- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : सांगली : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
LIVE BLOG : सांगली : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
24 Mar 2019 11:09 PM
जर 56 इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही? : शरद पवार
#BREAKING नाशिक : आचारसंहिता भंगाचा नाशिक शहरात पहिला गुन्हा दाखल, नाशिक महापालिकेच्या फुलेनगरच्या शाळेतील मुख्याध्यापिकेविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमचे कपडे उतरवणारा जन्माला आला नाही, राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा टोला
#BREAKING पुण्याच्या आंबेगावमधील साकोरे येथे श्रुतिका थिटे या पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला, श्रुतिकाचा उपचारापूर्वी मृत्यू
सांगली : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
दिल्ली : दिल्लीच्या ट्रामा सेंटरच्या ऑपरेशन थिएटरला आग, घटनास्थळी अग्निशमनच्या सहा गाड्या दाखल
औरंगाबाद :- आमदार अब्दुल सत्तार यांना औरंगाबाद लोकसभा लढवायची असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढवावी, त्यांनी बंडखोरी करण्याची गरज नाही. औरंगाबाद लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झाबंड यांची प्रतिक्रिया.
भाजपचा गोंदियाचा उमेदवार जाहीर, गोंदियामधून सुनिल मेढेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचा गोंदियाचा उमेदवार जाहीर, गोंदियामधून सुनिल मेढेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर नगरपरिषद निवडणूक : दुपारी 3.30 वाजेपर्यंत 54.30 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यानी कोल्हापुरात आज अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासह इतर घटक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन
कराडमधून आज महाआघाडीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. यासभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर घटक पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे. या सभेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हजर राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पालघर नगरपरिषद निवडणूक : दुपारी 1:30 वाजेपर्यंत 41.29 टक्के मतदान
पालघर नगरपरिषद निवडणूक : दुपारी 1:30 वाजेपर्यंत 41.29 टक्के मतदान
माढ्यात शिंदे VS निंबाळकर : माढ्यात भाजपकडून फलटणच्या रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट, राष्ट्रवादी सोडून भाजपत आलेल्या मोहितेंचा उमेदवार नाहीच
लासलगाव बाजार समितीत कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 1 एप्रिलपर्यंत बंद, व्यापाऱ्यांकडून मार्च एन्डचं कारण देत लिलावात सहभागी होण्यास नकार
पालघर नगरपरिषद निवडणुक सकाळी 11.30 वाजेपर्यंत 25.37 टक्के मतदान
फलटणचे रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपत, कोल्हापुरात युतीला काँग्रेसचं समर्थन म्हणजे बोनस, चंद्रकांत पाटलांना विश्वास
गोवा : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी भेट देऊन केले कुटुंबीयांचे सांत्वन
अशोक चव्हाणांच्या नाराजीनंतर अब्दुल सत्तारांचा तोच सूर, चव्हाणांचा शब्द दिल्लीतून फिरवला जातो, अब्दुल सत्तारांचा दावा
पालघर : पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाला सुरुवात, उद्या मतमोजणी
वर्धा : वर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 28 मार्चला होणारी सभा रद्द करून पुढे ढकलली, 2 एप्रिल रोजी सभा होण्याची शक्यता
काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले,
औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन नाराजी,
सत्तारांचा काँग्रेसवर दबाव की भाजपच्या वाटेवर?
पालघर नगरपरिषद मतदान : प्रभाग 11 मधे EVM बंद पडल्याने मतदान थांबले
औरंगाबाद : उद्योगाच्या पाण्यात 25 टक्के कपात, पाणी टंचाईमुळे महापौर नंदू घोडेले यांचे आदेश
औरंगाबाद : काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार .काँग्रेसने चुकीच्या नेत्याला उमेदवारी दिल्याने देणार राजीनामे. माजी खासदार रामकृष्ण बाबा यांची माहिती, रामकृष्ण बाबाही राजीनामा देणार
नागपूर : दुधाच्या टँकरच्या धडकेत एका मुलीचा मृत्यू तर एक पादचारी जण जखमी, काल रात्रीची घटना, घटनेनंतर टँकरचालक फरार, कळमना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल...
भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे भाजपाचे भंडारा - गोंदियाचे उमेदवारी मिळण्याची शक्यता, आज कोल्हापूरच्या सभेत भंडारा - गोंदियाच्या उमेदवाराची घोषणा होणार
नांदेड लोकसभेसाठी अखेर अशोक चव्हाणांनाच उमेदवारी , मध्यरात्री काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर
सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार, भाजप निंबाळकर यांना माढाची उमेदवार देण्याची शक्यता
धुळे जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु, उद्या मतमोजणी, लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदारांचा आणि यंत्रणेचा गोंधळ होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावेळी मतदारांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला ( अंगठ्याच्या बाजूला असलेल्या बोटाला ) शाई लावण्यात येत आहे. आतापर्यंत 15.26 टक्के मतदान झाल्याची माहिती
शिवसेना खासदार राहुल शेवाळे आरपीआय नेते रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी संविधान बंगल्यावर ११ वाजता जाणार आहेत. रामदास आठवले यांनीही दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्तं केली होती. आता युतीचे उमेदवार म्हणुन राहुल शेवाळे यांची अधिकृत घोषणा झाल्यावर आठवलेंचं समर्थन मिळवण्यासाठी राहुल शेवाळे थेट संविधान बंगल्यावर जात आहेत.
पालघर नगरपालिका मतदान : 7.30 ते 9.30 मतदान 10.94 टक्के मतदान
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी मिळण्यासाठी मातोश्रीकडे निघालेल्या गाड्यांचा ताफा पोलीसांनी मुंबईबाहेरच अडवला.
पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी 62 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 47 हजार 850 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 14 प्रभागांमधील 28 जागेसह एक नगराध्यक्ष असे एकूण 29 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे .
अकोला : मोहम्मद अली रोडवरील इमारतीला भीषण आग, सिलेंडरचाही स्फोट, घटनास्थळावर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, कुठलीही जीवितहानी नाही
पार्श्वभूमी
काँग्रेसची आठवी यादी जाहीर, अशोक चव्हाणांना नांदेडमधून उमेदवारी, लोकसभा लढवण्याची राहुल गांधींची सक्ती
युती आणि आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, युतीची कोल्हापुरात तर आघाडीची कराडमध्ये पहिली सभा
लोकसभेत एकही जागा न देता भाजपकडून राज्यातील मित्रपक्षांची बोळवण, विधानसभेला संधी देण्याचा शब्द, तर महाआघाडीकडून मित्रपक्षांना 4 जागा
पाच वर्षांत राहुल गांधींची संपत्ती 55 लाखांवरून 9 कोटींपर्यंत कशी वाढली, भाजपचा सवाल, तर राहुल गांधी केरळमधून लढण्याच्या शक्यतेवर स्मृती इराणींचा टोला
पर्रिकरांचं पार्थिव ठेवल्यानं गोव्यातल्या कला अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्त्या मनस्विनी प्रभुणेंकडून व्हिडीओ व्हायरल
चेन्नईच्या फिरकीबहाद्दरांकडून बंगलोरचा अवघ्या 70 धावांत उडवला खुर्दा; हरभजन आणि इम्रान ताहिरला प्रत्येकी तीन, तर रवींद्र जाडेजाला दोन विकेट्स