LIVE BLOG : मसूदचा उद्या फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयाकडे लक्ष

Continues below advertisement

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत, मुलगा सुजयच्या उमेदवारीसाठी नगरची जागा सुटत नसल्याने हायकमांडविरोधात नाराजी

2. नातू पार्थसाठी शरद पवारांची लोकसभेतून माघार, मात्र माढातून लढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पवारांना गळ घालणार, पार्थसाठी अजितदादांच्या लॉबिंगची चर्चा

3.  राहुल गांधींकडून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा आदराने उल्लेख, भाजपकडून जोरदार टीका

4. लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून शड्डू ठोकणार, सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपचा फायदा होण्याची शक्यता

5. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणेंचा शिवसेनेत प्रवेश, सोनावणेंच्या पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर प्रचाराचा नारळ वाढवत असल्याची उद्धव ठाकरेंकडून घोषणा

6. मुंबई, नागपूर आणि मराठवाडा विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल, निवडणुकांच्या तारखांमुळे सीए परीक्षाही लांबणीवर

Continues below advertisement
23:23 PM (IST)  •  12 Mar 2019

प्रसिद्ध साहित्यिक , चित्रपट लेखक दिग्दर्शक वेद राही यांना
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा
कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार घोषित
23:54 PM (IST)  •  12 Mar 2019

भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार मसूद अजहरचा उद्या फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयाकडे लक्ष
23:11 PM (IST)  •  12 Mar 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर दाखल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणार बैठक, महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा,

युती झाल्यानंतर शिवसेना 23 तर भाजप 25 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार
23:53 PM (IST)  •  12 Mar 2019

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार, औरंगाबाद विभागात दीड लाख उत्तरपत्रिका पडून, दहावी बारावीचा निकाल रखडणार
23:52 PM (IST)  •  12 Mar 2019

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज ठाकरे आणइ राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार, राज ठाकरेंनी दहशतवादी हल्ल्याचं केलं होतं भाकीत, तर राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या घोषणेवर आक्षेप
22:18 PM (IST)  •  12 Mar 2019

चिंचपोकळी येथील डॉ. कम्पाऊंडमध्ये चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू,
गच्चीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज,
काळाचौकी पोलीस घटनास्थळी दाखल
22:39 PM (IST)  •  12 Mar 2019

शहरी नक्षलवाद आणि भिमा-कोरेगाव प्रकरण :

गौतम नवलखा यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यावरील याचिकेवर ८ आठवड्यांत निर्णय घ्या
,
सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश
21:04 PM (IST)  •  12 Mar 2019

इंदू मिलच्या जागेवरील आंबेडकर स्माकरच्या कोणत्या कामावर आत्तापर्यंत किती खर्च झाला? ,

तीन आठवड्यांत सविस्तर माहिती सादर करण्याचे हायकोर्टाकडून राज्य सरकारला निर्देश
21:10 PM (IST)  •  12 Mar 2019

वसई : वसईतील वसंत नगरी येथे अंगावर झाड पडून जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. सोमवारी 25 फेब्रुवारी रोजी अनेक वर्षापूर्वीचे धोकादायक स्थितीत असणारे हे झाड रस्त्यावर अचानक कोसळले होते.
21:12 PM (IST)  •  12 Mar 2019

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना महामंडळाची सदस्यपदं, तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेनं दिली महामंडळाची पदं
21:13 PM (IST)  •  12 Mar 2019

आज रात्री दहा वाजता माढा लोकसभा संदर्भात सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक , मुख्यमंत्र्यानी संजय शिंदे यांना तातडीचे भेटण्याचा निरोप दिल्याने शिंदे मुंबईकडे रवाना
21:28 PM (IST)  •  12 Mar 2019

दिलेल्या निर्देशांप्रमाणे कारवाईची प्रशासनाची इच्छा दिसत नाही - हायकोर्ट, ध्वनी प्रदुषणाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास नकार,

भविष्यात अश्या चुका पुन्हा होणार नाहीत, यासाठी काय करणार ते सांगा?, हायकोर्टाचा पोलीस आयुक्तांना सवाल

