LIVE BLOG। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदीमुक्त भारताचा संकल्प करा : राज ठाकरे

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत असून ठिकाठिकाणी ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात येत आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Apr 2019 09:10 PM
अमित शाहांनी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केले की आम्ही 250 दहशतवादी मारले,
अमित शाह स्वतः गेले होते का को पायलट म्हणून?
एअर चीफ मार्शल म्हणतात की, आम्हाला किती माणसं गेली याचा आकडा देता येणार नाही मग भाजपने कुठून हा शोध लावला, राज ठाकरेंचा सवाल
नोटाबंदी होणार म्हणून अनेकांनी आधीच जमिनी घेऊन ठेवल्या : राज ठाकरे
अमित शाहांनी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केले की आम्ही 250 दहशतवादी मारले,
अमित शाह स्वतः गेले होते का को पायलट म्हणून? राज ठाकरेंचा सवाल
देशाचा पंतप्रधान कोण होणार हे कधीच ठरवलं नव्हतं : राज ठाकरे
पाकिस्तानचे विमान पाडले असे नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितले होते,
परंतु अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेली सर्व एफ-16 विमानं जशीच्या तशी आहेत,
पाकिस्तानचे कोणतेही विमान पाडलेले नाही, असं अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे : राज ठाकरे
मोदींनी नोटबंदीला स्वत:च्या आईला रांगेत उभं केलं, राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातला फरक आहे की नाही? राज ठाकरे
भाजपने कॉंग्रेसच्या आधीच्या योजनांची नावं बदलून पुन्हा त्याच राबवल्या- राज ठाकरे
LIVE UPDATE । योजनांची नावे द्यायला या देशात मोठी माणसं जन्मली नाहीत का ? : राज ठाकरे
आमच्या पंतप्रधानांची ओळख जगभरात फेकू अशी असते, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींचं नाव येतं. ही माझ्या पंतप्रधानांची इमेज आहे जगभरात : राज ठाकरे
पंतप्रधान असून मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, कोणत्या प्रश्नांची भिती वाटते? : राज ठाकरे
मोदींनी जी स्वप्नं दाखवली, ती खोटी का असेना त्याची दाद द्यायला हवी- राज ठाकरे
LIVE UPDATE । ज्या माणसाने सत्तेपर्यंत पक्ष आणला, त्या माणसाची अवस्था काय? : राज ठाकरे
मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून न निवडणूक न लढवता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे, त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला : राज ठाकरे


येत्या काही दिवसात माझ्या महाराष्ट्रभर 8 ते 10 सभा होणार आहेत : राज ठाकरे
देशावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे मोठे संकट आले आहे,
हे संकट दूर करण्यासाठी मी हवं ते करेन : राज ठाकरे


नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांचे संकट आले आहे, ते दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार : राज ठाकरे


राज ठाकरेला काँग्रेस आणि एनसीपीवाले वापरून घेतात असं म्हणतात, मी येडा नाही : राज ठाकरे


शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रती महाराष्ट्रातील जनतेचा राग अद्याप कमी झालेला नाही : नरेंद्र मोदी
शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रती महाराष्ट्रातील जनतेचा राग अद्याप कमी झालेला नाही : नरेंद्र मोदी
काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या शिकवतात, दिल्लीतल्या सभेत सोनिया गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, देशातील विविधता पसंत नसल्याचा भाजप नेत्यांवर निशाणा
हिंगोली : शार्ट सर्किट झाल्याने झोपडपट्टीमधील घराला लागली आग, अग्निशामन दलाने आग वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला, हिंगोलीमधील वसमत तालुक्यातील घटना
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, मोदींनी मराठीत दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
थोड्याच वेळात दादरच्या शिवतीर्थावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार तर नांदेडमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींची सभा
नागपूर : आरपीआय खरात गटाचे सचिन खरात हे देवेंद्र फडणवीस ह्यांच्याविरोधात दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून लढणार, अजित पवारांशी प्राथमिक चर्चा
इंदापूर :


सरडेवाडी टोल नाक्यावर भरारी पथकाने रोकड पकडली,
फॉर्च्युनर गाडीत सापडले नऊ लाख 70 हजार रुपये, रोख रकमेसह एक जणांना ताब्यात घेतले, रकमेचा तपशील नसल्याने रक्कम जप्त,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची कारवाई
पालघर : मतदार जागृती अभियानांतर्गत पालघर येथे ‘मी मतदान करणारच’ मोहीम पालघर रेल्वे स्थानकात अभियानासाठी तयार केलेल्या ‘मी मतदान करणारच’ या विशेष बॅनरवर सह्या करून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. पालघर जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी या लोकसभा महापर्वात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
पालघर : मतदार जागृती अभियानांतर्गत पालघर येथे ‘मी मतदान करणारच’ मोहीम पालघर रेल्वे स्थानकात अभियानासाठी तयार केलेल्या ‘मी मतदान करणारच’ या विशेष बॅनरवर सह्या करून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. पालघर जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी या लोकसभा महापर्वात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
कोल्हापूर : हातकणंगलेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींना निवडणूक आयोगाची नोटीस, ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत 24 तासात खुलासा करण्याची नोटीस, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांचे आदेश
कोल्हापूर : हातकणंगलेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींना निवडणूक आयोगाची नोटीस, ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत 24 तासात खुलासा करण्याची नोटीस, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांचे आदेश
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेश
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेश
बुलडाणा : विहिरीत खोदकामासाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरुन मृत्यू, बुलडाण्यातील जामोद येथील घटना
लातुरच्या क्रांती नगरमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या, फिरोज सय्यद आणि तरन्नुम शेख अशी दोघांची नावे

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताला महाराष्ट्र सज्ज, डोंबिवलीत 70 फूट लांबीची भव्य रांगोळी, तर ठाण्यातील मासुंदा तलावही दिव्यांनी उजळला

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, नांदेडमध्ये संध्याकाळी जाहीर सभा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

3. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा, शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी जाहीर सभा, मोदी आणि भाजपाविरोधात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

4. लालकृष्ण अडवाणींना मोदींनी जोडे मारुन स्टेजवरुन उतरवलं, चंद्रपुरात राहुल गांधींचा गंभीर आरोप तर पुण्यात राहुल गांधींच्या मोदीप्रेमावर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

5. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका, पहिल्या पन्नासमध्ये सहा मराठमोळे चेहेरे, सृष्टी देशमुख देशात मुलींमधून पहिली तर तृप्ती धोडमिसे सोळावी

6. कोलकाता नाईट रायडर्सचा बंगलोरवर पाच विकेटसनी विजय, आंद्रे रसेलची 48 धावांची तुफानी खेळी, बंगलोरचा आयपीएलमधला सलग पाचवा पराभव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.