LIVE BLOG : जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

आज दिवसभरातील घडमोडींचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2019 11:10 PM
सिंधुदुर्ग : अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरण, आमदार नितेश राणेंसह 19 जणांची सावंतवाडी कारागृहातून सुटका
चिपळूण : वशिष्ठी नदीच्या पाणीपातळी वाढ, चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील वाहतूक केली बंद, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गुहागर बायपासने वळवली
चिपळूण : वशिष्ठी नदीच्या पाणीपातळी वाढ, चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील वाहतूक केली बंद, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गुहागर बायपासने वळवली
रत्नागिरी : खेडजवळ मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सात मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्यामुळे वाहतूक थांबवली, पुलाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात
रत्नागिरी : खेडमधील रघुवीर घाटात दरड कोसळली, रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड-अकल्पे मार्गावर कोसळली दरड, साताऱ्यातील शिंदी, वाळवण, अकल्पे, मोरणी, वाघावळे, उचाट यांसह 15 गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाची घटनास्थळी धाव

गोव्यात राजकीय भूकंप, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या दोन तृतीयांश आमदारांचा गट फुटला, दहा आमदार विधानसभा संकुलात, काँग्रेसचं संख्याबळ पाचवर
गोव्यात राजकीय भूकंप, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या दोन तृतीयांश आमदारांचा गट फुटला, दहा आमदार विधानसभा संकुलात, काँग्रेसचं संख्याबळ पाचवर
#IndVsNZ | भारताचं विश्वचषक विजयाचं स्वप्न धुळीला, भारत 221 धावांवर सर्वबाद, उपान्त्य फेरीत न्यूझीलंडचा टीम इंडियावर 18 धावांनी विजय, विश्वचषकाच्या अंतिम फेरीत किवींची धडक
#IndVsNZ | भारताचं विश्वचषक विजयाचं स्वप्न धुळीला, भारत 221 धावांवर सर्वबाद, उपान्त्य फेरीत न्यूझीलंडचा टीम इंडियावर 18 धावांनी विजय, विश्वचषकाच्या अंतिम फेरीत किवींची धडक
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा दरड कोसळली, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरील बोरघाटात चार वाजताची घटना, तिसऱ्या लेनवर दरड पडल्याने इतर दोन लेनवरुन वाहतूक सुरु
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा दरड कोसळली, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरील बोरघाटात चार वाजताची घटना, तिसऱ्या लेनवर दरड पडल्याने इतर दोन लेनवरुन वाहतूक सुरु
इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई : तिवरे धरण दुर्घटनेतील पीडितांच्या भेटीनंतर शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, बाधितांचं पूर्ण पुनर्वसन करण्याची मागणी, जीवितांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घ्या, मृत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याबाबतही सूचना

मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत, कल्याण, इगतपुरी आणि लोणावळा इथे ओव्हरहेड वायरमध्ये विद्युत पुरवठा करणारा ग्रीड खराब झाल्याने वाहतूक खोळंबली, सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत, कल्याण, इगतपुरी आणि लोणावळा इथे ओव्हरहेड वायरमध्ये विद्युत पुरवठा करणारा ग्रीड खराब झाल्याने वाहतूक खोळंबली, सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या उशिराने
शिवडी ते कॉटन ग्रीन स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड, सकाळी 9.15 वाजल्यापासून लोकल दोन स्टेशनमध्ये अडकून, सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या खोळंबल्या
पालघर 26 गाव पाणीपुरवठा योजने अंतर्गत माहीम ग्रामपंचायतीच्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळली, हा अपघात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला असून 80 हजार लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी होती.
अमरावती : दूषित पाण्यामुळे 60 नागरिकांना विषबाधा, मेळघाटातील दहेंडा गावातील घटना , मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात दूषित पाणी पुरवठा
बुलडाण्यातील खामगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गुंडगिरी, एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाला चोप, भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत मारहाण

पार्श्वभूमी

    1. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पावसाचा खेळखंडोबा, न्यूझीलंड कालच्या पाच बाद 211 धावसंख्येवरुन आज पुढे सुरु होणार

    1. पुण्यातील बेपत्ता तरुण माओवाद्यांचा कमांडर, छत्तीसगढ पोलिसांकडून यादी प्रसिद्ध, कबीर कला मंचमुळे संतोष माओवादी झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

    1. 15 ऑगस्टपूर्वी म्हाडाची राज्यात तब्बल 14 हजार सहाशे घरांच्या लॉटरीची जाहीरात, उदय सामंतांची घोषणा, तर गिरणी कामगारांसाठी 5 हजार घरं

    1. मुंबईकरांचे प्रश्न मध्य रेल्वेकडे मांडणाऱ्या राजपुत्राचीही निराशा, अधिकाऱ्यांच्या सरकारी उत्तरामुळे अमित ठाकरेंनी डोकं टेकवलं

    1. मराठा आरक्षणविरोधी याचिकेवर सुप्रीम कोर्टात 12 जुलैला सुनावणी, सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर परीक्षा, राज्य सरकारकडून ज्येष्ठ वकिलांची फौज

    1. दारु घेतली तर गाडीचं इंजिनच सुरु होणार नाही, अऩोख्या तंत्रज्ञान भारतात आणण्याचा गडकरींचा विचार, यूपीतल्या बस दुर्घटनेवर गडकरींची माहिती

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.