LIVE BLOG : 'शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Aug 2019 11:04 PM
कल्याण-अहमदनगर मार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचला. करंजाळे गावातील वेळखिंडी जवळ मार्गाला मोठ्या भेगा पडल्याने खबरदारी म्हणून माळशेज घाटातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. खचलेला मार्ग दुरुस्त करेपर्यंत माळशेज घाटातून अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक सतत चलनी नोटांचा आकार का बदलते?, हायकोर्टाचा #RBI ला सवाल. अन्य कोणत्या देशानं अशाप्रकारे सतत चलनात बदल केलेले नाहीत, मग आपल्याकडेच का?, मुंबई उच्च न्यायालयानं सहा आठवड्यांत मागितलं उत्तर
विरार : 9 वर्षाची मुलगी झोपलेली असताना तिला झोपेतून उचलून बाजूच्या रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड, विरार पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
मुंबईतील वांद्रे येथे उद्या (2 ऑगस्ट) सर्व विरोधी पक्षांची पत्रकार परिषद,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजू शेट्टी, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शेकापचे नेते उपस्थित राहणार
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सेंगरची भाजपमधून हकालपट्टी
सोलापूर : नितीन गडकरींना पुन्हा भोवळ
,
सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपाच्या वेळी राष्ट्रगीत सुरू असताना आली भोवळ
,
राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी खाली बसले आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला
,
मंचावर सुभाष देशमुख आणि कुलगुरू उपस्थित

नागपुरात ब्राम्हण सेनेकडून थाळी पीट आंदोलन,

ब्राह्मणांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी
जळगाव घरकुल घोटाळा, निकाल पुन्हा लांबणीवर, 26 ऑगस्टला पुढील कामकाज, सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सहा आरोपी वैद्यकीय कारणास्तव गैरहजर
रायगड : अलिबागजवळ वरसोली समुद्रात मच्छीमार बोट बुडाली ,

सर्व 8 खलाशी सुखरूप
,
पहाटेच्या सुमारास घडली घटना
सिंधुदुर्ग : देवगड - निपाणी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प,

असलदे शिवाजीनगर येथे कंटेनर मागे घेताना मातीत रुतला
,
कंटेनर राज्य मार्गावर अडकल्याने वाहतूक बंद
,
मध्यरात्री एक वाजल्यापासून वाहतूक ठप्प
चंद्रपूर : माजी काँग्रेस खासदार नरेश पुगलिया यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून मागितली पक्षाकडे उमेदवारी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आहेत ब्रम्हपुरीचे विद्यमान आमदार
सांगली-: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सभा ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती
,
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ,विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित
कोयणा धरणाच्या पायथा विद्युतगृहातून पाण्याचा विसर्ग सुरु,
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
नागपूरमध्ये 18 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, बेलतरोडी पोलीस स्टेशनअंतर्गत घटना, मित्राने त्याच्या एका मित्रासोबत दारु पाजून तरुणीवर बलात्कार, दोन्ही आरोपी अटकेत
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या 'आदित्य संवाद' कार्यक्रमानंतर शिवसेनेकडून 'माऊली संवाद' उपक्रमाला सुरुवात,

शिवसेना सचिव आदेश बांदेकर महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकातील महिलांशी संवाद साधणार
बारामती सत्र न्यायाधीशांविरोधात पत्नीचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना साकडं,

स्थानिक पोलीस आणि बारामती सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांकडे तक्रार करूनही कारवाई नाही 
,
कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, कोर्टानं ठरवलेली पोटगीची रक्कम देण्यासही टाळाटाळ

नाशिक : जिल्ह्यातील भावली, आळंदी आणि वालदेवी ही तीन धरणं 100 टक्के भरली, सलग चौथ्या दिवशी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच, गंगापूरसह इतर पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच
मुंबई : तुलसी, तानसा, मोडक सागर पाठोपाठ मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही ओव्हरफ्लो, मध्य वैतरणा आणि भातसा धरणाचे दरवाजे यापूर्वीच खुले करण्यात आले, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85.68 टक्के पाणीसाठी

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1.आजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथून यात्रेला प्रारंभ, 1 ते 31 ऑगस्टदरम्यानच्या दौऱ्यात राज्यातील विविध भागांना भेटी

2. खतांवरची 70 हजार कोटींची सबसिडी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, केंद्राचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचीही संख्या वाढवणार

3. शिवेंद्रराजे, चित्रा वाघ, पिचड पिता-पुत्र, नाईक बंधू भाजपात, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजीवर बोट, काँग्रेसचे कोळंबकरही भाजपवासी

4. ईव्हीएमबाबत न्यायालय आणि निवडणूक आयोगावरही विश्वास नाही, कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जींच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

5. तुलसी, तानसा, मोडकसागरपाठोपाठ विहार तलावही ओव्हर फ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85 टक्के पाणीसाठा, मध्य वैतरणा, भातसा धरणाचे दरवाजे खुले

6. करण जोहरच्या घरातल्या पार्टीच्या व्हीडिओवरून राजकीय वाद शिगेला, रेव्ह पार्टीच्या संशयावरून नेटिझन्सचे सवाल, मिलिंद देवरांकडून करणचा बचाव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.