- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार : प्रकाश आंबेडकर
LIVE BLOG : वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना पाठिंबा देवू मात्र शरद पवारांना पाठिंबा नाही
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 May 2019 11:24 PM
#DCvsSRH : दिल्ली कॅपिटल्सचा दोन विकेट्सनी सनरायझर्स हैदराबादवर विजय, बाद फेरीत अटीतटीच्या लढतीत दिल्लीची बाजी
सोलापूर : वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना पाठिंबा देवू मात्र शरद पवारांना पाठिंबा नाही
पुणे - पुण्यातील येरवडा परिसरात तरुणाला जीवे मारण्याच प्रयत्न, जुन्या वादातून सागर चव्हाण नावाच्या तरुणावर हल्ला, मारहाण सीसीटीव्हीत कैद
ठाण्यातील 15 हॉस्पिटल अग्निशमन विभागाकडून सील, हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई, फायर एनओसी नसल्याने सील, यादीत आणखी भर पडण्याची शक्यता, या हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्याबाबत विचार सुरु
पुणे-मुंबई दृतगती मार्ग (9 मे) दोन तास बंद ठेवण्यात येणार, वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गावरुन वळवण्यात येणार, 'ओव्हरहेड गँट्री'च्या कामासाठी दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान वाहतूक बंद
राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांच्या मॅरेथॉन आढावा बैठकांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात, मुंबईतील वर्षा या निवास्थानातून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा, दुष्काळी भागातील गावांचे सरपंच, रहिवासी यांच्याशी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा
नाशिक : गुणाजी जाधव हत्या प्रकरणी सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरेसह एकूण आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
अमरावती : तिवसा तालुक्यातील वणी गावाशेजारी भीषण आग, आगीमुळे संत्री बाग जळून खाक
पुणे : घरात घेत नसल्याच्या रागातून जावयाकडून सासूची हत्या, डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन हल्ला, पुण्यातील चतुःश्रुंगी परिसरात दुपारच्या सुमारास घटना, आरोपी जावई
दिगंबर ओव्हाळ अटकेत
पुणे : घरात घेत नसल्याच्या रागातून जावयाकडून सासूची हत्या, डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन हल्ला, पुण्यातील चतुःश्रुंगी परिसरात दुपारच्या सुमारास घटना, आरोपी जावई
दिगंबर ओव्हाळ अटकेत
दुष्काळाबाबत आढावा घेण्यासाठी मनसेचे मराठवाडा संपर्क नेते आणि पदाधिकाऱ्यांची कृष्णकुंजवर बैठक, लोकसभा निवडणूकीनंतर मराठवाड्यात काय परिस्थिती आहे, तसंच दुष्काळाची भीषणता किती आहे याबाबत आढावा
पुणे- बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांना भारत सरकारने सन 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता.

अकोला : किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात आणखी तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात, आतापर्यंत नऊ आरोपींवर गुन्हे दाखल, तीन अटकेत सहा जण फरार
नारायण राणेंचं आत्मचरित्र हे दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे, स्वत:वर झालेल्या आरोपाचं काय? त्याचं स्पष्टीकरण आत्मचरित्रात का नाही? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे. श्रीधर नाईक हत्या प्रकरण, चेंबूरमधले गुन्हे, कोकणातले गुन्हे यावर राणेंनी स्पष्टीकरण का नाही दिलं? असंही वैभव नाईक म्हणाले.

