LIVE BLOG | मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार, 16 ऐवजी 18 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू होणार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 15 Aug 2019 07:40 PM
पार्श्वभूमी
1.आज देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन, सकाळी 7.30 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा, दिवसभर माझावर खास कार्यक्रम2. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना...More
1.आज देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन, सकाळी 7.30 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा, दिवसभर माझावर खास कार्यक्रम2. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक तर स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगुलचं डुडुल3. कलम 370 रद्द केल्यानं बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ धमक्या, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं कारवाई केल्यास युद्ध पुकारू, इम्रान यांची दर्पोक्ती4. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर औरंगाबादमध्ये हाय अलर्ट जारी, एका संशयीताचा स्केचद्वारे शोध सुरु, संशयीताच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष5. पुणे-सोलापूर महामार्गानजीक दौंड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग,केमिकल कंपनी असल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश6. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आकर्षक रोषणाई, सीएसटी, महापालिका, मंत्रालयासह सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांची आरास
पुणे-कोल्हापूर रेल्वे सेवा सुरु, गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे पुण्यातून मिरजपर्यंतच सुरू होती सेवा, रेल्वे रुळांची तपासणी झाल्यावर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
पुणे : मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार, 16 ऐवजी 18 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू करणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी या गाड्या राहणार बंद, प्रवाशांचे आरक्षणही रद्द