LIVE BLOG : उपअभियंत्यावर चिखलफेक, नितेश राणेंसह 40 ते 50 समर्थकांवर गुन्हा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jul 2019 10:18 PM
सिंधुदुर्ग : उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांना अटक
सिंधुदुर्ग : उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी नितेश राणेंसह 40 ते 50 समर्थकांवर गुन्हा, 17 ते 18 कार्यकर्त्यांना अटक
आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात,
अधिकाऱ्यावर चिखल फेकणे राणेंना महागात,
राणेंसह स्वाभिमानीच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल,
कुडाळ पोलीस ठाण्याबाहेर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक सिंधुदुर्गात दाखल
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक होणार
मॅनेजरचा 58 किलो सोन्यावर डल्ला, औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधील प्रकार, तिघांना अटक
मॅनेजरचा 58 किलो सोन्यावर डल्ला, औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधील प्रकार, तिघांना अटक
चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेतील 17वा मृतदेह सापडला, तिवरे गावापासून 17 किमी अंतरावर मृतदेह आढळला, एनडीआरएफ, व्हाईट आर्मीकडून वाहून गेलेल्यांचा शोध सुरु
राहुल गांधी यांनी राजीनामा परत घ्यावा, कार्यकर्त्यांच्या कोर्टाबाहेर घोषणाबाजी
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठावरुन आलापल्ली इथे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनाला अपघात, आठ शाळकरी मुलं आणि काही प्रवासी गंभीर जखमी, उमानुर-येर्रागड्डाजवळ अपघात
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठावरुन आलापल्ली इथे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनाला अपघात, आठ शाळकरी मुलं आणि काही प्रवासी गंभीर जखमी, उमानुर-येर्रागड्डाजवळ अपघात
शिवडी कोर्टात सुनावणीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या ट्विट प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी
सिंधुदुर्ग : आंबोली घाटातील वाहतूक सुरु, तब्बल साडेतीन तासांनी वाहतूक सुरू, सहा किमीपर्यंत लागल्या होत्या रांगा
सिंधुदुर्ग : आंबोली घाटातील वाहतूक सुरु, तब्बल साडेतीन तासांनी वाहतूक सुरू, सहा किमीपर्यंत लागल्या होत्या रांगा
नाशिकच्या ओझर विमानतळावर होणार विमानांचे नाईट लँडिंग, हवाई वाहतूक संचनालयाचे विमानतळ प्राधिकरणाला पत्र
, आतापर्यंत केवळ लढाऊ विमानांनाच रात्रीच्या लँडिंगची होती परवानगी
सिंधुदुर्ग

:आंबोली घाटात सावंतवाडी-आंबोली मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने सुमारे अडीच तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. कुंभेश्वर परिसरात ही घटना घडली. आपत्कालीन यंत्रणा अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचं कोणतंही पथक घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे अद्यापही वाहतूक सुरळीत झालेली नाही. दोन्ही बाजूने अडीच तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार तर उद्या म्हणजे 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. राहुल गांधींनी ट्विटरवरुन काँग्रेस अध्यक्षपदाचा उल्लेख हटवला, चार पानी पत्रात नवा अध्यक्ष निवडण्याचं आवाहन, काँग्रेसमधील अन्य नेत्यांबद्दलही नाराजी व्यक्त

2. तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या 16वर, आठ जण अजूनही बेपत्ता, धरणापासून 7 किलोमीटरवर मृतदेह आढळले, तक्रार करुनही प्रशासन, पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

3. मराठवाड्यातील बहुतांश भाग अद्यापही कोरडाच, पेरणीयोग्य पाऊन नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, जुलैपर्यंत सरासरीचा फक्त 11 टक्के पाऊस

4. मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास आता 440 रुपयांत, शिवनेरी आणि अश्वमेध बसच्या दरात 80 ते 120 रुपयांची कपात, सोमवारपासून नवे दर लागू

5. संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल, प्रसिद्ध मेढ्यांचा रिंगण सोहळा संपन्न, तर पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून भारुडाद्वारे जनजागृती

6. विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेण्याची शक्यता, पीटीआय वृत्त संस्थेची माहिती, तर विश्वचषकातून डावलल्यानं अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.