LIVE BLOG : भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Aug 2019 10:40 PM
श्रीरामपूरचे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा विधानसभा सदस्याचा राजीनामा, शिवसेनेत करणार प्रवेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, 4 गुन्हेगारांकडून तब्बल 7 पिस्तूल, 2 गावठी कट्टे आणि 20 जिवंत काडतुसे पोलिसांनी केली हस्तगत, नाशिकमधून तीन तर औरंगाबादहून एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल,

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री होते भगत सिंह कोश्यारी
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षांची शिक्षा, तर सुरेश जैन यांना सात वर्षांचा कारावास, 100 कोटींचा दंड

सोलापूर :

कोरड्या नदी पात्रात गाडून घेऊन दोन शेतकऱ्याचे आंदोलन, 


बार्शीतल्या सासुरे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याचे काम सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, 


जलसंधारण विभागाकडून  कागदपत्रे गहाळ झाल्याने 2017 पासून काम रखडले आहे काम

31 व्या पुणे फेस्टिव्हलचे 6 सप्टेंबरला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन, उद्योगपती राहुल बजाज व अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव देऊन गौरविण्यात येणार
औरंगाबाद जोरदार पावसाला सुरुवात, महिनाभराच्या खंडानंतर जोरदार पाऊस, काल रात्री आणि गेल्या अर्धा तासापासून पावसाची जोरदार हजेरी
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढावी अशी सर्वांची इच्छा आहे, नवीन पिढी राजकारणात यायला हवी असं आमचं सर्वांचं मत आहे, आदित्या ठाकरेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय, संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे : संजय राऊत
सांगली : पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा, राजू शेट्टी, विश्वजित कदम, विशाल पाटील, काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये कालपासून पावसाचं कमबॅक, मुंबई पूर्व उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरु
सोलापूर : अमित शहांची सभा उधळवून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा, चुनाभट्टी परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध म्हणून विरोध, राज्यातील दलित सुरक्षित नाहीत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री सभा घेत फिरत आहे, भीम आर्मीचा आरोप
जळगाव घरकुल घोटाळा, गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपी दोषी, 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश, लवकरच शिक्षेचा स्वरुप कळणार
सातारा : कोयणा धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, पावसाचा जोर वाढल्यामुळे दरवाजे उघडण्याचा निर्णय, कोयणा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
धुळे : शिरपूर तालुक्यातील वाघाडीजवळील केमिकल फॅक्टरीत स्फोट, सात जणांचा मृत्यू, स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात हादरे, घटनास्थळी अग्निशमनच्या चार गाड्या दाखल


नागपुरातील पाणीकपात रद्द, 15 जुलै 1 दिवसआड सुरु होता पाणीपुरवठा, 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरदरम्यान पाणीकपात मागे, समाधानकारक पाऊस झाल्याने निर्णय
मुंबई आणि उपनगरांतही पावसाची हजेरी, 15 दिवसांच्या ब्रेकनंतर नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची संततधार, गणेशोत्सवाच्या काळात पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटलांच्या पक्षांतरावरील प्रश्नावर शरद पवार संतापले, राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध, पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल

2. नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं भवितव्य अधांतरित, विलिनीकरणाचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच, एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

3. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आज शेवटची तारीख, सोशल मीडियावरील वाढीव तारखेचा दावा केवळ अफवा, आयकर विभागाची माहिती

4. जीडीपी 5 टक्क्यांवर आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दरात मोठी घसरण, 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार

5. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना पाकिस्तानी मंत्र्याला विजेचा शॉक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय़रल, नेटकऱ्यांचे तुफान कमेंट्स

6. नाशिकमध्ये बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचं विघ्न, शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण, 16 हजार खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.