22:18 PM (IST)  •  12 Mar 2019

चिंचपोकळी येथील डॉ. कम्पाऊंडमध्ये चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू,
गच्चीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज,
काळाचौकी पोलीस घटनास्थळी दाखल
20:54 PM (IST)  •  12 Mar 2019

नारायण राणेंच्या स्वाभिमानला महाआघाडीत सामील करण्यासाठी हालचाली, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी, सुत्रांची माहिती
20:48 PM (IST)  •  12 Mar 2019

बालहट्ट मी का पूरवू, ती तर पालकांची जबाबदारी, सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांची तिखट प्रतिक्रया
20:46 PM (IST)  •  12 Mar 2019

शैलेश फणसे, भाऊ कोरगावकरांना महामंडळावर सदस्यपद
20:40 PM (IST)  •  12 Mar 2019

कोणत्याही राज्यात काँग्रेससोबत युती करणार नाही, बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो मायावतींचा निर्णय, तर पश्चिम बंगलामध्ये तृणमूल काँग्रेसचाही 'एकला चलो रे'चा नारा
16:43 PM (IST)  •  12 Mar 2019

अनिल अंबानी कागदाचं विमान बनवू शकत नाही,
मोदींनी हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानीच्या खिशात घातले : राहुल गांधी
16:38 PM (IST)  •  12 Mar 2019

16:32 PM (IST)  •  12 Mar 2019

16:22 PM (IST)  •  12 Mar 2019

गांधीनगर येथून काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांचं भाषण सुरु,
2 कोटी रोजगारांच्या आश्वासनांचं काय झालं, प्रियांकांचा पंतप्रधान मोदींना सवाल,
भावनिक मुद्द्यांपेक्षा विकास आणि रोजगारांवर बोलायला हवं : प्रियांका
16:21 PM (IST)  •  12 Mar 2019

16:21 PM (IST)  •  12 Mar 2019

गुजरातच्या गांधीनगर येथून काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांचं भाषण सुरु,
भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासावर बोलायला हवं,
तुमचं मत तुम्हाला मजबूत करणार आहे : प्रियांका गांधी
15:20 PM (IST)  •  12 Mar 2019

कॉलेज डायरी चित्रपटातील कलावंत आणि वितरक यांच्यात जंगली महाराज रोड परिसरात हाणामारी, पोलिसांची मध्यस्ती, पैसे जास्त घेऊन थिएटर कमी दिल्यामुळे झाला वाद
15:08 PM (IST)  •  12 Mar 2019

सुजय यांच्या प्रत्येक निर्णयामागे मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी दिली. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर त्या म्हणाल्या की, "निर्णय प्रक्रियेतही मी त्यांच्यासोबत आणि सहमत होते.

मला कधी त्यांना राजकीय सल्ला देण्याची गरज पडली नाही. पण प्रत्येक निर्णय आम्ही चर्चा करुन घेत असतो.

माझ्यापेक्षा त्यांना आई-वडिलांचा सल्ला अधिक मोलाचा आहे.

घरात फार राजकीय चर्चा करणं टाळतो

. सुजय यांच्या प्रचारात मी काम करणार आहे.

सध्या तरी सुजय यांच्यासोबत भाजपचाच प्रचार करणार आहे. सासरे राधाकृष्ण यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रचाराबाबत पुढे विचार करु."
15:03 PM (IST)  •  12 Mar 2019

14:45 PM (IST)  •  12 Mar 2019

मी जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच राहणार, पुढच्या काळात मी जनतेचं काम करणार, असं वक्तव्य अहमदनगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी केलं आहे. तसेच पार्टीने विखेचे स्वागत केले त्यामुळे मी करणे देखील क्रमप्राप्त आहे. असेही ते म्हणाले.
14:27 PM (IST)  •  12 Mar 2019

