LIVE BLOG : गुजरातच्या बडोद्यात जोरदार पाऊस, सहा तासांत 354 मिमी पावसाची नोंद
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Aug 2019 12:06 AM
सोलापूर : करमाळा स्लॅब कोसळलेल्या दुर्घटनेत दुसरा मृत्यू, लोचना गुंजाळ या वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, बिल्डिंग मालकावर भादंवी कलम 304, 337, 338 नुसार गुन्हा दाखल
गुजरातच्या बडोद्यात जोरदार पाऊस, सहा तासांत 354 मिमी पावसाची नोंद, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, बडोद्याचं विमानतळही सकाळपर्यंत बंद राहणार
बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक आज प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास 2 हजार ऐवजी आता 10 हजार रुपये दंड, तर परवान्याशिवाय गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड होणार
पालघर : तलासरी, डहाणू, दापचरी, बोर्डी परिसरात पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का, 8 : 20 मिनीटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याची माहिती
बारामती सत्र न्यायाधीशांविरोधात पत्नीचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना साकडं. स्थानिक पोलीस आणि बारामती सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांकडे तक्रार करूनही कारवाई नाही, पत्नीचा आरोप, कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण, कोर्टानं ठरवलेली पोटगीची रक्कम देण्यासही टाळाटाळ
कोल्हापूर : केर्ली गावाजवळील रेडे डोह येथे पुराचं पाणी आल्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग बंद, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय चौकात बॅरिकेट्स लावून रस्ता केला बंद, कोकणात जाणारी वाहतूक झाली बंद
औरंगाबाद : खेळता खेळता पाण्याच्या बादलीत पडून 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, पाचोड गावातील कल्याणनगर भागातील घटना
मुंबई : 28 वर्षानंतर होणाऱ्या विद्यापीठ, महाविद्यालयीन निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेला 19 ऑगस्टपासून सुरवात तर 20 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू होणार, 30 ऑगस्टला महाविद्यालयीन अध्यक्ष, वर्गप्रतिनिधी सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी या जागांसाठी मतदान
करमाळा येथील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या इमारतीच्या मालकांविरोधात भादंवी 304 सह इतर कलमांनुसार करमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु, बॅंक व्यवस्थापक फिर्यादी
औरंगाबाद : 9 ऑगस्टपासून मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार, मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला अल्टीमेटम, कोपर्डीच्या आरोपींना फाशी, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, आंदोलनात आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना नोकरी आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी आंदोलन
कोलकाता : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची बैठक सुरु, बैठकीत ईव्हीएम संदर्भात चर्चा होण्याची शक्यता
मुंबई : भारताचा ऑलिम्पियन दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, पत्नीने 498(अ) कलमाखाली दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द,
तक्रारदाराच्या आरोपांमध्ये तथ्य दिसत नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा, नाशिक पोलिस दलात कार्यरत असलेल्या पत्नीच्या तक्रारीवरुन दत्तूवर गुन्हा दाखल झाला होता.
मुंबई : भारताचा ऑलिम्पियन दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, पत्नीने 498(अ) कलमाखाली दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द,
तक्रारदाराच्या आरोपांमध्ये तथ्य दिसत नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा, नाशिक पोलिस दलात कार्यरत असलेल्या पत्नीच्या तक्रारीवरुन दत्तूवर गुन्हा दाखल झाला होता.
सोलापूर : करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, सहा जणांना बाहेर काढण्यात यश, तर 20 ते 25 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
राधाकृष्णा विखे पाटलांनी आम्हाला भाजपचा रस्ता दाखवला : मधूकर पिचड
राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांचाही भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार नाहीत, नगरसेवकांचाही आज प्रवेश होणार नाही, काही नगरसेवकांचा भाजपात जाण्यास नकार, 10 ते 15 नगरसेवक राष्ट्रवादीत राहण्याची शक्यता
मुंबई : आरोपी आयान खानचा वाढदिवस साजरा करणं महागात, भांडुप पोलिस ठाण्याचे दोन पीएसआय आणि दोन हवालदार निलंबित, व्हायरल व्हिडीओनंतर पोलिस उपायुक्तांची कारवाई
कोल्हापूर : राधानगरी धरण 99 टक्के भरलं, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, धरणात कोणत्याही क्षणी होऊ शकतो विसर्ग
'सीसीडी'चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह 36 तासांनंतर सापडला, मंगळुरु येथील नेत्रावती नदीत सापडला मृतदेह, सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई
रत्नागिरी : चिपळूणजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील वाहतूक सुरु, वाशिष्ठी नदीची पाणीपातळी कमी झाल्याने वाहतूक सुरु
सांगली : कृष्णा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर, नदीकाठच्या अनेक भागात पाणी शिरले, नदी काठचा कर्नाळ रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद, मगरमच कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड भागात पाणी घुसले, 2005 प्रमाणे पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता
नागपूर : गंगा-जमुना परिसरात घराची भिंत पडल्याने चौघे जण किरकोळ जखमी
सातारा : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार, चालक आणि लहान मुलगी गंभीर जखमी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावाजवळील घटना
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. अखेर तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर, मोदी सरकारचं ऐतिहासिक यश, तिहेरी तलाक देणाऱ्याला मुस्लिम पतीला तीन वर्षांची शिक्षा
2. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड, आमदार शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांचा राजीनामा, कोळंबकरांसह चित्रा वाघही आज भाजपात प्रवेश करणार
3. लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशभरात बंद. बंददरम्यान
4. पश्चिम महाराष्ट्र, कोकणातलं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळण्यासाठी लवकरच सर्व्हेला कॅबिनेटची मंजुरी, दीड महिन्यात सर्वे पूर्ण करण्याचं टार्गेट
5. धनगरांना आदिवासी समाजाला मिळणाऱ्या काही सवलती लागू, विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय, तर सरपंचाच्या मानधनातही वाढ
7.कॅफे कॉफी डेचे सर्वेसर्वा सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानं खळबळ, घर सोडण्यापूर्वी भावनिक पत्र लिहिल्यानं आत्महत्याचा संशय,