Live Blog | मुंबईसह परिसरात पावसाला जोरदार सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने दाणादाण उडाली, लोकल खोळंबल्या

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचे सर्व अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jun 2019 11:55 PM

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर1. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषकातला दुसरा विजय साजरा, धवन, विराट, रोहितची दमदार बॅटिंग; भुवनेश्वर, चहल, बुमराची गोलंदाजीत कमाल2. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांसोबतच्या कोअर...More

मुंबई मध्ये काही वेळापासून पहिल्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.मुंबई उपनगरात, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर , मानखुर्द, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहिसर अश्या सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.गेले काही दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते.त्यामुळे पाऊस मुंबईत कधी दाखल होतो याची वाट सर्वच मुंबईकर पाहत होते.अचानक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची मात्र तारांबळ उडाली आहे.