- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शशांक राव यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्र
LIVE BLOG : बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शशांक राव यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्र
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
26 Aug 2019 10:02 PM
बेस्ट कर्मचारी आता 'राज'दरबारी, बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बेस्ट कृती समितीचे सरचिटणीस शशांक राव यांचं राज ठाकरेंना पत्र, बेस्ट कर्मचा-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पुढाकार घ्येण्याची विनंती
पाकिस्तानच्या इम्रान खान यांची भारताला पुन्हा एकदा अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी, काश्मीरसाठी कोणत्याही पातळीला जाण्याचं वक्तव्य
पाकिस्तानच्या इम्रान खान यांची भारताला पुन्हा एकदा अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी, काश्मीरसाठी कोणत्याही पातळीला जाण्याचं वक्तव्य
जागावाटपाचा फॉर्म्युला सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांकडून पेन्टरची उपमा , तर शिवसेना कारपेन्टर असल्याचं सांगत सूचक इशारा
जागावाटपाचा फॉर्म्युला सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांकडून पेन्टरची उपमा , तर शिवसेना कारपेन्टर असल्याचं सांगत सूचक इशारा
राज्यात ठिकठिकाणी विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन, वर्षा बंगल्याकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला, तर नाशकात शिक्षकांचं अर्धनग्न आंदोलन
महाराष्ट्र शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, आनंदराव अडसूळ, विजयराव मोहिते-पाटलांसह अनेक बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल
सोन्याचे दर प्रतितोळा 40 हजारांवर, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोनं महाग, दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता
सोन्याचे दर प्रतितोळा 40 हजारांवर, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोनं महाग, दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता
LIVE: फ्रान्समधील जी-7 परिषदेतून नरेंद्र मोदी लाई्व्ह, काश्मीर मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता
भारत-पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय चर्चेतून दोन्ही देश सोडवतील,
काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची इच्छा व्यक्त करणाऱ्या ट्रम्पना मोदींचं उत्तर, ट्रम्पचाही यूटर्न, पाकिस्तानला झटका
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश होणार, 31 ऑगस्ट रोजी मोदींच्या सोलापूर भेटीत किंवा सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाडिकांचा पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती
नाशिक : लाच प्रकरणातून सार्वजनिक बाधंकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांची निर्दोष सुटका, ठोस पुरावा नसल्याने जिल्हा सत्र न्यायालायाचा निर्णय, 2013 साली ठेकेदारकडून लाच घेतल्याप्रकरणी चिखलीकरांना लाचलूचपत विभागाने अटक केली होती
सोलापूर : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा राष्ट्रवादीला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा, बार्शीची राजकीय परिस्थिती पाहता निर्णय घेत असल्याची माहिती
सोलापूर : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा राष्ट्रवादीला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा, बार्शीची राजकीय परिस्थिती पाहता निर्णय घेत असल्याची माहिती
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गुणोरे गावाl एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्त्या, शेतकरी कुटुंबातील आई-वडील आणि 2 मुलांची आत्महत्त्या, आत्महत्त्येमागील कारण अस्पष्ट
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय कार्यालयाचाफलक मराठी भाषेत करा, मनसेचं मुंबई महापालिकेला पत्र
जळगाव च्या सुवर्ण नगरीत सोन्याचा दर 39 हजार रुपयांवर
कल्याण : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे उशिराने, मुंबईकडून कल्याणच्या दिशेला येणाऱ्या गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने, परिणामी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांनाही फटका, अर्धा ते पाऊण तासाच्या विलंबामुळे चाकरमानी त्रस्त
मुंबई : शेअर मार्केटमधे जबरदस्त उसळी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या घोषणांनंतर मार्केटमधे तेजी, प्रिओपनिंग सेशनमधे सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला
नाशिकमध्ये दुधाचे भाव गगनाला भिडले
, शहरातील मुख्य दूध बाजारात दुधाचा भाव लिटर मागे 70 रुपये
भाव, अपुऱ्या चाऱ्याअभावी दरात वाढ
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. महिनाभरात 1 कोटी लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता, आर्थिक मंदीवर टीकास्त्र डागताना संजय राऊतांनी व्यक्त केली भीती, मेक इन इंडिया-स्कील इंडियावरही ताशेरे
2. भाजपात जागावाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री आणि अमित शाहांनाच, उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांचा टोला
3. परळी, केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आल्याशिवाय बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खासदार कोल्हेंची शपथ, तर ईडीच्या कारवाईवरून सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान
4. छगन भुजबळांना शिवसेनेचे दरवाजे बंदच, नाशकातल्या शिवसैनिकांच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरेंचा शब्द, सूत्रांची माहिती
5. अँटिगा कसोटीत टीम इंडियाकडून वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा, 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी
6. पी व्ही सिंधू बनली जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय़, जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवून सिंधूनं रचला नवा इतिहास