LIVE BLOG | निवडणूक आयोगाच्या पथकाची नवी मुंबईमध्ये कारवाई
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Apr 2019 02:07 PM
निवडणूक आयोगाच्या पथकाची पनवेलमध्ये कारवाई, शेकापच्या कार्यकर्त्यांना पकडले,
पार्थ पवारांच्या प्रचारासाठी वाटण्यासाठीची 200 रुपयांची पाकिटं जप्त
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात गारांचा पाऊस,
दिवसभर तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर होता, परंतु संध्याकाळी अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस
खर्डी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान बंद,
दुरंतो आणि राजधानी एक्स्प्रेससह अनेक लोकल रखडल्या होत्या,
रेल्वेसेवा सुरु आहे, परंतु मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत
चंद्रपुरात आज मौसमातील सर्वाधिक तापमान, 46.5 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत अत्यवस्थ,
शिर्डीतल्या सभेदरम्यान स्टेजवर असतानाच तब्येत बिघडली,
वाढत्या तापमानामुळे भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली
धुळे : विमानातल्या पेटी प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी काढली नोटीस, विमानतळ प्राधिकरण, विमान मालक, मंत्री सुभाष भामरे आणि भाजप पक्षाला खुलासा करण्याचे आदेश
पीटर मुखर्जींची पुन्हा एकदा हायकोर्टात जामीनासाठी याचिका, शीना बोरा हत्याकांडात अटकेत असल्यापासून जामीनासाठी केलेला सहावा अर्ज, वैद्यकिय कारणांसाठी सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका
नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट, निम्म्यापेक्षा जास्त विदर्भात तापमान ४५ अंशांवर, सहा दिवसात तापमान ३९ अंशांवरून ४५ अंशांपेक्षा जास्त झाल्याने नागरिक त्रस्त
नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट, निम्म्यापेक्षा जास्त विदर्भात तापमान ४५ अंशांवर
नाशिक - तोंडाच्या वाफेनं इंजिन चालत नाही, पवार साहेबांनी इंजिन भाड्याने घेतले आहे, इंजिन आतापर्यंत दिल्लीत जायला पाहिजे होते ते आता गल्ली पर्यंत उरले नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीलंकेत इसिसच्या 15 दहशतवाद्यांना कंठस्नान, दहशतवादी हल्ल्याच्या कृत्यानंतर श्रीलंकेच्या सुरक्षा यंत्रणांकडून कारवाई
आठ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची बातमा अफवा, दारुच्या नशेत माजी सैनिकाची खोटी माहिती
आठ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची बातमा अफवा, दारुच्या नशेत माजी सैनिकाची खोटी माहिती
एअर इंडियाची विमानसेवा खोळंबली, पहाटे 3.30 वाजल्यापासून सर्व्हर डाऊन असल्याने चेक-इनला अडचण
महाराष्ट्रासह आठ राज्यात हायअलर्ट, देशात 19 दहशतवादी शिरल्याची माहिती
पार्श्वभूमी
1. काँग्रेसची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, मुंबईत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, मध्यमवर्गियांसह मच्छिमार, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
2. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला फसवण्याचं काम केल्याचा राहुल गांधींचा घणाघात, संगमनेरमधील सभेत जीएसटी, राफेल, शेतकरी आत्महत्येवरुन निशाणा
3. शेतकरी आत्महत्यावरुन राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, सिंचन घोटाळ्यात कारवाई का केली नाही, नाशकातून राज यांचा फडणवीसांना सवाल
4. राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, मोदींची स्तुती, पवार आणि थोरातांवर टीका, तर काँग्रेसकडून विखेंना कारणे दाखवा नोटीस
5. एबीपी माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाला जाग, वर्ड्याचीवाडीतील दुष्काळी स्थितीची पाहणी, टँकरने पाणीपुरवठा केला जाणार
6. जगभरात अॅव्हेंजर्स एन्डगेमची तुफान क्रेझ, पहिल्याच दिवशी बाराशे कोटींचा गल्ला जमवणारा एकमेव सिनेमा, मध्यरात्रीही सिनेमा हाऊसफुल्ल