LIVE BLOG : अभिनेता विवेक ऑबेरॉयला धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
22 May 2019 11:30 PM
पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरनजीक हालोली पाटीलपाडा येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी
सोलापूर : भीम आर्मी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, भीम आर्मीच्या इशाऱ्यानंतर फौजदार चावडी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई, अखिल शाक्य (जिल्हाध्यक्ष), दर्शना गायकवाड (जिल्हा महासचिव), मनोज चलवादी (शहर अध्यक्ष), अजय मैंदंर्गिकर (शहर सरचिटणीस) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
मुंबई : अभिनेता विवेक ऑबेरॉयला धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ, धमकी कुणी दिली याचा पोलिसांकडून शोध सुरु
मुंबई येथील हज हाऊसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी यांनी मुस्लिम बांधवांसोबत इफ्तारीत भाग घेतला, इफ्तारीच्या नमाजमध्ये मौलवींनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील अशी दुवा देखील केली, कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, सिने अभिनेत्री पूनम डिल्लोन, शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते
पंढरपूर : चंद्रभागेच्या पाण्यात बुडून नांदेड येथील 12 वर्षीय मुलगा बेपत्ता, ऋषिकेश कुलकर्णी असं मृत मुलाचं नाव
सोलापूर :
सोलापूरात पावसाचा जोर वाढला
,
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
सोलापूर :
सोलापूरात पावसाचा जोर वाढला
,
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
त्रिशंकू परिस्थिती आल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची विरोध पक्षांची तयारी, येत्या दोन दिवसांत राष्ट्रपतींना तसे पत्र देण्याची विरोधी पक्षांची रणनीती
निकालाआधीच अमोल कोल्हेंची खासदार म्हणून फ्लेक्सबाजी, शिरूर आणि मावळ मतदारसंघाची मतमोजणी ज्या म्हाळुंगे- बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. त्याच्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावर ही फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे

जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर शिवबंधन बांधलं, उद्धव ठाकरे यांनी बांधलं शिवबंधन, शिवसेनेत अधिकृत प्रवेश
सोलापूर : दिवसभर कडकाच्या उन्हाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना पावसाचा दिलासा, वातावरणात अचानक बदल होऊन पावसाची रिपरिप सुरू
मुंबईची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण व्हायला रात्रीचे 12 वाजणार,
निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली, दक्षिण मध्य मुंबई मध्ये 23 फेऱ्या होतील तर दक्षिण मुंबई मध्ये 22 फेऱ्या होतील, नंतर व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आणखी 5 तास लागतील
हिंगोली : शेतीच्या वादातून पहेणीमध्ये चुलतभावाचा खून
शंकर लक्ष्मण डोंगरे असे मयताचे नाव ,
सात जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
बारामती : कोणतीही व्हिडीओ ऑडीओ क्लिप नसताना मंत्री जानकर यांना मागितली 50 कोटींची खंडणी, बारामती पोलिसांच्या तपासात आरोपींकडे कसलीच क्लिप नसल्याचे उघड, बारामती शहरात नऊ मे रोजी 50 कोटींची खंडणी मागणार्यांना केली होती अटक, या प्रकरणात आठ जणांवर गुन्हे दाखल, प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई
मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात उद्या निकालानंतर जल्लोषाची तयारी सुरू, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बसण्याची विशेष व्यवस्था, निकाल दाखवण्यासाठी लावली जाणार LED स्क्रीन, भाजप कार्यकर्त्यांची लगबग सुरू

ईव्हीएमवर विश्वास नाही, निवडणूक आयोगाकडून पक्षपात, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, 2014 पेक्षा अधिक जागा मिळण्याचीही खात्री
ईव्हीएमवर विश्वास नाही, निवडणूक आयोगाकडून पक्षपात, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, 2014 पेक्षा अधिक जागा मिळण्याचीही खात्री
एक्झिट पोल म्हणजे निव्वळ करमणूक, फारसं महत्त्व देऊ नका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नो टेन्शन!
एक्झिट पोल म्हणजे निव्वळ करमणूक, फारसं महत्त्व देऊ नका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नो टेन्शन!