14:26 PM (IST)  •  12 Mar 2019

सुजय भाजपमध्ये गेला आहे आता तुम्ही शिवसेनेत यावं आणि युती मजबूत करावी अशी ऑफ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेस सोडली होती. ते राजकारणात इतकी वर्षे असतानाही मंत्रिपद मिळालं नव्हतं, तेव्हा शिवसेनेने ते दिलं होतं. तिसरी पिढी भाजपसोबत जाते, चांगली गोष्ट आहे. यामागे काय तडजोड झाली माहित नाही. शिवसेना-भाजप युतीवेळी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांनी आता तपासावं. घर सांभाळू शकत नाहीत. त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो, उद्धव ठाकरेंवर टीका करताना भान ठेवायला हवं होतं. भविष्यात काय वाढून ठेवलंय ते बघायला हवं होतं. त्यांना आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. राधाकृष्ण विखेंनी आता शिवसेनेत यावं.
14:02 PM (IST)  •  12 Mar 2019

14:00 PM (IST)  •  12 Mar 2019



14:01 PM (IST)  •  12 Mar 2019



14:04 PM (IST)  •  12 Mar 2019



14:00 PM (IST)  •  12 Mar 2019



13:59 PM (IST)  •  12 Mar 2019

सुजय विखे पाटील यांच्या घरच्यांनासुद्धा आज नाही तर उद्या त्यांचा निर्णय योग्य असल्याचं लक्षात येईल : मुख्यमंत्री
13:01 PM (IST)  •  12 Mar 2019

12:54 PM (IST)  •  12 Mar 2019

मुंबई : भाजपात प्रवेश करणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या हाती स्टिअरिंग, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर जाताना सुजय विखे पाटील ड्रायव्हिंग सीटवर, तर गिरीश महाजन बाजूच्या सीटवर
12:40 PM (IST)  •  12 Mar 2019

वंचित आघाडीत फूट पडण्याची चिन्हे, औरंगाबादसह राज्यातील दोन ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एआयएम आग्रही, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील एमआयएमचे नेते ते हैदराबादेत
11:47 AM (IST)  •  12 Mar 2019



11:33 AM (IST)  •  12 Mar 2019

मुंबई : सुजय विखे पाटील गिरीश महाजन यांच्या भेटीला, महाजनांच्या शासकीय निवास्थान असलेल्या 'शिवनेरी'वर दाखल, थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
11:08 AM (IST)  •  12 Mar 2019



11:08 AM (IST)  •  12 Mar 2019



11:05 AM (IST)  •  12 Mar 2019



11:05 AM (IST)  •  12 Mar 2019



10:43 AM (IST)  •  12 Mar 2019

10:42 AM (IST)  •  12 Mar 2019

10:39 AM (IST)  •  12 Mar 2019

शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, नातू रोहित पवार यांचं फेसबुक पोस्टद्वारे आजोबांना आवाहन
10:18 AM (IST)  •  12 Mar 2019

10:16 AM (IST)  •  12 Mar 2019

अकोला : काँग्रेससोबतच्या चर्चा पुढे जाणे शक्य नाही, 15 मार्च रोजी संपूर्ण 48 जागा जाहीर करु : प्रकाश आंबेडकर
10:14 AM (IST)  •  12 Mar 2019

पिंपरी चिंचवड : सैल झालेल्या दरडी हटवण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष ब्लॉक, आजपासून 20 मार्चपर्यंत दुरुस्तीचं काम सुरु राहणार
09:21 AM (IST)  •  12 Mar 2019

09:23 AM (IST)  •  12 Mar 2019

10:16 AM (IST)  •  12 Mar 2019

09:19 AM (IST)  •  12 Mar 2019

नागपूर : नाना पटोले यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी नागपुरातील अनेक दलित विचारवंत, कार्यकर्ते आणि संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ई-मेलद्वारे केली आहे. खैरलांजी हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका, आरोपींच्या बचावासाठी केलेले प्रयत्न, हे पाहता त्यांची नागपुरातील उमेदवारी दलित समाजाला दुखावणारी ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे.
07:57 AM (IST)  •  12 Mar 2019

07:43 AM (IST)  •  12 Mar 2019

आगामी लोकसभा निवडणुकांमुळे सीए परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. 11 एप्रिल ते 23 मे 2019 पर्यंत निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरु असल्याने सीए परीक्षा 2 मे ते 17 मे 2019 ऐवजी आता 27 मे ते 12 जून 2019 दरम्यान होणार आहे, अशी माहिती आयसीएआयने दिली आहे.
Sponsored Links by Taboola