LIVE BLOG : उपअभियंत्यावर चिखलफेक, आमदार नितेश राणेंची न्यायालयीन कोठडी 23 जुलैपर्यंत
देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पाहा एबीपी माझाच्या लाईव्ह अपडेटमध्ये
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 09 Jul 2019 10:55 PM

पार्श्वभूमी
1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे-सोनिया गांधींमध्ये नवी दिल्लीत गुफ्तगू, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खलबतं, तर ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आक्रमक2. मुंबई-कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा, तुफान पावसानं मुंबईकरांची दैना, पांडवकडा धबधब्याचा...More
1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे-सोनिया गांधींमध्ये नवी दिल्लीत गुफ्तगू, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खलबतं, तर ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आक्रमक2. मुंबई-कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा, तुफान पावसानं मुंबईकरांची दैना, पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्यानं सायन-पनवेल महामार्ग जलमय3. मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 12 जुलैला सुनावणी, हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संघाच्या भूमिकेचा बीए अभ्यासक्रमात समावेश, विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र बोलण्यास नकार5. कर्नाटकात पुन्हा राजकीय अस्थिरता, काँग्रेस-जेडीएस सरकारमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे, तर भाजपकडून कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी6. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा सामना विल्यमसनच्या न्यूझीलंडशी, मॅन्चेस्टरमध्ये किवीजवर मात करुन चौथ्यांदा फायनल गाठण्यास भारत उत्सुक
विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड उपान्त्य सामना - पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ उद्यावर ढकलला, भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या दुपारी तीन वाजता उर्वरित सामना पुढे सुरु होणार