काल 55 रुपये किलो आज 40 रुपये किलो
मिरची काल - 60 रुपये किलो, आज 60 रुपये किलो
कोथिंबीर - काल 150 रुपये जुडी, आज 10 रुपये जुडी
कोथिंबीर - काल 150 रुपये जुडी, आज 10 रुपये जुडी
भेंडी - 40 रुपये किलो, आज 30 रुपये किलो
टोमॅटो - काल 40 रुपये किलो, आज 30 रुपये किलो
फुलकोबी - काल 60 रु किलो, आज 30 रुपये किलो
शिमला मिरची - काल 60 रुपये किलो आज 50 रुपये किलो
काकडी - काल 50 रुपये किलो, आज 30 किलो
महाराष्ट्रात आज आंदोलनात काय होणार?
पुणतांबा : मौन आंदोलन होणार, सुकाणू समितीची बैठक होणार
पुणे : पिंपरी-मेंढारे गावाला खासदार राजू शेट्टी भेट देणार
धुळे : संपाला पाठिंबा देण्यासाठी तापी नदीपात्रात आंदोलन
जळगाव : संपाला समर्थन देण्यासाठी मुंडण आंदोलन
जालना : तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचं धरणं आंदोलन
वर्धा : आर्वीमध्ये प्रहार सोशल फोरमच्या वतीने बंदची हाक
चंद्रपूर : शहरात सर्वपक्षीय बंदची हाक
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे 888 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे. नेहमीपेक्षा 70 टक्के भाजीपाला आज बाजार समितीत दाखल झाला आहे.
नवी मुंबई - वाशी एपीएमसीमध्ये 588 गाड्यांची आवक झाली आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला एपीएमसीत दाखल झाला आहे. भाजीपाला आवक पहिल्यासारखी सुरळीत आहे. कांद्याच्या 118 तर बटाट्याच्या 51 गाड्यांची आवक झाली आहे.

नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळत आहे.
सांगली : शिवाजी मंडईतील भाज्यांचा लिलाव बाजार उधळून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या 10 कार्यकर्त्यांना आज विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केलं आहे. शिवाजी मंडईत पहाटे भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर लिलाव होतो. हा लिलाव बाजारच उधळून लावण्याचा काही कार्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर मंडई भागात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आज शेतकऱ्यांच्या संपात आमदार, खासदारच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा दिवस असल्याने, खबरदारी म्हणूनही या 10 कार्यकर्त्यांना पोलिसानी पहाटेच ताब्यात घेतलं.
पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -