LIVE BLOG : मुख्यमंत्री मराठवाड्याची दुष्काळ आढावा बैठक घेणार
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मराठवाड्याची दुष्काळ आढावा बैठक, वर्षा निवास्थानी कॉन्फरन्स कॉलवर औरंगाबाद आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेणार दुष्काळाचा आढावा, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंचांना उपस्थित राहण्याच्या सूचना
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 May 2019 11:02 PM
#MIvCSK : मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक, चेन्नई सुपरकिंग्जवर सहा विकेट्सनी मात
राजीव गांधी 'भ्रष्टाचारी नंबर 1' असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टिपणीत प्रथमदर्शनी काहीच आक्षेपार्ह वाटत नाही, पंतप्रधानांचं वक्तव्य आदर्श आचारसंहितेचा भंग नसल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा
#MIvCSK : Qualifier 1 - मुंबई इंडियन्सला विजयासाठी चेन्नई सुपरकिंग्जचं 132 धावांचं आव्हान
केंद्राकडून राज्याला दुष्काळासाठी आणखी एक हप्ता, 2 हजार 160 कोटी रुपयांची महाराष्ट्राला मदत, आतापर्यंत 4248.59 कोटी रुपयांची मदत मिळाली, मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे ट्विटरवर आभार
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मराठवाड्याची दुष्काळ आढावा बैठक, वर्षा निवास्थानी कॉन्फरन्स कॉलवर औरंगाबाद आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेणार दुष्काळाचा आढावा, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंचांना उपस्थित राहण्याच्या सूचना
माजी आमदार मंगेश सांगळे यांना हायकोर्टाचा दिलासा. विनयभंग प्रकरणी तूर्तास अटक न करण्याचे पोलीसांना निर्देश. ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सांगळेंची हायकोर्टात धाव
टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना तूर्तास दिलासा, सेवेतून कमी करण्यात येऊ नये आणि वेतनही बंद करु नये, यासंदर्भातील शालेय विभागाचे शिक्षण संचालकांना आदेश, राज्यातील पंधराशे ते सोळाशे शिक्षण सेवकांना फार मोठा दिलासा
परिवहन विभागात पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होण्याची शक्यता, परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांचं परिवहन आयुक्तांना पत्र, मोटार वाहन निरीक्षक पदावरुन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती नाकारणाऱ्यांना सरकारचा दट्ट्या
अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाहातून घडलेल्या हत्या प्रकाराची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल, जिल्हा पोलिस अधीक्षकांना कडक कारवाई करण्याचे निर्देश
पुणे : लोणावळ्याजवळ कार्लागडावरील एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणारे दोघे अटकेत, दीड वर्षांनंतर औरंगाबादचे राहुल गावंडे ,सोमनाथ गावंडे गजाआड
आयसीएसई बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर, यंदा आयसीएसई परीक्षेचा निकाल 98.54 टक्के, मागील वर्षीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढ
सोलापूर : शेतीवरील कर्जाला कंटाळून मोहोळ तालुक्यातील तुकाराम माने या शेतकऱ्याची आत्महत्या, विषारी किटकनाशक प्राशन करुन केली आत्महत्या, युनियन बँकेचे 12 लाखाचे होते कर्ज
सोलापूर : शेतीवरील कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, - युनियन बॅंकेचे 12 लाखाचे होते कर्ज, तुकाराम माने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव, मोहोळ तालुक्यातील येनकी गावचे रहिवासी
सोलापूर : शेतीवरील कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, - युनियन बॅंकेचे 12 लाखाचे होते कर्ज, तुकाराम माने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव, मोहोळ तालुक्यातील येनकी गावचे रहिवासी
आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांविरोधात मुलीची हायकोर्टात याचिका, पुणे पोलीसांना मुलीची तक्रार नोंदवून तक्रारदारांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
सिंधुदुर्ग :
सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकावर परिणाम
सोलापूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केल्याचे पडसाद सोलापुरात पाहायला मिळतायत.
सोलापुरात पंतप्रधान मोदींच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे सोलापूर अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केल्याचे पडसाद सोलापुरात पाहायला मिळतायत.
