LIVE BLOG | मावळचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमधून पुन्हा शिवसेनेत
मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घरवापसी, भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, 2014 च्या लोकसभेला तिकीट नाकारल्याने बाबर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता, 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते, भाजपने आश्वासनांची पूर्तता न केल्याने स्वगृही
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Apr 2019 11:00 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, उद्या सकाळी दहा वाजता अर्ज भरणार
मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घरवापसी, भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, 2014 च्या लोकसभेला तिकीट नाकारल्याने बाबर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता, 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते, भाजपने आश्वासनांची पूर्तता न केल्याने स्वगृही
नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते त्याचं काय झालं?
मेक इन इंडियाचं काय झालं?
स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?
नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली?
राज ठाकरें यांचे भारतीय जनता पक्षाला सवाल
नोटबंदीच्या स्कॅमवरुन सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांना भाजप उत्तरं का देत नाही? : राज ठाकरे
देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या अगोदर उर्जित पटेल यांच्या सहीने दोन हजाराच्या नोटा परदेशात छापल्या गेल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं, त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास तीन लाख कोटी रुपये बदलून दिले गेले : राज ठाकरे
LIVETV | नोटाबंदी काळात भाजपने लाभ करुन घेतला, तो पैसा आता निवडणूक काळात वापरला जात आहे : राज ठाकरे
मी 2018 च्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात म्हणालो होतो की नोटबंदीची जेव्हा चौकशी होईल तेव्हा समजेल नोटबंदी हा 1947 सालापासूनचा सर्वात मोठा घोटाळा आहे
ही बाब आता हळूहळू सिद्ध होऊ लागली आहे : राज ठाकरे
जो पक्ष निवडणूक लढवत नाहीये, त्या पक्षावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे, माझ्या पक्षावर टीका केल्याने मला काही फरक पडणार नाही, पण सत्ताधाऱ्यांना नक्की फरक पडणार : राज ठाकरे
बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना खोटं बोलायची वेळ का येते? : राज ठाकरे यांचा सवाल
बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना खोटं बोलायची वेळ का येते? : राज ठाकरे यांचा सवाल
ईशान्य मुंबईत शिवसैनिक मतपेटीतून भाजपविरोधातला बदला घेतील, संजय दीना पाटलांना विश्वास, मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी दिलेल्या मोदी-मोदीच्या घोषणा शिवसैनिक विसरले नसल्याचाही दावा
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी कलावती यांचं वृद्धापकाळाने निधन, बाबासाहेबांप्रमाणेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग. मुलीच्या मुंबईतील निवासस्थानी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास, रात्री चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती
अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती
ईशान्य मुंबईमध्ये मराठा युवा क्रांती मोर्चा आणि आगरी समाजाचा महाआघाडीच्या संजय दीना पाटीलांना जाहीर पाठिंबा
ईशान्य मुंबईमध्ये मराठा युवा क्रांती मोर्चा आणि आगरी समाजाचा महाआघाडीच्या संजय दीना पाटीलांना जाहीर पाठिंबा
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, मतदारांना अभिवादन
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा स्वीकारला, नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाईल, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांची माहिती

नागपूर - 1993 च्या मुंबई सिरियल बॉम्बस्फोटातील दोषी अब्दुल गनी तुर्क याचा नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू, 48 वर्षांचा अब्दुल गनी तुर्क नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात भोगत होता शिक्षा
अहमदनगर : करण ससाणे यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, ससाणे आणि विखे समर्थकांच्या बैठकीनंतर निर्णय
काँग्रेसने इतकं काही केलंय आणि मोदी सरकार आल्यावर म्हणतायेत काय केलं यांनी. अरे बाबा तुम्ही पाच वर्षात काय केलं हे तरी आधी सांगा, सत्तेत येण्यापूर्वी विकास, विकास करणाऱ्या मोदींना आता याचा विसर पडलाय : शरद पवार
पार्थ पवारांसाठी शरद पवार यांची तळेगावात प्रचारसभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पाच वर्षात काय दिवे लावलेत : शरद पवार
शिर्डी : सुजय विखेची संगमनेरमध्ये सभा, बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात शक्ती प्रदर्शन, भाजपच्या महायुतीच्या मेळाव्यासाठी सुजय संगमनेरात
जालना : किल्ला जिनिंग भागात मृतदेह आढळला, अज्ञात आरोपीकडून चाकूने वार करून युवकाची हत्या, कुमार जुंझुर असे युवकाचे नाव
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा वाराणसीमधील उमेदवार जाहीर, अजय राय यांना पक्षाकडून तिकीट, वाराणसीमधून प्रियांका गांधींच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम
बुलडाणा : मेहेकर येथील गोडाउनमधून 75 बॅग तंबाखू चोरी, 6 लाख रुपयांचा माल लंपास, आरोपी मेहकर पोलिसांच्या ताब्यात
पार्श्वभूमी
1. अक्षय कुमारनं घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीवर राहुल गांधींच खोचक ट्वीट, तर मोदींना कुर्ते आणि मिठाई पाठवणाऱ्या ममता बॅनर्जींचाही पलटवार
2. मनाजोगा निर्णय न दिल्यानं सरन्यायाधीशांना अडचणीत आणण्यासाठी लैंगिक शोषणाचे आरोप, वकील उत्सव बैन्सकडून पुरावे सादर, तपास यंत्रणांना चौकशीसाठी समन्स
3.एन. डी. तिवारींचा मुलगा रोहितची पत्नीनंच हत्या केल्याचं उघड, वैवाहिक सुख मिळत नसल्यानं रोहितचा गळा घोटल्याची अपूर्वाकडून कबुली
4. मोदींच्या गावातचं पुरेसे शौचालय नसल्याचा राज ठाकरेंचा दावा, मुंबईतल्या सभेत दाखवला व्हीडिओ, तर 27 तारखेला भाजप व्हीडिओ दाखवून मनसेची पोलखोल करणार
5. लोकल अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेचा राजकीय स्वार्थासाठी वापर, राज ठाकरेंचा खासदार किरीट सोमय्यांवर घणाघात,
6. चौथ्या टप्प्यातल्या प्रचार शिगेला, मतदारांच्या प्रत्यक्षात गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा भर, धारावीत प्रचारासाठी रॅप साँग गाणाऱ्या गली बॉयची चर्चा