LIVE BLOG : सातव्या वेतन आयोगानुसार बेस्ट कामगारांना पगार मिळणार
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Aug 2019 08:14 PM
सातव्या वेतन आयोगानुसार बेस्ट कामगारांना पगार मिळणार, उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय, आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दाखवली सकारत्मक भूमिका
सातव्या वेतन आयोगानुसार बेस्ट कामगारांना पगार मिळणार, उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय, आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दाखवली सकारत्मक भूमिका
केरळ : वायनाडमध्ये अतिउत्साही कार्यकर्त्याकडून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं चुंबन, अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधीही चकित
केरळ : वायनाडमध्ये अतिउत्साही कार्यकर्त्याकडून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं चुंबन, अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधीही चकित
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 25 निर्णय, आचारसंहिता लागण्याआधी लोकप्रिय निर्णय घेण्यावर सरकारचा भर, गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता, त्याआधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाचे जम्बो निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप सोपल शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर पक्षप्रवेश
सोलापूर : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा राजकारणात प्रवेश, महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, आरपीआय नेत्यांनी कलाकारांचा फक्त वापर करून घेतल्याची आनंद शिंदेंची टीका
नवी दिल्ली : काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिकांवर केंद्र सरकारला नोटीस, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच न्यायमूर्तींच्या घटनात्मक खंडपीठापुढे प्रकरणाची सुनावणी, कलम 370 हटवण्याच्या, जम्मू-काश्मीर राज्याचं विभाजन करण्याच्या निर्णयांना याचिकेत आव्हान
मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकांच्या मागण्यांवर मोठा निर्णय, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान, आधी 20 टक्के अनुदान असणाऱ्यांना 40 टक्के अनुदान, मंत्री संजय कुटे यांची माहिती, शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेची प्रतीक्षा करु, शिक्षक आमदार अमर काळे यांची भूमिका
सिंधुदुर्ग : दोडामार्गमधील धामणा धरणाला मोठी गळती, दोडामार्ग तालुक्यासह गोवा राज्यातील डिचोली, पेडणे तालुक्यानाही धोका, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूरमधील चांपा उटी नर्सरीजवळ टाटा एस आणि बाईकमध्ये समोरासमोर धडक, बाईकवरील तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश
पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आमदारांची बैठक बोलावली, मात्र शिवसेना आमदारांना पोलिसांनी गेटवरच अडवलं
भाजपाकडून 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु, शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघातही मुलाखती, शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण इच्छुक, प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भाजपने भरुन घेतले
सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शिवसेनेत प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दिलीप सोपलांसह बांधणार शिवबंधन
धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण, तिघांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीची शिफारस, जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील यांनी मंत्रालयात केलेली आत्महत्या
मराठवाड्यासारख्या पर्जन्यतुटीच्या प्रदेशात ऊस पिकावर पूर्ण बंदी घालावी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा मुख्यमंत्र्यांना अहवाल, ऊस पिकाला लागणारं पाणी मराठवाड्यातील दुष्काळाचं मुख्य कारण, ऊस बंद करुन शेतकऱ्यांना तेलबिया किंवा डाळवर्गीय पिकांकडे वळवावं
पूरग्रस्त जिल्ह्यांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज महाराष्ट्रात, सात सदस्यीय पथक पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
रायगड : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली माथेरान मिनी ट्रेन आता वर्षभर बंद राहणार, पावसामुळे नेरळ ते माथेरान दरम्यान 21 ठिकाणी मोठं नुकसान, दुरुस्तीसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता, दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये खर्च अपेक्षित
मुंबई : भायखळ्यात मुस्तफा मार्केटमध्ये लाकडाच्या वखारीला रात्री 2 वाजता आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, आगीत संपूर्ण वखार जळून खाक
पार्श्वभूमी
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षनेता नसेल, औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली
2. भाजपच्या मेगाभरतीनंतर राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये नाराजीरावांची फौज, निष्ठावंतांच्या भावनांना 'माझा'च्या स्पेशल रिपोर्टमधून वाचा
3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह संचालक मंडळाची सुप्रीम कोर्टात धाव, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी
4. काश्मीर सोडा पण पाकिस्तानला मुझफ्फराबादही वाचवणं कठीण, पाक पीपल्स पक्षाच्या बिलावल भुट्टोंचा पंतप्रधान इम्रान खान यांना घरचा आहेर
5. एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध येण्याची शक्यता, 2 व्यवहारांमध्ये 6 ते 12 तासांची मर्यादा आणण्याबाबत लवकरच निर्णय
6. सर्वस्व गमावलेल्या अवलियाने साकारले गणपती बाप्पा, दुर्धर आजारानंतरही संदीप नाईकची कला अबाधित, थोड्याशा अपयशानं खचणाऱ्यांसाठी मोठा संदेश