LIVE BLOG : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेणार

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jul 2019 11:52 PM
नागपूर-उमरेड मार्गावर कुही फाट्याजवळ ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात, तिघांचा मृत्यू तर 8 प्रवाशी गंभीर जखमी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेणार, महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार भेट, विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरा विरोधात चर्चा करणार
जेजुरी : जेजुरी येथील पेशवे तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, पोहायला गेलेल्या  दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून  मृत्यू,
आदर्श मनोहर उबाळे (7), आदित्य संभाजी कोळी (वय 8) चिमुकल्यांची नावे
नाशिकमध्ये अखेर पावसाने विश्रांती घेतली
द्रुतगती मार्गावरील अमृतांजन ब्रीज जवळ साधारणपणे एक ते दीड किलोमीटर ट्राफिक जॅम, पुणे लेनवर वाहनांची मोठी गर्दी, सुट्टीचा परिणाम, वाहतूक धीम्या गतीने
नाशिक : नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 25 टक्के भरलं, आज एकाच दिवसात पाणीसाठ्यात 12 टक्के वाढ, पाणीकपात रद्द होण्याचे महापौरांनी दिले संकेत, उद्या महापौर बैठक बोलावणार
सातारा : कराड तालुक्यातील गोटेवाडी गावातील बंधारा फुटला, शेकडो एकर जमीन पाण्याखाली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
नवी दिल्ली : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे याचा सरचिटणीस पदाचा राजीनामा
नाशिक त्र्यंबक रस्ता बंद
, पिंपळगांव बहुलाच्या पुलावर पाणी
, सकाळी 8 ते 4 पर्यंत त्र्यंबकला 160 मिमी पाऊस
नागपूर : पाण्याच्या टाकीत पडल्याने तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, वंशिका वर्मा असं मृत मुलीचं नाव, कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरातील घटना

भांबवली कास रोडवरील घाटात दरड कोसळली,
भांबवली धबधबा जाण्यासाठीचा मार्ग बंद,
पुण्यातील आठ पर्यटकांची गाडी गावातच अडकली

डोंगराचा एक भाग रस्त्यावर, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सह्याद्रीनगर ते आंधारी रोडवरील वाहतूक ठप्प,,साताऱ्यातील कास जवळील कोळघर येथील घटना


अकलूजमध्ये पार पडले तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगन

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. आज सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या सराटी येथे तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी होती.
नागपूर : खेळताना घरातील बाथरुममधील पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू,
वंशिका मुकेश वर्मा असे मृत मुलीचे नाव आहे
नाशिक : शहरातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी 4 टक्क्यांनी वाढली,
शहरात पाणीकपात सुरु आहे तर दुसरीकडे गोदावरीला पूर
तिवरे धरणफुटी प्रकरण : दुर्घटनेनंतर सहाव्या दिवशी दिड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सपाडला,
धरण परिसरात एनडीआरएफची शोधमोहीम पुन्हा सुरु
आतापर्यंत 20 मृतदेह सापडले
संत तुकाराम महाराजांची पालखी काल सराटीहून निघाली. अकलूजमधील माने विद्यालयात पालखी मुक्कामी. आज पालकीचं गोल रिंगण

पार्श्वभूमी

1. कर्नाटकातील 11 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात, राजीनामा देणारे आमदार मुंबईत दाखल, काँग्रेसचा घोडेबाजाराचा आरोप

2. पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी नव्हे तर 5 रुपयांनी भडकण्याची शक्यता, फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांची माहिती, तर पंतप्रधान मोदींकडून इंधन दरवाढीची पाठराखण

3. नव्या काँग्रेस अध्यक्षांबाबत उत्सुकता कायम, युवा नेत्याला अध्यक्षपद देण्याच्या मागणीला जोर, ज्येष्ठांच्या नावांना विरोध

4. मुसळधार पावसामुळे कोकणातल्या वशिष्ठी, जगबुडी नदीला पूर, जुलै उजाडूनही मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचे डोळे आभाळाकडेच

5. नीरा नदी कोरडी पडल्याने संत तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान, पालखीचे अकलुजच्या दिशेने प्रस्थान, ज्ञानोबांच्या पालखीचे आज पहिले गोल रिंगण

6. मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई, दुचाकीसाठी पाच हजार तर तीन चाकी वाहनांना 8 हजार रुपयांचा दंड

7. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही फ्री पार्किंगला हरताळ, महापालिकेची नोटीस अधिकृत मानायला मॉल्स चालकांचा नकार

8. इंग्लंडमध्ये भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या, बीसीसीआयची पाकिस्तानवर बंदी घालण्याची आयसीसीकडे मागणी

9. श्रीलंकेविरोधात भारताचा दमदार विजय, शतक झळकावत रोहित शर्माचा एकाच विश्वचषकात सर्वाधिक 5 शतकं ठोकण्याचा विक्रम, के.एल राहुलचंही शतक

10. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, नऊ जुलैला भारताचा सामना न्यूझीलंडशी, अकरा जुलैला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत मुकाबला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.