नांदेड, बारामती, माढा, साताऱ्यासह महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे 45 उमेदवार निवडून येतील, रावसाहेब दानवे यांना विश्वास, उद्याच्या निकालाची धाकधूक नाही, प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, दानवेंचा दावा
व्हीव्हीपॅटच्या 50 टक्के मतमोजणीची विरोधकांची मागणी फेटाळल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेससह 21 विरोधी पक्षांच्या मागणीला निवडणूक आयोगाकडून केराची टोपली
व्हीव्हीपॅटच्या 50 टक्के मतमोजणीची विरोधकांची मागणी फेटाळल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेससह 21 विरोधी पक्षांच्या मागणीला निवडणूक आयोगाकडून केराची टोपली
एक्झिट पोल खरे असतील, तर निवडणुका कशाला? राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल, राज्यभरात मोदींविरोधात रोष असल्याचाही दावा, देशात अघोषित आणीबाणी असल्याचा भुजबळांचा घणाघात
एक्झिट पोल खरे असतील, तर निवडणुका कशाला? राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल, राज्यभरात मोदींविरोधात रोष असल्याचाही दावा, देशात अघोषित आणीबाणी असल्याचा भुजबळांचा घणाघात
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन्ही दिशेला वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने ट्राफिक जाम, काल खर्डी गावाजवळ एचपी गॅस टँकर उलटल्याने झाली होती प्रचंड वाहतूक कोंडी, रात्री उशिरा टँकर हटवल्यानंतरही वाहनांच्या रांगा कायम
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 144 कलम लागू, उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांना पोलिसांकडून हद्दपारीच्या नोटिसा, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची कारवाई
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 144 कलम लागू, उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांना पोलिसांकडून हद्दपारीच्या नोटिसा, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची कारवाई
नवी दिल्ली :लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, सरचिटणीस आणि प्रभारी उपस्थित राहतील. यात यूपीएच्या मित्र पक्षांसोबतच्या बैठकीबाबत चर्चा केली जाणार आहे. 10 जनपथवर दुपारी 12 वाजता बैठकीला सुरुवात होईल.
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणावर गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणावर गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीला अखेर रामराम, आमदारकीचा देणार राजीनामा, शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा
जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीला अखेर रामराम, आमदारकीचा देणार राजीनामा, शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा
सोलापूर : वादळी वाऱ्यात वीज कोसळून सोलापुरात तिघांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुलांसह एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. काल संध्याकाळी सोलापुरातील बोरामणी येथील रोहित सुतार या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर अक्कलकोट तालुक्यात करजगी येथील समर्थ गंगदे या शाळकरी मुलाचाही वीज कोसळून मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील हौसाबाई सोमा बिचकुले या महिलेचाही वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारपर्यंत उन्हाचा पारा चढा असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह विजा कडाडू लागल्या. यात वीज कोसळून या तिघांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी सातनंतर जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरीप झाली.
मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड, दुरुस्तीचं काम सुरु
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघ मध्यरात्री मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाली. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला 30 मे, 2019 पासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला विश्वचषकासाठी शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
पार्श्वभूमी
1. एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मानाचं स्थान, सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग, उपमुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंसोबत सुभाष देसाईही दिल्लीत
2. व्हीव्हीपॅट मोजणीमुळे लोकसभेचा निकाल उशिरा रात्री लागण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची माहिती, तर ईव्हीएमवरुन विरोधक आक्रमक
3. मुंबई भाजप अध्यक्षपदी मनोक कोटकांची वर्णी लागण्याची शक्यता, आशिष शेलार यांची दुसरी टर्म जूनमध्ये संपणार, महापालिकेतील कामगिरीमुळे कोटकांना संधी
4. मुंबईतील कॉन्व्हेंट शाळांकडून डबेवाल्यांना नो एन्ट्री, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय, मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे तोडगा काढण्याचे निर्देश
5. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल धोकादायक, 27 मे पासून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद, डोंबिवलीकरांची कोंडी
6. वर्ल्डकपसाठी टीम इंडिया इंग्लडला रवाना, दौऱ्यापूर्वी प्रशिक्षक रवी शास्त्री शिर्डीत साईंच्या चरणी, 30 मेपासून क्रिकेटचा महोत्सव