LIVE BLOG : आज दिवसभरात... 04 ऑगस्ट 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2019 07:23 AM

पार्श्वभूमी

1. सलग दुसऱ्या दिवीशीही मुंबईसह परिसरात पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी रात्रीतून दमदार पाऊस.. मुंबई, ठाण्यात आज दिवसभर मुसळधार कोसळण्याचा इशारा


2. मुसळधार पावसाने सीएसएमटी ते वाशी हार्बर बंद, तर मध्यरेल्वेवर बदलापूरजवळ ट्रॅकवर पाणी, अंबरनाथपासून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक बंद

3. नवी मुंबईतल्या प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर 4 तरूणी वाहून गेल्या, 3 मृतदेह शोधण्यात यश, एक तरूणी अजूनही बेपत्ताच


4. भारतीय जवानांकडून जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला


5.आदित्य ठाकरेंच्या उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात देवेंद्र फडणवीसांची विरोधाभासी विधान, तर  पक्षानं संधी दिल्यास चंद्रकांतदादा मुख्यमंत्री बनण्यास उत्सुक


6. पिंपरीमध्ये रामदास आठवलेंकडून अण्णाभाऊ साठेंच्या गीताचं विडंबन, तर बँड पथकाला शिवीगाळ, चूक लक्षात येताच सारवासारव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.