LIVE BLOG : रत्नागिरी : तिवरे धरण फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पथकाची स्थापन
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
06 Jul 2019 10:41 PM
World Cup 2019 | भारत वि. श्रीलंका सामना, भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सनी दणदणीत विजय, रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची निर्णायक खेळी
उस्मानाबाद : कळंबमध्ये 2 गटात हाणामारी, दरम्यान गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात 3 जण जखमी, अंबाजोगाई जवळील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु
भारत वि. श्रीलंका : रोहित शर्मानं विश्वचषकात पाचवं शतक झळकावलं, एकाच विश्वचषकात पाच शतकं ठोकण्याचा रोहितचा विक्रम
रत्नागिरी : तिवरे धरण फुटीप्रकरणी जीवित आणि वित्तहानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापन
मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे बंद, वशिष्टी आणि जगबुडी नदीला पूर
रत्नागिरी : कापसाळ सांडवा 'ओव्हरफ्लो', पुलावरून पाणी जाऊ लागल्याने माटेवाडीचा संपर्क तुटला
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
भिवंडीत मुसळधार पावसाने रस्ते गेले पाण्याखाली, रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर पहाटेनंतर वाढल्याने शहरातील असंख्य सखल भागात पाणी साचल्याने घरात व दुकानात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील दोन वर्षांपासून गोपालनगर परिसरात पाणी साचत असून पालिकेनं पाणी निष्कासित करण्यासाठी कोणताही उपाययोजना न केल्याने पुन्हा भिवंडी पाण्याने तुंबली आहे
भिवंडीत मुसळधार पावसाने रस्ते गेले पाण्याखाली, रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर पहाटेनंतर वाढल्याने शहरातील असंख्य सखल भागात पाणी साचल्याने घरात व दुकानात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील दोन वर्षांपासून गोपालनगर परिसरात पाणी साचत असून पालिकेनं पाणी निष्कासित करण्यासाठी कोणताही उपाययोजना न केल्याने पुन्हा भिवंडी पाण्याने तुंबली आहे
कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात,
12 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत,
काँग्रेसचे 9 आणि जेडीएसचे 3 आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला
इंधन दरात 5 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव,
पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता,
काल मध्यरात्रीपासून 2 रुपयांनी इंधन महागले
महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला,
महाबळेश्वर - पाचगणी रोडवर पाणी, वाहतूक धिम्या गतीने
वेण्णालेकमधील पाणी रस्त्यावर, पाऊस वाढल्यास वाहतूक थांबणार
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीसोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, जिजाऊ फेडरेशनचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी पायी इंदापूर ते विठ्ठलवाडी अशी केली वारी
अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथील भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता आखरे यांचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने मृत्यू, शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी हजर नसल्याने उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप
सिंधुदुर्ग
समुद्री लाटांच्या तडाख्यात देवबाग ख्रिश्चनवाडीतील बंधारा वाहून गेला
२० घरांना धोका, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
सिंधुदुर्ग :
कणकवलीच्या नाक्यांवर काँग्रेस आमदार नितेश राणे यांना पाठिंब्याचे पोस्टर्स,
उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुनावण्यात आली आहे 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी.
भिवंडी : कल्याण नाका ,कमला हाॅटेल, बाजारपेठ ,नदीनाका या परिसरात साचले पावसाचे पाणी
भिवंडी : कल्याण नाका ,कमला हाॅटेल, बाजारपेठ ,नदीनाका या परिसरात साचले पावसाचे पाणी
गडचिरोली: काल झालेल्या वादळी पावसामुळे आलापल्ली- एटापल्ली मार्ग झाला बंद, अनेक जागी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल ,रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांगा, प्रवासी जंगलात अडकून पडले
एकीकडे पाऊस सुरु असताना दुसरीकडे मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रकला अपघात झालाय, यात एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले आहेत, जोगेश्वरीजवळच्या महामार्गावरच ट्रक उलटल्यानं प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालीय, महामार्गावरुन ट्रक बाजूला करण्याचं काम सध्या चालू आहे,
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली. अप लाईन म्हणजे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर ही दरड पडल्याची माहिती. मंकीहिल दरम्यान सव्वा नऊ वाजता ही घटना घडली. कोणतीही रेल्वे अडकलेली नाही.
भिवंडी : भिवंडीत रात्रीपासून पाऊस कोसळत असून शहरातील व ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे तर अनेक घरात व दुकानात पानी शिरलं आहे
नंदुरबार जिल्ह्यात रात्री पासून पावसाची रिमझिम सुरू
मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात, जोगेश्वरीजवळ भाजीचा ट्रक उलटून अपघात, एकाचा मृत्यू, वाहतूकीचीही कोंडी
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
१. अर्थसंकल्पानंतर इंधनदरवाढ पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ, सोन्यालाही झळाळी, स्वस्त घर खरेदीवर साडेतीन लाखांची सूट
२. अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय नाराज, टॅक्स स्लॅबमध्ये जैसे थे, कररचनेत बदल केल्यानं कॉर्पोरेट जगताला दिलासा
३. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा याचिकाकर्त्याचा दावा
४. अधिकाऱ्यावर चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठ़डी, कणकवली न्यायालयाचा निर्णय
५. तिवरे धरणफुटीला जबाबदार खेकड्यांवर कारवाई करा, जलसंधारण मत्र्यांच्या अजब दाव्याचा निषेध करताना जितेंद्र आव्हाडांची मागणी,
६. पाकिस्तानचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेटचं समीकरण पाकिस्तानच्या आवाक्यातून निसटलं