LIVE UPDATE | नवी दिल्ली : संसदेत चाकू घेऊन घुसणारा पोलिसांच्या ताब्यात
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
02 Sep 2019 05:19 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'लालबाग राजा'च्या चरणी, दुपारी सिद्धीविनायकाचं घेतलं होतं दर्शन
वर्धा : हिंगणघाट येथे गौरी विसर्जन करताना तोल जाऊन पडल्यानं दोन महिला आणि दोन लहान मुलं वणा नदी पात्रात बुडाले, पोलीस कर्मचारी तातडीनं मदतीला धावले, वाहून जात असलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्यानं बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले मात्र महिलेचा मृत्यू, बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध सुरू
#Breaking सातारा : उदयनराजेंसोबत अमोल कोल्हेंची बंद खोलीत चर्चा, राष्ट्रवादीच्यावतीने अमोल कोल्हेंकडून उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न
मुंबई : औरंगाबादमधील सिल्लोडचे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार म्हणून सिद्धिविनायक मंदिराचा परिसर रिकामी करण्यात आला. मुंबई पोलीसांनी भाविकांच्या रांगा थांबवल्या, दुकानं बंद केली, दर्शन घेतलेल्या भाविकांनाही बाहेर काढलं.
औरंगाबाद : सिल्लोडमधील काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार, आज दुपारी 12.30 पक्षप्रवेश होणार

नवी दिल्ली : संसदेत चाकू घेऊन घुसणारा पोलिसांच्या ताब्यात, गेट क्रमांक 1 मधून संसदेत घुसण्याचा प्रयत्न, आरोपीची चौकशी सुरु
नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे. धूमधडाक्यात सगळीकडे बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे. नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरातही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विदर्भातील अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरचं ग्रामदैवत म्हणजे टेकडी गणेश. सकाळच्या आरतीपासून टेकडी गणपती मंदिरात 10 दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. येत्या 10 दिवस उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग
: कोकणातील महत्त्वाचा सण गणेशोत्सव आजपासून सुरु होत आहे. कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर अमाप उत्साह, आनंद घेऊन येणार सणाला आजपासून प्रांरभ होत आहे.
तळकोकणात आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्याची लगबग आज सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वाजतगाजत तर काही ठिकाणी होडीतून बाप्पाचं आगमन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 68 हजार 303 घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तर जिल्ह्यात 35 सार्वजनिक ठिकाणी थाटात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस चार तास तर एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस साडेपाच तास उशिराने, सीएसएमटीवरुन सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी सुटणारी मांडवी एक्स्प्रेस सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणार, तर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी विशाखापट्टणम एक्स्प्रेस दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी सुटणार
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याचं आश्वासन, मातोश्रीवर बैठकीनंतर अनिल परबांची माहिती
पार्श्वभूमी
1. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, सार्वजनिक मंडळांसह घराघरांत बाप्पांचं आगमन, शहरं आकर्षक रोषणाईनं उजळली
2. मुंबईत गणेश मंडळांचा मोठा उत्साह, पुण्यातही पारंपारिक पद्धतीनं स्वागत होणार, सिद्धीविनायकाच्या मंदिरात भक्तांची गर्दी
3. आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर, सोलापुरात अमित शाहांच्या भाषणातून संकेत, राणा, महाडिक, गोरेंच्या हाती भाजपचा झेंडा
4. औरंगाबाद, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, ओढ्यांना पाणी, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
5. भारतासमोर अखेर पाकिस्तान झुकला, कुलभूषण जाधवांना आज न्यायालयीन अधिकार देणार, अटी-शर्थीविना कुलभूषण यांना भेटण्याची भारताची मागणी
6. जमैका कसोटीत विंडीजचा पहिल्या डावात ११७ धावांत खुर्दा, भारताला २९९ धावांची आघाडी; विंडीजला फॉलोऑन न देण्याचा कर्णधार कोहलीचा निर्णय