LIVE BLOG : राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता, आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Aug 2019 07:22 PM
बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबई : राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
,
थोड्यावेळापूर्वी मातोश्रीवर झाली बैठक
औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा उद्या बंदचा निर्णय, उद्या विना अनुदानीत शाळेतील शिक्षकाना वेतन मिळावे याकारिता औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. 1 ते 12 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
कोल्हापूर : कृषीभूषण डॉक्टर बुधाजीराव मुळीक 2 सप्टेंबरपासून शिरोळमध्ये आमरण उपोषणास बसणार ,

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत बुधाजीराव मुळीक बसणार आमरण उपोषणास

सोलापूर : बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल उद्या सकाळी 10.30 वाजता महत्वपूर्ण घोषणा
करणार,
राजकीय भवितव्याची महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल,

सोपल 31 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा
माजी अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलीन, दिल्लीच्या निगम बोध घाट येथे शासकीय इतमामात जेटलींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली दरबारातील भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, थोड्याच वेळात दिल्लीतील निगम बोध घाट येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
औरंगाबाद - जायकवाडी धरण परिसरात हायअलर्ट, धरण परिसरातील सुरक्षेत वाढ, सध्या जायकवाडी धरणात 90 टक्के पाणीसाठा
जळगाव : मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष शाम दीक्षित यांची दगडाने ठेचून हत्या, जळगाव शहरातील रचना कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिर परिसरातील घटना
वाढत्या विरोधानंतर छगन भुजबळांसाठी शिवसेनेची दारं जवळपास बंद, भुजबळांना पक्षात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचं नाशिकच्या कार्यकर्त्यांना आश्वासन
अरुण जेटली यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना, 11 ते 1 वाजेपर्यंत पार्थिव मुख्यालयात ठेवलं जाणार, दुपारी 2.30 वाजता होणार अंत्यसंस्कार

शिर्डी : नाशिक-पुणे महामार्गवार तीन वाहनांचा अपघात, संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील घटना, कार, टेम्पो या वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, अपघातानंतर महामार्गावरील एक वाहतूक विस्कळीत
सातारा राजधानी हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात, स्पर्धेत सुमारे साडेआठ हजार स्पर्धक सहभागी, राज्यातील स्पर्धकांसह थोपिया, केनियातील स्पर्धकांचा सहभाग
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर आणि हार्बर मार्गावर अंधेरी स्थानकात ब्लॉक

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं दीर्घ आजाराने निधन, अमित शाह, सोनिया गांधींसह सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन, आज दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार

2. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, श्रीनगरमध्ये अडवणुकीनंतर राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे नेते दिल्लीला परतले

3. विधानसभेला शिवसेना-भाजपात एकमेकांच्या सिटींग जागांवर चर्चा नाहीच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं विधान, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

4. एकनाथ खडसे राज्यात राहणार की केंद्रात जाणार, हे केंद्रीय नेतृत्व ठरवणार, भुसावळमध्ये खडसेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सावध पवित्रा

5. ठाण्यात मनसेकडून पूरग्रस्तांना साडेपाच लाखांची मदत, तर वर्तकनगरमध्ये गोविंदांकडून जवानांना सलामी, मुंबईत 51 गोविंदा जखमी तर रायगडमध्ये एकाचा मृत्यू

6. यूएईच्या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान मोदींचा सन्मान, यूएईच्या राजाकडून मोदींचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कारानं गौरव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.