LIVE BLOG : जगजितसिंह, गोरे आणि महाडिकांच्या हातात कमळ
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Sep 2019 08:04 PM
राणा जगजितसिंह पाटील, पद्मसिंह पाटील, जयकुमार गोरे आणि धनंजय महाडिक यांच्या हाती भाजपचा झेंडा,
गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
भर पावसात अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची रॅली सुरु
13 सप्टेंबरला राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होणार,
जालन्यातील कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांची माहिती
अमित शाह यांचं सोलापुरात आगमन
अमित शाह यांचे सोलापुरात आगमन, सोबत चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार, महाजनादेश यात्रा आणि अमित शाहांच्या सभेवर सावट
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा चार तारखेला कार्यकर्ता मेळावा,
विधानसभेबाबत पुढची दिशा ठरविण्यासाठी बोलावला मेळावा,
जनतेला विचारून घेणार पुढची राजकीय दिशा
अमित शाह यांचे सोलापुरात आगमन,
महाजनादेश यात्रा सोलापुरात येईपर्यंत अमित शाह शासकीय विश्रामगृहात थांबणार, सात वाजता महाजनादेश यात्रा तुळजापूरमार्गे सोलापूरात दाखल होईल,
सोलापूरतल्या संभाजी चौकातून अमित शाह जनादेशयात्रात सहभागी होतील
, संभाजी चौक-शिवाजी चौक-सरस्वती चौक-पार्क चौक असा महाजनादेश यात्रेचा मार्ग असेल,
पार्क चौकातल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे
सात सप्टेंबरला पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर,
सकाळी 11 वाजता मुंबईत, दोन वाजता औरंगाबाद, संध्याकाळी पाच वाजता नागपुरात मेट्रोचे कार्यक्रम तर औरंगाबादेत महिला बचत गटाच्या कार्यक्रमात होणार सहभागी,
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांची उद्घाटनं आणि लोकहिताच्या कामांचा धडाका
महाजनादेश यात्रेच्या समारोपात फक्त 3 नेत्यांचा भाजप प्रवेश होणार, सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते संपर्कात मात्र त्यांचा प्रवेश आज होणार नाही, सहकरमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती, धनंजय महाडिक, जयकुमार गोरे, रणाजगजितसिंह पाटील यांचा प्रवेश आज होणार
सोलापूर : सोलापुरात महाजनादेश यात्रेआधी पुन्हा बॅनर नाट्य सुरु, महापालिकेने कारवाई केल्यानंतर पुन्हा लावलेले बॅनर पालिकेने काढले, संबंधितांवर पोलीसात गुन्हा दाखल
भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाही, खडसेंचं विधान, भ्रष्टाचाराचे आरोप धुन्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर, खडसेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरला उलटला, मुंबईकडे जाताना खंडाळा बोगद्याजवळ अपघात, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती, राष्ट्रपती भवनाकडून राज्यपाल नियुक्त्या जाहीर
मुंबई : मालाड पश्चिमेला असणाऱ्या मालवणी भागातील चाळीत सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर चार जण जखमी, जखमींवर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु
कोल्हापूर : आई शपथ घेऊन सांगतो कडकनाथ प्रकरणाशी माझा संबंध नाही, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया, माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, आरोप सिद्ध झाले तर मी कायमच राजकारण सोडून देईन : सदाभाऊ खोत
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली, अमृतांजन पुलाजवळ वाहतूक धीम्या गतीने सुरु, गणेशोत्सवानिमित्त मुंबईकर गावी निघाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा
सोलापूर : अमित शाह यांच्या सभा उधळण्याचा इशारा देणाऱ्या भीम आर्मीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी रात्री 2 वाजता ताब्यात घेतलं, सोलापुरातील भीम आर्मीचे 7 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात तर NSUI चे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे पोलिसांच्या ताब्यात
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव- महाड मधील लोणेरेजवळ एसटी बसला आग, सकाळची घटना, परेलहून-सावर्डेकडे निघाली होती बस, 60 प्रवासी थोडक्यात बचावले, मात्र सर्व सामान जळून खाक, अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी
मुंबई : भांडुप आणि कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे,
ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या, वाहतूक धीम्या मार्गावर वळवली
मुंबईत साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं, महिन्याभरात लेप्टोचे तीन बळी, स्वाईन फ्लुनेही घेतला एकाचा जीव
सातारा : कोयना धरणाचे दरवाजे अडीच फूट उघडले, कोयना महाबळेश्वर परिसरात पाऊसाची रिप रिप सुरुच, कोयणा धरणातून 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात
गणेशोत्सवनिमित्त मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी, पेण-माणगाव दरम्यान 2 ते 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. उदयनराजेंचा भाजपप्रवेश निश्चित, चंद्रकांतदादांची माहिती, पद्मसिंह आणि राणा पाटील यांची राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा
2. हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची, अनिल परबांच्या घोषणेनंतर वरळीत आदित्य ठाकरेंचे होर्डिंग्ज
3. घरकुल घोटाळ्याचा निर्णयामुळे छगन भुजबळाच्या शिवसेना प्रवेशाला ब्रेक लागण्याची शक्यता, सुरेश जैन यांच्या शिक्षेनंतर शिवसेनेची सावध भूमिका
4. धुळे वाघाडी स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीशेजारील गावं रिकामी
5. युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानची अटी-शर्थींवर चर्चेची तयारी, भारतात पाकिस्तानसोबत चर्चेचं वातावरण नसल्याचं पाकिस्तानच्य़ा परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य
6. जसप्रित बुमराच्या भेदक माऱ्यासमोर विंडिजचा डाव ग़डगडला, दुसऱ्यादिवस अखेर विंडिज 87 वर 7 बाद, तर भारताच्या 416 धावा