आज दिवसभरात... 2 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 02 Jan 2019 10:44 PM

पार्श्वभूमी
शेतात आणि हॉटेलमध्येही शेकोटी लातूरमध्ये शेकोटी पेटवून हॉटेलचा कारभार सुरु आहे. एरव्ही दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा प्रकोप सुरु आहे.ग्राहक टिकवण्यासाठी हॉटेल मालकांनी लातुरात कधी लढवली नव्हती...More
शेतात आणि हॉटेलमध्येही शेकोटी लातूरमध्ये शेकोटी पेटवून हॉटेलचा कारभार सुरु आहे. एरव्ही दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा प्रकोप सुरु आहे.ग्राहक टिकवण्यासाठी हॉटेल मालकांनी लातुरात कधी लढवली नव्हती तशी शक्कल लढवली आहे. लातूरमधील अजय ठक्कर यांच्या अरोमा हॉटेलच्या प्रांगणात असलेल्या गार्डनमध्ये संध्याकाळी सहा वाजले की ग्राहकांसाठी प्रत्येक टेबलजवळ एक शेकोटी पेटवली जाते. त्या पेटवलेल्या शेकोटीमध्ये लाकडे टाकून त्यावर दर मिनिटाला रॉकेलचा शिडकावा करुन हॉटेलचे वेटर शेकोटीला जाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. रात्री उशिरापर्यंत या हॉटेलमधले चित्र असतं.
कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षक सचिन पाटील निलंबित ; आरोपी संतोष पोळला मोबाईल पुरवल्याचा आरोप