सोलापुरात पंतप्रधान मोदींच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे सोलापूर अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूर : एका दुचाकीमध्ये पेट्रोल भरले जात असताना अचानक बाईकने पेट घेतला, सीए रोडवरील पेट्रोल पंपावरची सकाळी 11 वाजताची घटना
सांगली : सांगलीतील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत नशेच्या गोळ्या देऊन शरीरसंबंध ठेवत ते फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणास अटक, बदनामी, फसवणूक, बलात्कार असे गुन्हे तरुणावर दाखल, तरुणाला सांगली शहर पोलिसांनी अहमदनगरमधून अटक
नवी दिल्ली : विरोधी पक्षाने केलेली व्हीव्हीपॅट संदर्भातील याचीका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, 50 टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती
हिंगोली : कळमनुरी शहरात आज परशुराम जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शिवाजी चौक येथून काढण्यात आली.
धुळे : गॅस सिलेंडरला गळती लागून घराला आग, आई - मुलासह तिघे जखमी, धुळे शहरातील देवपूर भागातील गल्ली क्रमांक सात मधील घटना
धुळे : गॅस सिलेंडरला गळती लागून घराला आग, आई - मुलासह तिघे जखमी, धुळे शहरातील देवपूर भागातील गल्ली क्रमांक सात मधील घटना
साध्वी प्रज्ञा सिंहविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रचार करणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचार करण्यासाठी भोपाळला जाणार आहेत. त्यांच्यासोबत कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे देखील असतील. पुढील तीन दिवस ते साध्वीविरोधात प्रचार करणार आहेत.
प्रज्ञा साध्वींच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रचार करणार, प्रज्ञा साध्वींच्या विरोधात प्रचारासाठी भोपाळला जाणार, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत कन्हैय्या, जिग्नेश मेवानींचा फौज
नालासोपारा : वसई - नालासोपारा भागातील 'किंग्ज युनायटेड' या 15 मुलांच्या ग्रुपने अमेरिकेतील 'वर्ल्ड ऑफ डांस' या कार्यक्रमात विजेतेपद जिंकून 'वर्ल्ड चॅम्पियन' होण्याचा मान मिळवला आहे. त्यांना मानचिन्ह आणि एक कोटी रुपयांचं बक्षीस देवून गौरविण्यात आलं आहे. अमेरिकेत रविवारी 5 मे रोजी याची अंतिम फेरी झाली.
दादरच्या श्री उद्यान गणेशाला 2100 आंब्यांची आरास,
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज उद्यान गणेश मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली आहे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान-देसाई बंधु यांच्यातर्फे 'श्रीं'च्या चरणी आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय.
बुलडाणा: आज सायंकाळी होणार सुप्रसिद्ध भेंडवडची घटमांडणी, पिकपाण्याच्या भविष्यवाणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
सिंधुदुर्ग : मातोंड येथे देवस्थान मानपानावरून दोन गटात हाणामारी, काल रात्रीची घटना, मातोंड-पेंडूर येथे बकऱ्यांचे मान कोणी द्यावेत यातून झाला वाद
अक्षयतृतीयेनिमित्त विठ्ठल मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट , हजारो भाविक दाखल
पार्श्वभूमी
1. राहुल गांधींनी बुथ कॅप्चर केल्याचा स्मृती इराणींच्या आरोपानं पाचवा टप्पा गाजला, उत्तरेकडच्या दिग्गजांची मतपरीक्षा पूर्ण, धोनीची सपत्नीक मतदानाला हजेरी
2. महिला अधिकाऱ्यानं लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून सरन्यायाधीशांची मुक्तता, न्यायमूर्तींच्या त्रिसदस्यीय समितीकडून रंजन गोगोईंना क्लीन चिट,
3. विदर्भात उष्णतेची लाट कायम, आज आणि उद्या विदर्भातील जिल्ह्यात पारा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
4. आंतरजातीय विवाह केल्यानं बापानं लेकीला जावयासह जिवंत जाळलं, मुलीचा मृत्यू, जावयाची प्रकृती गंभीर, सैतान बाप फरार
5. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली, मुंबई महापालिका आणि शिवसेनेला मोठा दिलासा
6. आयपीएलचा आज पहिला क्वालिफायर सामना, रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने