LIVE BLOG : राफेलप्रकरणी राहुल गांधी खोटं बोलत होते हे सिद्ध झालं : प्रकाश जावडेकर

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Apr 2019 10:49 PM
बुलेट ट्रेनसाठी 53,467 तिवरांची झाडं तोडण्यास केंद्र सरकारची परवानगी, तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडं लावण्याची नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची तयारी, 19 हेक्टरवरील एक लाख 50 हजार 752 झाडं तोडण्याच्या मूळ प्रस्तावातील पहिला टप्पा पार,
अंतिम निर्णय मात्र मुंबई उच्च न्यायालयाचा
काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना तीन दिवसांची प्रचारबंदी, आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई
वाराणसी-मुंबई कामायनी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात आग, मनमाड रेल्वे स्थानकावरील घटना, गाडी रेल्वे स्थानकावर थांबल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून मारल्या उड्या
राज्याच्या मुख्य सचिवांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, बीकेसीतील 'ड्राईव्ह इन थिएटर' प्रकरणी चौकशीचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, एसीबीच्या तपास अधिका-यांनी आवश्यक ती परवानगी घेतली नसल्याचा मदान यांचा दावा कोर्टाकडून मान्य
भाजपकडून नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी, पूर्व दिल्लीतून क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणूक लढवणार, उत्तर पश्चिम दिल्लीबाबत अद्याप निर्णय नाही
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याचा विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा नवी याचिका. मंगळवारी गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित. 26 एप्रिलला जाहीर होणार प्रवेशाची दुसरी यादी
'निवडणूक आयोगाची नियमावली प्रत्येक ठिकाणी लागू करणं बंधनकारक नाही', केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात भूमिका, अंगणवाडी सेविकांच्या इलेक्शन ड्युटीचा फैसला मंगळवारी, नियमात बसत नसतानाही पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांनाही निवडणुकीच्या कामासाठी बोलवल्याचा संघटनेकडून विरोध

भातावर माशी बसली तर भात खराब होत नाही, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला, राज ठाकरे राहुल शेवाळेंच्या विरोधात उभे राहीले, तरी जिंकणार नाही, मनोहर जोशींना विश्वास
#SriLankaAttacks : श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू होणार, राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांजी घोषणा
#SriLankaAttacks : श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू होणार, राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांजी घोषणा
राफेल प्रकरणी राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाची माफी मागावी लागली याचा अर्थ ते खोटं बोलत होते, काँग्रेस किती खोटा प्रचार करत होती हे यावरुन सिद्ध झाले आहे : प्रकाश जावडेकर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतील उमेदवारी अर्ज वैध, दोन तासांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय
अमरावती-परतवाडा महामार्गावरील वलगाव येथील पेढी नदी पुलावर खासगी बस आणि ट्रकची एकमेकांना टक्कर,
अपघातात बसचालकाचा मृत्यू झाल्याची स्थानिकांची माहिती,
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
अमरावती-परतवाडा महामार्गावरील वलगाव येथील पेढी नदी पुलावर खासगी बस आणि ट्रकची एकमेकांना टक्कर,
अपघातात बसचालकाचा मृत्यू झाल्याची स्थानिकांची माहिती,
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु, आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही

श्रीलंकेतल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. तीन भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 जण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच या बॉम्बस्फोटाशी संबंधित 24 संशयित सीआयडीच्या ताब्यात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
अमरावती-अकोला मार्गावर शिवशाही बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. मूर्तिजापूर तालूक्यातील नवसाळ फाट्याजवळ सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारांसाठी अमरावतीला हलवण्यात आलं आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत जय मातादी कम्पाऊंड इथे काबावत ब्रश कंपनीला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑईल पेंट आणि ब्रश आहेत. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल असून जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात तीन भारतीयांसह 262 जणांचा मृत्यू, 13 संशयित अटेकत, अद्याप कुणीही हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही

2. आम्ही अणुबॉम्ब फक्त दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, मोदींचा पाकिस्तानला इशारा, श्रीलंकेच्या घटनेवरुन मोदींचं राजकारण, काँग्रेसचा आरोप

3. तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

4. मोठ्या वादानंतर मनसेच्या सभेला अखेर परवानगी, 24 एप्रिलऐवजी 23 तारखेला राज ठाकरेंची मुंबईत सभा,

5. प्रचारादरम्यान पातळी सोडून शेरेबाजी, संघाच्या गणवेशावरून शरद पवारांचं  मोहितेंवर टीकास्त्र, तर मुख्यमंत्र्यांकडून चड्डी उतरवण्याची भाषा

6. अटीतटीच्या सामन्यात बंगलोरचा चेन्नई सुपर किंग्जवर विजय, अखेरच्या षटकात चेन्नईचा एका धावेने पराभव, धोनीची तुफान फलंदाजी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.