LIVE BLOG : आज दिवसभरात | 8 ऑक्टोबर 2019

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Oct 2019 12:02 PM

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

सांगली जिल्ह्यात भाजपचं तिहेरी बंड : -
भाजप आणि शिवसेनेला सांगली जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्यात अपयश आले असून सांगली, शिराळा, जत, आणि इस्लामपूर विधानसभा मतदार संघात बंडखोरी झाली आहे. बंडखोरीने भाजप उमेदवारांची चिंता वाढवली आहे.
इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून गौरव नायकवडी मैदानात आहेत. मात्र तेथे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संघर्षातून त्यांनी बंड केले असून त्याचा शिवसेनेला त्रास होणार हे नक्की आहे. त्यामुळे इस्लामपूर मध्ये तिहेरी लढत होणार आहे.