LIVE BLOG : दिलीप सोपल यांचा राजीनामा, उद्या शिवबंधन बांधणार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
27 Aug 2019 11:29 PM
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला,
उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला,
उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
पालघर : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, महाराष्ट्र-दादरा नगर हवेली बॉर्डरवर तलासरी तालुक्यातील उधवा चेकपोस्टवर लाखो रुपयांची अवैध दारू जप्त , 15 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
जे डे हत्याकांड प्रकरणी पत्रकार जिग्ना व्होराला हायकोर्टाचा मोठा दिलासा, जिग्ना व्होरा विरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत, मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जिग्नाच्या निर्दोषमुक्तीला सीबीआयनं दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलं, जेडेंची माहिती अंडरवर्ड डॉन छोटा राजनला पुरवल्याचा जिग्नावर होता आरोप, जेडे हत्याकांडात छोटा राजनसह अन्य काही मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली
कल्याण : अट्टल मोबाईल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मोबाईल चोरीच्या तब्बल 50 गुन्ह्यांचा छडा
रायगड : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला पनवेल येथे आग, मुलांना आणण्यासाठी निघालेल्या व्हॅनने अचानक पेट घेतला, मुलांना घेण्याआधीच दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला चालकही सुदैवाने बचावला
नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची जाळपोळ, इंदिरानगर परिसरात 2 वाहनांची अज्ञात समाजकंटकांकडून जाळपोळ
, आकाश आरंभ सोसायटीच्या पार्किंगमधील दुचाकी जाळल्या, नागरिक भयभीत, पोलिसांकडून पुढील तपास सुरु
राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, जीएसटी विवरण पत्र दाखल करण्याची मुदत वाढवण्यास जीएसटी कौन्सिलची मान्यता, 31 ऑगस्ट ऐवजी आता 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांना विवरण पत्र भरण्याची सूट, राज्य सरकारने केलेली केंद्र सरकारकडे मागणी
पार्श्वभूमी
Tags:
today's news in marathi
abp majha
Aaj Divasbharat