राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 08 Feb 2019 11:57 PM
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. देशात वायुसेना दुबळी करण्याची काँग्रेसची इच्छा, लोकसभेतील भाषणात मोदींचा काँग्रेसवर घणाघात, मोदींच्या आरोपांवर राहुल गांधींचंही प्रत्युत्तर2. राज्यातील मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात, 4 हजार पदांसाठी...More
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. देशात वायुसेना दुबळी करण्याची काँग्रेसची इच्छा, लोकसभेतील भाषणात मोदींचा काँग्रेसवर घणाघात, मोदींच्या आरोपांवर राहुल गांधींचंही प्रत्युत्तर2. राज्यातील मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात, 4 हजार पदांसाठी तब्बल साडेसात लाख अर्जदारांची नोंदणी, एका पदासाठी 178 अर्जदारांमध्ये स्पर्धा3. बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून काल नऊ तास मॅरेथॉन चौकशी, उद्या पुन्हा चौकशीची शक्यता4. दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार तुफान पावसासह गारपीट, रस्त्यांवर बर्फाची चादर, पारा आणखी घसरला5. भारत-न्यूझीलंडदरम्यान आज दुसरा टी-20 सामना, मालिकेतलं आव्हान राखण्यासाठी विजय आवश्यक
रविवारी मध्य रेल्वेच्या कल्याण-टिटवाळा दरम्यान दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत. मनमाड येथून सुटणारी राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेस तसेच जनशताब्दी एक्सप्रेस आणि भुसावळ-मुंबई पेसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या असून नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी नाशिक पर्यंत जाऊन तेथून पुन्हा नागपूरकडे जाणार असल्याचे मध्य रेल्वे कडून कळविण्यात आले आहे.
धारावी सायन रोडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, आग विझविण्याचे काम सुरु