LIVE BLOG : विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या विचार सुरु, निर्णय मुख्यमंत्र्यांकडे, केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाबाबत ठरवतील, चंद्रकांतदादा पाटील लाईव्ह
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 01 Jun 2019 10:31 PM

पार्श्वभूमी
देशातल्या सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचं वार्षिक अनुदान, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ मोदींचे चाणक्य अमित शाह देशाचे नवे गृहमंत्री, राजनाथ सिंहांकडे संरक्षण तर सीतारमण यांच्याकडे अर्थ...More
देशातल्या सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचं वार्षिक अनुदान, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ मोदींचे चाणक्य अमित शाह देशाचे नवे गृहमंत्री, राजनाथ सिंहांकडे संरक्षण तर सीतारमण यांच्याकडे अर्थ खात्याची धुरा, गडकरीच असणार देशाचे रोडकरी बेरोजगारीनं गाठला गेल्या 45 वर्षांतला उच्चांक, तर अखेरच्या तिमाहीत आर्थिक विकास दरही गडगडला, नव्या अर्थ मंत्र्यांसमोर मोठं आव्हान शिवसेनेच्या वाट्याला सलग तिसऱ्यांदा अवजड उद्योग मंत्रालयाचा भार, मर्जीप्रमाणे रेल्वे आणि उर्जा खातं न मिळाल्यानं मातोश्रीवर नाराजी, सुत्रांची माहिती लहान मुलांमधील लठ्ठपणाविरोधात एफडीएची मोहिम, मुंबईतल्या शाळांच्या कँन्टीनमधील जंकफूड रोखण्यासाठी नियमावली, 2200 शाळांना पत्र धाडलं विंडीजच्या ओशाने थॉमस आणि जेसन होल्डरच्या भेदक आक्रमणासमोर पाकिस्तानचा अवघ्या १०५ धावांत खुर्दा, विश्वचषकाच्या इतिहासात पाकची दुसरी नीचांकी धावसंख्या
पुणे : राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या, वैयक्तिक कारणामुळे काल दुपारी कोथरूड येथील राहत्या घरी आत्महत्या, बँक स्ट्रोक प्रकारात 7 सुवर्णपदक विजेता