LIVE BLOG : राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चेसाठी शरद पवारांचा मोदींना फोन

Advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Aug 2019 10:35 PM
राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चेसाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. राज्याला केंद्राची मदत मिळावी, यासाठी पवारांनी मोदींना विनंती केली. तसेच अल्मट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाली.
Continues below advertisement
#Breaking श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने माजी अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

पार्श्वभूमी

१. सांगली, कोल्हापुरात महापुरचा चौथा दिवस, राज्यात आतापर्यंत महापुरामुळे 28 जणांचा जीव गेला, आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

२. मुख्यमंत्र्यांकडून पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन, तर शरद पवारांकडून पूरग्रस्त भागासाठी 100 टक्के कर्जमाफीची मागणी, माझाच्या आवाहनानंतर राजकीया यात्रा रद्द

३. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्रपटसृष्टी सरसावली, सुबोध भावे,  रवी जाधव, भाऊ कदम, मंगेश देसाईचा पुढाकार

४. भारतातील 19 विमानतळांवर हायअलर्ट जाहीर, मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, लखनऊ विमानतळांवर कडेकोट सुरक्षा

५. कलम-370 रद्द केल्यानं काश्मीरचा विकास होईल, पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन, योग्य वेळी काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचही सुतोवाच

६. सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाली, प्रतितोळा 38 हजार रूपयांवर दर, रूपयाची घसरण आणि अमेरिका-चीन मधील तणावाचा फटका

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.