मराठा आरक्षण लागू झाल्यास वैद्यकीय पद्युत्तर प्रवेशात खुल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांना फटका बसणार? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, गुरुवारच्या सुनावणीत माहिती सादर करण्याचे निर्देश, मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पद्युत्तर अभ्याक्रमाच्या प्रवेशाबाबतची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब
नाशिक : रामकुंडाजवळ पोहायला गेलेल्या लक्ष्मण मीना नावाच्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, रामकुंडाला लागून असणाऱ्या गांधी तलावात बुडून मृत्यू, अग्निशमन विभागाच्य जवानांनी स्थानिक जलतरणपटूच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला
मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, मुंबईरांच्या सरबतातील बर्फाचे 81 टक्के नमुने दूषित, एप्रिल महिन्यात महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाई दरम्यान तब्बल 81 टक्के नमुने दूषित आढळले
पुणे विमानतळावर 957 ग्रॅम सोने पकडले, कस्टम विभागाची कारवाई, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 31 लाख रुपये
पुणे विमानतळावर 957 ग्रॅम सोने पकडले, कस्टम विभागाची कारवाई, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 31 लाख रुपये
मुंबई : नारायण राणेंनी आत्मचरित्रांतून केलेल आरोप मनोहर जोशींनी फेटाळले, नारायण राणेंनी केलेल्या आरोपात तथ्य नाही मनोहर जोशींचं स्पष्टीकरण
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका महिलेनेच वृद्ध महिलेला लुटलं. 65 वर्षीय वृद्ध महिलेला मंदिरात सोडते म्हणून हात पकडून तिच्या हातामधील सोन्याची बांगडी खेचली. उल्हासनगर कुर्ला कॅम्प परिसरात संताजी माता मंदिर इथे हा प्रकार घडला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिललाईन पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

बीड : परळीमधील हिंदनगर भागात रक्ताने माखलेल्या एका तरुणाचा मृतदेह नाल्यात आढळला
धुळे: शिवसेना जिल्हा प्रमुखांना मारहाणी प्रकरणी भाजपचे महापौर, नगरसेवकांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे: शिवसेना जिल्हा प्रमुखांना मारहाणी प्रकरणी भाजपचे महापौर, नगरसेवकांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक क्लीन चिट, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटल्याप्रकरणी मोदींना दिलासा
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक क्लीन चिट, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटल्याप्रकरणी मोदींना दिलासा
भेंडवळ भविष्यवाणी - (आर्थिक भाकित)
घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं, असा भेंडवळमधील अंदाज आहे.
भेंडवळ भविष्यवाणी (राजकीय भाकित) : घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत.
भेंडवळ भविष्यवाणी (संरक्षणाबद्दलच भाकित) -
परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल.
भेंडवळ भविष्यवाणी ( पीकपाण्याबद्दलचं भाकित )
अंबाळी - मोघम, रोगराई नाही.
कापूस - मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल.
ज्वारी - पीक सर्व साधारण येईल, भावात तेजी मात्र राहणार नाही.
गहू - पीक मोघम स्वरुपाचे राहिल.
तांदूळ - मोघम उत्पादन होईल.
तूर - पीक चांगलं राहिल.
मूग - मोघम उत्पादन राहिल.
उडीद - सर्वसाधारण उत्पादन राहिल.
तीळ - मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल.
भादली - रोगराई शक्य.
बाजरी - उत्पादन सर्व साधारण असले तरी भावात तेजी राहिल.
हरभरा - सर्व साधारण स्वरुपाचे उत्पादन राहिल.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ भविष्यवाणी - (पाऊसमान/हवामान)
पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त...सार्वत्रिक पाऊस होणार नाही.
दुसरा महिना चांगला पाऊस होईल.
तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल.
चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील.
यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य.
चारा-पाण्याची टंचाई येईल

मुंबई : छिन्न, इमला, चौकोन या पुरस्कारप्राप्त नाटकांचे लेखक ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचं निधन, मुलुंडमधील रुग्णालयात 7 मे रोजी रात्री अखेरचा श्वास, आज सकाळी टाटा कॉलनीमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
पार्श्वभूमी
1. नारायण राणेंना शिवसेनेत ठेवल्यास घर सोडेन, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अल्टिमेटम दिल्याचा राणेंच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट
2. भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन, एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींचं खुलं आव्हान, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप
3. मोदींचा अंहकार दुर्योधनासारखा, अंबालाच्या सभेत प्रियांका गांधींचा मोदींवर हल्लाबोल तर दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण 23 मे रोजी कळेल, अमित शहांचा पलटवार
4. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून आणखी 2 हजार 160 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे ट्वीटरवर आभार
5. आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुंबई आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांचा डंका, मुंबईतली जुही कजारिया अव्वल, तर नाशकातली दृष्टी अत्तरदे तिसरी
6. आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जवर विजय, मुंबईची पाचव्यांदा फायआनलमध्ये धडक