LIVE BLOG : किरीट सोमय्या आणि पियुष गोयल वर्षा बंगल्यावर दाखल
सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
30 Mar 2019 11:41 PM
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात लिहिगावमध्ये एका थर्मोकोल कंपनीला आग, थर्मोकोल आणि इतर कच्चा माल जळून खाक, फायर ब्रिगेडच्या 4 गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले
किरीट सोमैय्या आणि पियुष गोयल वर्षा बंगल्यावर दाखल. भाजपकडून अद्यापही ईशान्य मुंबईतून सोमय्यांनी उमेदवारी जाहीर झालेली नाही.
अहमदनगर : शहरातील वैदूवडी येथे पोलिसांचा छापा, 84 लाखांची रोकड जप्त, तोफखाना पोलीस आणि आयकर विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल
शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या गाडीला मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात अपघात, सदर गाडीत आमदार महोदयांची पत्नी प्रियांकाताई बरोरा तसेच सासू, सासरे होते, गाडीतील सर्व सुखरूप आहेत.
औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांनी खुलताबाद येथील भद्रा मारोतीचं दर्शन घेतले .आज चंद्रकांत खैरे यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी औरंगाबादेत आले होते ..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या आचार संहितेच्या काळात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी 29 मार्च रोजी नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवलं. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी अवैधरीत्या बाळगलं जाणारं एक पिस्टलासह एक काडतुस, 5 धारदार तलवारी,1 गुप्ती, 2 चाकू,1 कोयता अशी एकूण 10 घातक शस्त्रे जप्त करून 6 जणांना अटक केली आहे. कन्नड शहर,चिकलठाणा, अजिंठा पोलिसांनी 5 गुन्हे दाखल करत ही कारवाई केलीय. आतापर्यंत जिल्ह्यात 3 वेळा कोंबिंग ऑपरेशन राबवून 142 वाहनांवर कारवाई करण्यात आलीय. तसेच 67 फरार आरोपींना पकडण्यात आलंय.
साताऱ्यात आज युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात फॉर्म भरला. फॉर्म भरण्यापूर्वी शेकडो शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठी रॅली काढण्यात आली. गांधी मैदानावरुन निघालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ संपली. या रॅलीमध्ये नरेंद्र पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दिवाकर रावते, विजय शिवतारे, पाटणचे आमदार शंभुराज देसाई उपस्थित होते.
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात फर्निचर गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी, फर्निचर जळून खाक, जीवितहानी नाही
रावेर मतदार संघातून उल्हास पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी,
आज संध्याकाळपर्यंत पुण्याचा उमेदवार जाहीर होईल, मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती
- सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार जाहीर
- वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची मुलं उत्पल आणि अभिजात यांच्याकडून भारतीय सैन्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, इतर राजकीय पक्ष, डॉक्टरांचे आभार, ट्विटरवर आभाराचं पत्र जारी

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचा सांगलीतील उमेदवार बदलणार नाही, तात्या शेंडगे हेच आमचे उमेदवार असतील.
प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा आहे, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. केवळ नंदुरबारमधील भिल्ल समाजाचा उमेदवार बदलला आहे. कॉंग्रेस-भाजपने आमच्या उमेदवाराच्या घरात भांडण लावल्याने उमेदवार बदलावा लागतोय. नवीन उमेदवार लवकरच जाहीर करणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न, कारची जवानांच्या ताफ्यातील बसला धडक, कारचालक बेपत्ता कारमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट
सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानीच्या उमेदवाराची आज घोषणा,
विशाल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता,
खासदार राजू शेट्टींची 3 वाजता पत्रकार बैठक
अहमदाबादमध्ये उद्धव ठाकरेंची क्रेझ, शिवसेना पक्षप्रमुखांसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी, उद्धव यांच्या भाषणावेळीही जोरदार टाळ्या आणि राम मंदिरांचे नारे,अहमदाबादच्या चौकात उद्धव ठाकरेंचेही बॅनर

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या स्कायवॉकवरुन पडून महिलेचा मृत्यू, मृत महिला भिक्षेकरी असल्याची माहिती, स्कायवॉकचं रेलिंग तुटल्याने अपघात
अकोला : अकोट तालुक्यातील उमरा इथे शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू तर कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी, शेतात न्याहारी करत असतानाची घटना
मुंबई : काँग्रेसची बैठक सुरु, मधुसूदन मिस्त्री, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित, लोकसभा प्रचार नियोजन, पक्षांतर्गत कुरघोडी, तिकीटवाटपावर चर्चा होणार

सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार कोण हे आज ठरण्याची शक्यता आहे. कालपासून स्वाभिमानीच्या बैठकींना वेग आला आहे. स्वाभिमानीला सांगलीची जागा गेल्यानं खासदार राजू शेट्टी उमेदवाराचं नाव जाहीर करणार आहेत. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील किंवा भाजपमधून बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळू शकते. मात्र विशाल पाटील यांना उमेदवारी देऊ नका, त्यांच्याऐवजी पडळकर यांना उमेदवारी द्या, यासाठी काँगेसच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून राजू शेट्टींवर दबाव टाकला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी वसंतदादा घराण्याला डावलणार का यावर पुढील समीकरण अवलंबून आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अहमदाबादमध्ये दाखल, थोड्याच वेळात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीत सहभागी होणार

अमरावती विद्यापीठ चौकातील पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी, दुरुस्तीचं काम सुरु

पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईच्या टिळक भवनमध्ये आज सकाळी 10 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : युतीत पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. कारण युवासेना विरुद्ध पूनम महाजन यांच्यात वाद सुरु आहे. पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज आहे. पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका युवासेनेची आहे. पूनम महाजन यांचा निषेध करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता युवासैनिक एकवटणार आहेत.
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पटकण्याची भाषा करणाऱ्या अमित शाहांच्या रॅलीत उद्धव ठाकरे आज सहभागी होणार, तर अफजल खानाच्या मदतीला उंदरांची कुमक, काँग्रेसचा हल्लाबोल
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून दिलासा, 'मिशन शक्ती'विषयी दिलेलं भाषण आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचा निर्वाळा
3. लंडन कोर्टाचा नीरव मोदीला सलग दुसऱ्यांदा दणका, साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याने जामीन फेटाळला, 26 एप्रिलपर्यंत कोठडी कायम
4. महाराष्ट्रात काँग्रेसच्या तिकीट वाटपातील घोळाची हायकमांडकडून दखल, डॅमेज कंट्रोलसाठी तीन नेत्यांचं शिष्टमंडळ मुंबईत
5.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारिस, भाजप प्रवक्ते अवधुत वाघांची ट्विटरवर मुक्ताफळं, विरोधकांची टीका तर शेतकऱ्यांचा तीव्र संताप
6. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्सचा पाच विकेट्सनी धुव्वा, पाच विकेट्स आणि सहा चेंडू राखून राजस्थान रॉयल्सवर मात