LIVE BLOG : आज दिवसभरात... 6 जून 2019

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2019 07:33 AM
सिंधुदुर्ग

: मालवण शहर आणि परिसरात सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात, ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटही सुरु. मालवण परिसरातील बत्ती गुल

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाची विश्वचषकात विजयी सलामी; रोहित शर्माचं नाबाद शतक, चहलच्या चार विकेट्स भारताच्या विजयात मोलाच्या

2. रायगडावर 346 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना, सकाळी 10 वाजता सुवर्ण अभिषेक

3. मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार, कोकणातही 10 जूनला आगमन, हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

4. नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे आज अंबाबाईच्या चरणी,  १५ जूनला अयोध्येला जाऊन रामलल्लाचंही दर्शन घेणार

5. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज दिल्लीत ईडीकडून चौकशी, कथित एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी पटेल यांना समन्स

6. जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसवण्याच्या भाजपच्या हालचालींची चर्चा, अमित शाह विधानसभा मतदारसंघाची फेररचना करणार असल्याची माहिती

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.