LIVE BLOG | सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणारच : राहुल गांधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी 15 एप्रिलला सोलापुरात सभा घेणार
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 06 Apr 2019 12:11 AM
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. लोकसभा निवडणुकीआधाची पंतप्रधान मोदींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, सकाळी 8 वाजता एबीपी माझावर प्रक्षेपण2.चौकीदाराची चौकशी करुन तुरूंगात टाकणार, नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, आज...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. लोकसभा निवडणुकीआधाची पंतप्रधान मोदींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, सकाळी 8 वाजता एबीपी माझावर प्रक्षेपण2.चौकीदाराची चौकशी करुन तुरूंगात टाकणार, नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, आज चंद्रपूर आणि वर्ध्यात सभा3.भाजपच्या विचारधारेशी असहमती म्हणजे देशविरोध नव्हे, ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणींनी सोडलं मौन, भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा4. महाआघाडीत मनसेला नाकारणाऱ्या काँग्रेसकडूनच राज ठाकरेंच्या सभेचा आग्रह, माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा गौप्यस्फोट, राज 8 सभा घेण्याची शक्यता5. निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल, यवतमाळच्या सभेत केलेलं वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता6. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेटसनी विजय, जॉनी बेअरस्टोची 48 धावांची निर्णायक खेळी
घराणेशाही ही लोकशाहीला लागलेली कीड आहे, एकाच कुटुंबाच्या पक्षाला माझा नेहमीच विरोध : पंतप्रधान नरेंद्र मोदी
निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 11 वा रँक मिळवून यश मिळवले. मुळे यांनी भारताच्या परराष्ट्र खात्यात सचिव पदावर काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केलं आहे.