LIVE BLOG | आषाढी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Apr 2019 09:44 PM

चंद्रपूर : राजुरामधील आदिवासी तरुणींवर लैंगिक अत्याचार प्रकरण, असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटेंविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई उच्च न्यायालयाचा पालिकेला मोठा दणका तर मुंबईकरांना मोठा दिलासा, प्रॉपर्टी टॅक्स ठरवताना मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेले नवे नियम हायकोर्टाकडून रद्द,निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत आदेशाला स्थगिती
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील मनसैनिक हे बाळासाहेबांना मानणारे, बाळासाहेबांचे विचार आजही मनसैनिकांमध्ये जिवंत, त्यामुळे काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाडांपेक्षा मनसैनिक शिवसेनेलाच मतदान करतील, महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना विश्वास
पालघर : वाडा तालुक्यातील वैतरणा नदी पात्रात कापरी येथे दोन मुलींचा बुडून मृत्यू, मानसी देसले (11) आणि दिशा आकरे (12) अशी मृत मुलींची नावे
हजारो कोटींचे आर्थिक घोटाळे करून परदेशात पसार झालेल्यांना #FEO कायद्याचा धसका. मल्यापाठोपाठ पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचीही 'फरार आर्थिक गुन्हेगार' कायद्याअंतर्गत कारवाईवर स्थगितीसाठी हायकोर्टात याचिका. मुंबई उच्च न्यायालयात ५ जूनला होणार सुनावणी
आमचं सरकार लवकर येणार, नरसिंह यादव विरोधातील एफआयआर रद्द करणार, त्याला प्रमोशनही देणार, मुंबईतील काँग्रेस उमेदवार संजय निरुपम आक्रमक, नरसिंहने प्रचार केला नाही, फक्त स्टेजवर आला म्हणून कारवाई का? निरुपम यांचा सवाल
अकोलातील तापमान 45.1 अंश सेल्सिअसवर, या मोसमातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद
मुंबई : फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करुन न्यायालयाने मला 'आर्थिकदृष्ट्या मृत्यूदंड' दिला, विजय मल्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद, फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातील कारवाईतून मल्ल्याला तूर्तास कोणताही दिलासा नाही

आषाढी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. संत तुकाराम पालखी सोहळ्याचे प्रस्थान 24 जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान 25 जून रोजी आहे.
आषाढी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. संत तुकाराम पालखी सोहळ्याचे प्रस्थान 24 जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान 25 जून रोजी आहे.
बदलापूर : वंचित बहुजन आघाडीची बदलापूरची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांचं हेलिकॉप्टर उतरवायला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. परवानगी अभावी हेलिपॅड उभारण्यात न आल्याने प्रकाश आंबेडकर येऊ शकले नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः या माहितीला दुजोरा दिला आहे.

मुंबई : राज ठाकरेंच्या सभेतील पोलखोलनंतर मोदींची जाहिरात असलेलं पेज गायब झालं आहे. चिले कुटुंबाचा फोटो असलेलं 'मोदी फॉर न्यू इंडिया' पेज फेसबुकवरुन हटवण्यात आलं आहे. ही जाहिरात आमची नाही, असा दावा करणाऱ्या भाजपने हे पेज का हटवलं, असा सवाल मनसेने केला आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात राज ठाकरेंचा प्रभाव दिसणार नाही. मनसेचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट महायुतीचे उमेदवार गजानन किर्तीकर यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या सांगण्यावरुन मनसेचे मराठी कार्यकर्ते संजय निरुपम यांना मतदान करणार नाहीत, असा विश्वासही किर्तीकर यांनी व्यक्त केला.
महायुतीविरोधात काम करणं राज ठाकरेंना शोभत नाही.

मी विकासाच्या कामावर निवडणूक लढतोय.
मराठी, उत्तर भारतीय, मुस्लीम मतदार हे विकासाला मत देतात, असंही ते म्हणाले.
शिर्डीत युवकाची हत्या, मंगेश पाईक या युवकाची
धारदार शस्त्राने वार करून हत्या, जुन्या भांडणातून मंगेशची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न
मालाडच्या मालवणीतून एक ताब्यात, एटीएसची कारवाई,
एका मौलानाला ताब्यात घेतल्याची माहिती ,
कशासाठी ताब्यात घेतले याबाबत माहिती नाही
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयए कोर्टाचा दिलासा, निवडणूक लढण्याची परवानगी नाकरण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली, एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणं हा निर्णय कोर्टाच्या अखत्यारीत नाही, याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घ्यावा, असं एनआयए कोर्टाचं मत, नासिर बिलाल यांची याचिका कायदेशीरदृष्ट्या टिकणारी नसल्याचंही सांगितलं
अंगणवाडी सेविकांवर 'इलेक्शन ड्युटी'ची सक्ती नाही, राष्ट्रसेवेसाठी अंगणवाडी सेविकांनी ऐच्छिक इलेक्शन ड्युटी करावी, आयोगातर्फे संघटनेकडे विनंती, इलेक्शन ड्युटी करणाऱ्या सेविकांना 250 रूपये प्रतिदिन भत्ता आणि जेवण किंवा 150 रूपये देण्याचं मान्य
गोव्यात लोकसभेसाठी 74.72 टक्के तर विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 78 टक्के मतदान, सर्वाधिक 84 टक्के साखळीत तर सर्वात कमी 64 टक्के बाणावलीमध्ये मतदान
मुंबई : हार्बर रेल्वेपाठोपाठ, पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूकही उशिराने, विरार फास्ट लोकल काही वेळ लोअर परेल स्टेशनजवळ रखडल्याने, पुढील सर्व लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने
हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड, मानखुर्द स्थानकावर झालेल्या बिघाडामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प, सीएसएमटी ते मानखुर्द वाहतूक सुरू, पनवेल ते सीएसएमटी वाहतूक देखील उशिराने, स्टेशनवर प्रचंड गर्दी
औरंगाबाद शहरातील शाम दूध डेअरी समोर रात्री उशिरा दोन मोटारसायकलचा अपघात, दोन तरुण गंभीर जखमी, दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद

पार्श्वभूमी

  1. अक्षय कुमारनं घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीचं एबीपी माझावर लाईव्ह प्रक्षेपण

  2.  सेनेला मतदान न करण्याचं राज ठाकरेंचं पहिल्यांदाच आवाहन, अंबांनींनी काँग्रेसच्या देवरांना दिलेल्या पाठिंब्याचा दाखला देत, राजकीय वाऱ्याची दिशा बदलल्याचा दावा

    3. तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 62 तर देशात 65 टक्के मतदान,  कोल्हापुरात सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान, मोदींसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

    4. रशियन हॅकर पैशाच्या मोबदल्यात ईव्हीएम हॅक करत असल्याचा विरोधकांचा दावा, चंद्राबाबू नायडू आणि पवारांकडून अनेक शंका उपस्थित

    5. चौकीदार चोर है वक्तव्याप्रकरणी दिलगिरी मागणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अवमान प्रकरणी बजावली नोटीस, 30 एप्रिलला होणार सुनावणी

    6.अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश, पंजाबच्या गुरूदासपुरमधून उमेदवारी जाहीर, तर चंदीगढमध्ये किरण खेर यांना तिकीट

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.