LIVE BLOG : मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब पडल्याची माहिती, स्लॅब ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे हार्बर मार्ग ठप्प
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 03 Aug 2019 11:05 PM
पार्श्वभूमी
1. राज ठाकरे ईडीच्या रडारवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, कोहीनूर मिलचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात2. ईव्हीएमबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी ...More
1. राज ठाकरे ईडीच्या रडारवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, कोहीनूर मिलचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात2. ईव्हीएमबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार3. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं मिशन विधानसभा सुरु तर शिवसेनेसाठी आजपासून बांदेकर भावोजींचा माऊली संवाद, जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य आज नांदेड, परभणीत4. राष्ट्रवादी सोडणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल, गयारामांना शरद पवारांचा टोला, तर कुरघोड्या थांबल्या नाहीत म्हणून पक्ष सोडल्याचा शिवेंद्रराजेंचा पलटवार, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची शपथ5. राज्यभरात पावसाची संततधार, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले, हतनूर धरणाच्या 36 दरवाजांमधून विसर्ग सुरु, नाशिक चंद्रपुरातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला6. पाकिस्तानच्या ताब्यातील कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानचा निर्णय
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद - मुंबई गोवा महामार्गावरील वांद्रीनजीकच्या बावनदी पुलावरील वाहतूक बंद, बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक पूर्ववत होत असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती