LIVE BLOG : सुषमा स्वराज यांची प्रकृती गंभीर, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
06 Aug 2019 11:02 PM
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली,
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल
सुषमा स्वराज यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन रुग्णालयात दाखल
मुसळधार पाऊस आणि नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मदतकार्यासाठी भारतीय सैन्यदलाची एक तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे. परंतु पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे जवानांची गाडी शिरोली पुलापलीकडे थांबून आहे.
कलम 370 रद्द करण्याचं विधेयक लोकसभेत पारित,
कलम 370 मुक्त काश्मीरचं भाजपचं स्वप्न साकार,
काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही संमत,
351 विरुद्द 72 मतफरकाने विधेयक मंजूर
कराड परिसरात पूर ओसरेपर्यंत जमावबंदी,
कराड तहसिलदारांचे आदेश,
पूर पाहणी आणि सेल्फीसाठी जमणाऱ्या हौशींना कंटाळून आदेश जारी,
पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी दोन किंवा अधिक जण दिसल्यास कारवाई
#कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन बंद,
दूध वाहतुकीस अडचण होत असल्याने संकलन थांबवले,
कोल्हापुरातील महापुरामुळे निर्णय
#कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन बंद,
दूध वाहतुकीस अडचण होत असल्याने संकलन थांबवले,
कोल्हापुरातील महापुरामुळे निर्णय
इंदापूर : पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज 91 टक्के भरले असून आज उजनी धरण शंभरी पार करेल. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून दीड लाख क्युसेक पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही 2 लाख 22 हजार क्युसेक झाल्याने, अखेर धरणातून नदीत दीड लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे. वीरमधून मोठ्याप्रमाणात पाणी सोडले जात असल्याने आता सोलापूर जिल्ह्यात भीमेला पूर सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग वाढू शकतो हे लक्षात घेत भीमाकाठी आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी माध्यमांच्या वार्तांकनावर बंदी घाला, सरकारी पक्षाची हायकोर्टाकडे मागणी, आरोपी डॉक्टरांचाही सरकारी पक्षाला पाठिंबा, मात्र अशाप्रकारे माध्यमांवर बंधन घालणं योग्य नाही, हायकोर्टाचं स्पष्टीकरण

गोवा-बेळगाव मार्गावरील चोर्ला घाटात जांभळी भागा दरड कोसळली, मार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला वाहने अडकली, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू घेऊन येणारे ट्रक अडकल्याने बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता
पुणे : पुण्यात पावसाचा जोर थांबला, धरणक्षेत्रात पावसाचा जोर मंदावला, खडकवासला धरण साखळीतील चारही धरणं भरली, मुठा नदीमध्ये 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
कोल्हापूर : न्यू पॅलेसमागील सन सिटीमध्ये मध्यरात्री पुराचं पाणी घुसलं, 500 हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले, अग्निशमन दलाच्या बोटीतून नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
कर्जत-बदलापूर लोकल सेवा पूर्ववत, गेल्या दोन तीन दिवसांपासून रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद होता, तांत्रिक बिघाड आणि रुळांखालील खडी वाहून गेल्याने मार्ग बंद होता
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस गाड्या आज रद्द
मुसळधार पावसामुळे कोल्हापुरमधील शाळांना मंगळवार, बुधवार सुट्टी जाहीर, पुणे आणि साताऱ्यातील शाळांना आज सुट्टी
कोल्हापूर, पुणे, सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांना संतर्कतेचा इशारा
कोल्हापूर : पाणी उपसा केंद्र बंद पडल्याने कोल्हापूर शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा होणार नाही, पुराचे पाणी ओसरल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार, पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1.संविधानाचं कलम ३७० रद्द करण्याचा मार्ग मोकळा, राज्यसभेत प्रस्ताव मंजूर, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द होणार.
2. जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती, लडाख विधानसभा नसलेलं, तर जम्मू-काश्मीर विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश
3. कलम 370 रद्द करण्याच्या भूमिकेचं शिवसेनेसह राज ठाकरेंकडून जोरदार स्वागत, गिरीश महाजनांनी धरला ठेका, काश्मीरी पंडितांकडूनही जल्लोष
4. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती पोलिसांच्या ताब्यात, राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर कारवाई
5. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाला मोठी गळती, दुर्घटनेपूर्वी तात्काळ दुरुस्ती करणं गरजेचं , जलविद्युत केंद्रात पाणी शिरल्यानं 55 गावांची वीज खंडीत
6. विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर उद्या संपावर जाणार, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील 4 हजार 500 डॉक्टर होणार सहभागी