LIVE BLOG : बेस्ट कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी संप करण्याच्या बाजूनं 98 टक्के मतदान, सोमवारपासून प्राथमिक स्वरूपात धरणे आंदोलन

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Aug 2019 11:10 PM

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, 27 तारखेला मातोश्रीवर करणार शिवसेनेत प्रवेश, पत्रकार परिषदेत घोषणा, काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची मनधरणी करणारा एकही नसल्याची दिलीप माने यांची खंत
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे यापूर्वीही बेस्टने प्रशासनाला अल्टिमेटम दिलं होतं. मात्र त्याकडेही प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उचलायचं की नाही यासंदर्भात कर्मचार्‍यांचे मतदान घेण्यात आलं होतं. आज मतमोजणी पार पडली. यामध्ये 98% बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचा हत्यार उपसण्यासंदर्भात मतदान केलं. सोमवारीपासून प्रशासनाला इशारा देण्यासाठी प्राथमिक स्वरूपात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगित, आज ठरलेल्या सभास्थळी जाऊन मुख्यमंत्री जेटलींनी श्रद्धांजली वाहतील, मात्र कुठेही भाषण करणार नाहीत किंवा फुलं-सत्कार स्वीकारणार नाहीत, 26 ऑगस्टपासून पुन्हा ठरलेल्या कार्यक्रमानुसार यात्रा सुरु होणार
सोलापूर : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने पक्षाला सोडचिठ्ठी देणार, शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती, आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधी पक्षातील नऊ नेत्यांसह श्रीनगरला रवाना, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार
पंढरपूर :
राज्यात आणि देशात सध्या दडपशाहीचे वातावरण, पक्ष सोडून जाणाऱ्यांचे प्रोफाइल बघा एकही निष्ठावान कार्यकर्ता गेला नाही, सुप्रिया सुळेंचा राष्ट्रवादी सोडणाऱ्या नेत्यांना टोला
नाशिक : गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू तर दोघे जखमी, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारातील घटना, डॉ. संजय शिंदे यांचा मृत्यू तर जखमींमध्ये खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि जतीन संखे यांचा समावेश

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. भिवंडीतील पिराणीपाडा येथे धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती

2. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा दावा, आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी सरकारची महत्वाची पावलं

3. कलम ३७०च्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज काश्मीरला जाण्याची शक्यता, प्रमुख विरोधी पक्षांचे नेतेही श्रीनगरला जाणार, काश्मीरच्या राज्यपालांनी दिलं होतं आव्हान

4. सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना भरचौकात फटके द्या, सावरकर पुतळा विटंबनेवरुन उद्धव ठाकरे आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन

5. राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत आता पक्षाच्या झेंड्यासह भगवाही फडकणार, अजित पवारांची परभणीच्या पाथरीत घोषणा, तपास यंत्रणांच्या नोटीसवरुन सरकारला टोला

6. देशभर कृष्ण जन्माष्ठमीचा उत्साह, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचं आयोजन, पूरग्रस्तांसाठीही गोविंदाचे हात सरसावले

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.