LIVE UPDATE | अमित शाह यांच्या सोलापूरातील दोऱ्यात तीन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Aug 2019 11:15 PM
आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतूच लढणार, अनिल परबांनी केली वरळीच्या शिवसैनिकांमध्ये घोषणा, वरळीच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात केली घोषणा, शिवसैनिकांना दिले तयारीला लागण्याचे आदेश
मुंबई : ‘चौकीदार चोर है, चोरों के सरदार है’, या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, तीन ऑक्टोबरला दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी, भाजप कार्यकर्त्याकडून राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा अनिश्चितता, शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सोलापूरातील दोऱ्यात तीन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, उदयनराजे भोसले अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय घेणार, तर रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर
मुंबई : लोकल ट्रेन बफरला धडकली, सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉम 3 वरील घटना, सुदैवाने कोणतीही हानी नाही.
मुंबई : लोकल ट्रेन बफरला धडकली, सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉम 3 वरील घटना, सुदैवाने कोणतीही हानी नाही.
राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत, गृहखात्याचं काम दुर्दैवी आहे, जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा : खासदार सुप्रिया सुळे
पालघर : सदानंद आश्रमावर कारवाई करताना दुर्घटना, धर्मशाळेचा वरचा भाग पोकलेनवर कोसळला, चालक जखमी
पालघर : सदानंद आश्रमावर कारवाई करताना दुर्घटना, धर्मशाळेचा वरचा भाग पोकलेनवर कोसळला, चालक जखमी
कोल्हापूर : इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार,

नगरपालिकेतील गटनेत्यासह पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर प्रवेश होणार
मुंबई : चेंबूरमधील बलात्कार प्रकरणात पोलिस यंत्रणेचं दुर्लक्ष, सरकारने हा विषय गंभीरपणे घ्यावा, चौकशीसाठी एसआयटीची नेमणुक करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी : नवाब मलिक
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर शिवसेनेच्या संपर्कात, भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा, मात्र उदयनराजेंचा निर्णय झाल्याशिवाय रामराजे आपला निर्णय जाहीर करणार नसल्याची माहिती
ठाणे : चितळसर मानपाडा पोलिस हद्दीत काल रात्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीनेच केला अत्याचार, पोलिसांकडून आरोपीला अटक
ठाणे : चितळसर मानपाडा पोलिस हद्दीत काल रात्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीनेच केला अत्याचार, पोलिसांकडून आरोपीला अटक
कोल्हापूर : कडकनाथप्रकरणी महारयतचे संचालक सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल, 3 कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
फोंडाघाटात कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांब रांगा, तळकोकणात येणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या गाड्या अडकल्या
कोर्टाच्या आवारात सरकारी वकिलाला लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक भागाची मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात कारवाई

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील मेगाभरतीचा मुहूर्त ठरला, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश, हर्षवर्धन, उदयनराजे, रामराजे, राणा, महाडिक, गोरेंचा समावेश

2. खासदार नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार, राणेंची एबीपी माझाला माहिती, दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश करणार

3. पाकिस्तानचा भारतात हिंसा घडवण्याचा डाव, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या गझनवी क्षेपणास्त्राचीही पाककडून चाचपणी

4. फ्लॅट धारक आता इमारतीच्या जमिनीचे मालक होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जमिनीच्या सातबाराचे मालकीहक्क फ्लॅट धारकांना मिळणार

5. मुंबईतल्या पाच मोठ्या रस्त्यांवर महापालिकेकडून पार्किंग बंदी, चर्चगेटसह दादरमधील मार्गांचा समावेश, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी

6. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, 15 सदस्यीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला स्थान नाही

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.