LIVE BLOG : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jul 2019 11:22 PM
नागपूर : गंगा जमुना परिसरात एका घराची भिंत पडल्याने चार जण किरकोळ जखमी, जखमींना रुग्णालयात केले दाखल, आज दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्री 8 ते 9 दरम्यान भिंत पडली
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक, उमेदवार मुलाखतीला लावली हजेरी
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामीनासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब. मराठीतील आरोपपत्राचं इंग्रजीत भाषांतर आणि अभ्यास करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी वाढवून मागितला वेळ
तात्काळ तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर,
देशभरातील मुस्लीम समाजाकडून मोदी सरकारचं कौतुक,
99 विरुद्ध 84 च्या मतफरकाने विधेयक मंजूर
तात्काळ तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर
देशभरातील मुस्लीम समाजाकडून मोदी सरकारचं कौतुक
तत्काळ तिहेरी तलाकविरोधी विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला
तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत मतदानाला सुरुवात
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल अनुपस्थित
मुस्लीम समाजासह देशाचं राज्यसभेकडे लक्ष
#TripleTalaqBill : तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत मतदानाला सुरुवात
विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी मोदी सरकारची रणनिती
सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराबरोबर औदुंबर येथील दत्त मंदिर देखील पाण्याखाली, आज सकाळपासून मंदिरात पाणीच पाणी झाल्याने भाविकांना मंदिरात न जाण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन
अनुसूचित जमातीच्या (ST) 22 योजना धनगर समाजासाठीही लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मोठी वाहतूक कोंडी, अनेक शाळांना सुट्टी
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर 2019 रोजी


बेळगाव : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. नानावाडी आणि मराठा कॉलनीत रस्त्यावर पाणी साठलं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे.

मुंबई : काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांचा राजीनामा, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंकडे सोपवला राजीनामा
नवी मुंबई : गणेश नाईक भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेमुळे आमदार मंदा म्हात्रे नाराज, समजूत काढण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली भेट, पक्षप्रवेशावेळी हजर राहण्याचे दिले निमंत्रण
मुंबई : काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आज आमदारकीचा राजीनामा देणार, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे देणार राजीनामा
मुंबई : आमदार शिवेंद्रराजे मुंबईत दाखल, थोड्याच वेळात आमदारकीचा राजीनामा देणार, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडेंकडे करणार राजीनामा सुपूर्त
लातूरच्या राजकारणाचा नवा पॅटर्न, गेल्या तीन वर्षांमध्ये लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी खूप मोठा निधी आणला, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा पालकमंत्री निलंगेकरांच्या अभिनंदनाचा ठराव, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकमताने ठराव
नागपूर :

आनंद शिरपूरकर या तरुणाची हत्या, कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुजरनगर येथील घटना,

उधारीच्या पैशातून हत्या झाल्याची माहिती
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे सर्व 52 नगरसेवक आणि अपक्ष 6 नगरसेवक गणेश नाईक, संदीप नाईक सकाळी 11 वाजता भेट घेणार, भेटून पक्षांतराबाबत चर्चा करणार, नाईक परिवाराकडून मोठं शक्तीप्रदर्शन केले जाणार
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे सर्व 52 नगरसेवक आणि अपक्ष 6 नगरसेवक गणेश नाईक, संदीप नाईक सकाळी 11 वाजता भेट घेणार, भेटून पक्षांतराबाबत चर्चा करणार, नाईक परिवाराकडून मोठं शक्तीप्रदर्शन केले जाणार
नागपूर

: पाच

वर्षीय बालकाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू, दवलामेटी परिसरातील घटना, आर्यन राऊत असं मृत बालकाचे नाव
सोलापूरमध्ये रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी,

मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप, सकाळपासून पावसाची संततधार सुरुच
‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई
पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून 9416 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडणार, धरणाचे सर्व 11 दरवाजे एक फुटाने उघडणार
पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून 9416 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडणार, धरणाचे सर्व 11 दरवाजे एक फुटाने उघडणार
कोल्हापूर

: पन्हाळा तालुक्यातील गोठे-परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद
ठाणे : कळवा परिसरात डोंगराचा काही भाग कोसळला, दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी, अटकोनेश्वरनगर येथील ज्ञान गंगा शाळेजवळील आदर्श चाळीजवळील घटना
कोल्हापूर : जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद,

मांडुकली गावाजवळ दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद,

कोकणातून येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम, तर हातकणंगले तालुक्यातील
निलेवाडी ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरील वाहतूक बंद
मुंबई : भाजपाच्या मागणीनंतर मंदिराबाहेर गायी गुरे बांधणाऱ्यांवर 10 हजारांचा दंड आकारला जाणार, महापालिका प्रशासनाचा स्थायी समिती प्रस्ताव

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. राजकीय भूकंपासाठी भाजपनं निवडला 31 जुलैचा मुहूर्त, नवी मुंबईतल्या नाईक कुटुंबीयांसह शिवेंद्रराजे, वैभव पिचड, कोळंबकर भाजपात जाणार, सूत्रांची माहिती

2. मुंबईत राज ठाकरे, अजित पवार, राजू शेट्टी आणि जयंत पाटलांची गुफ्तगू, ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी, 9 ऑगस्टला मनसे रस्त्यावर उतरणार

3.पुण्यातील गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशी रद्द, फाशीच्या अंमलबजावणीला दिरंगाई झाल्यानं निर्णय, सर्व स्तरातून संताप व्यक्त

4. पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळं मुंबईसह राज्यातल्या धरणात खळखळात, गंगापूरमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर,

5. डिस्कव्हरीच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2 ऑगस्टला प्रसारण, पुलवामा हल्ल्यावेळी शुटिंग झाल्याचा विरोधकांचा आरोप

6.भारतीय संघात मतभेद असल्याच्या बातम्यांचा विराट कोहलीकडून इन्कार, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय कर्णधाराची पुन्हा रवी शास्त्रींनाच पसंती

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.