LIVE BLOG : आयकर परतावा दाखल करण्यासाठी मुदतवाढ, 31 ऑगस्ट नवी मुदत
दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
23 Jul 2019 11:27 PM
नागपूर : बाजार परिसरात सुभाष गोरले नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, तिघे जण ताब्यात, पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
कल्याण : उल्हासनगरात लॉजमध्ये गळफास घेत इसमाची आत्महत्या, जगदीश शेट्टी (45) असं मृत इसमाचं नाव, कॅम्प-3 मधील मनीषा लॉजमधील घटना, आत्महत्येचं कारण अस्पष्ट, मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी दाखल
#KarnatakaTrustVote कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे सोपवला राजीनामा
मुंबई : आयकर परतावा दाखल करण्यासाठी मुदतवाढ, 31 ऑगस्ट नवी मुदत
कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीला सुरुवात, मुख्यमंत्री कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक ठराव, सरकार कोसळण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला, निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत:वरील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप, मुंबई उच्च न्यायालयकडून आधीच क्लीन चिट
सोलापूर : कृत्रिम पावसाच्या ढगाच्या अभ्यासासाठी पहिली टेस्ट फ्लाईटने उड्डाण घेतलं, केंद्रशासनाच्या वतीने सोलापुरात सुरू असलेल्या संशोधनासाठी आज विमानांचा पहिलं उड्डाण झालं
रत्नागिरी : कोकणातील मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका इथल्या पर्यटनस्थळाही बसतोय, जिल्ह्यातील गणपतीपुळे देवस्थानाच्या सभोवताली प्रदीक्षणा मारण्याच्या ठिकाणी भिंत कोसळून प्रदक्षिणा मार्ग बंद झाला आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांना याचा त्रास सहन करावा लागतोय.
रत्नागिरी : कोकणातील मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका इथल्या पर्यटनस्थळाही बसतोय, जिल्ह्यातील गणपतीपुळे देवस्थानाच्या सभोवताली प्रदीक्षणा मारण्याच्या ठिकाणी भिंत कोसळून प्रदक्षिणा मार्ग बंद झाला आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांना याचा त्रास सहन करावा लागतोय.
मुंबई : येत्या 24 ते 48 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. रात्रीच्या वेळी अतिवृष्टी होईल आणि सकाळी जास्त पाऊस पडणार नाही. तसंच 26 आणि 27 जुलैलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी दिली.
मुंबई : येत्या 24 ते 48 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. रात्रीच्या वेळी अतिवृष्टी होईल आणि सकाळी जास्त पाऊस पडणार नाही. तसंच 26 आणि 27 जुलैलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी दिली.
मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू होणार
#Breaking | मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्या नसल्याची कार्यकर्त्यांची भावना, किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित नाही
डॉ. पायल तडवी प्रकरणी आरोपपत्र तयार, आज किंवा उद्यापर्यंत सत्र न्यायालयात दाखल करणार, मुंबई क्राईम ब्रांचची हायकोर्टात माहिती. नायर रूग्णालयातील तिन्ही महिला आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरूवारपर्यंत तहकूब. सरकारी वकिलांचा जामीन अर्जास विरोध कायम
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार, मोझरी, अमरावतीत एक ऑगस्टला महाजनादेश यात्रेच्या पहिल्या दिवशी अमित शाह तर नाशिक समारोपाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार, मोझरी, अमरावतीत एक ऑगस्टला महाजनादेश यात्रेच्या पहिल्या दिवशी अमित शाह तर नाशिक समारोपाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
LIVE BLOG : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच बॅनरवर, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेकडून हा शुभेच्छांचा फलक लावण्यात आलाय @ritvick_ab pic.twitter.com/X5oZoURFyB— ABP माझा (@abpmajhatv) July 23, 2019
महाराष्ट्र काँग्रेसचा तोडगा निघाला पण अजूनही मुंबई काँग्रेसला वाली सापडेना. महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्येही एक अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे अध्यक्षपद कायम राहून एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
भिवंडीतील दापोडा परिसरातील प्रेरणा कंपाऊंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग, गेल्या 9 तासांपासून ही आग धुमसत आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु
मुंबई : वांद्रे पश्चिम एमटीएनएलला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाचे कुलींग ऑपरेशन अजूनही सुरुच, इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, रबर आणि फर्निचर सारखं सामान असल्याने कुलींग ऑपरेशनला वेळ, अजूनही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8-10 गाड्या तैनात, अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत
सोलापूर : कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकराच्या वतीने सोलापुरात उभारण्यात आलेल्या निरीक्षण केंद्रावरुन आज पहिलं टेस्ट फ्लाईट उड्डाण घेणार आहे. सोलापुरातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आलंय. या ठिकाणातून सोलापूरच्या परिसरात कृत्रिम पावसासाठी अनुकूल असणारे ढग आहेत का याचा अभ्यास केला जातोय. हवाई उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानं आज विमान उड्डाण घेईल. पुढील काही दिवस हे निरीक्षण सुरू राहणार असण्याची शक्यता आहे. हे विमान कृत्रिम पाऊस पाडणारे नाहीत तर कृत्रिम पावसासाठी लागणाऱ्या ढगांचा अभ्यास करणारे आहेत.
नाशिक : इगतपुरीजवळ रेल्वे रुळाला तडा, नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅकला तडा, पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस अर्धतास उशिराने रवाना, सकाळी 7 वाजेच्या सुमारास लक्षात आला प्रकार, तत्काळ उपाय योजना केल्यानं सुदैवाने कुठलीही हानी नाही
नागपुरात 44 वर्षीय औषध व्यावसायिक विनोद रामाणी यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ माजली, काल इतवारी परिसरात गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं, विनोद रामाणी त्यांच्या आत्महत्येमुळे नागपूरच्या व्यावसायिक जगतात हळहळ व्यक्त केली जातेय, दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरु
पुणे सातारा रस्त्यावरील कोंढणपूर जवळ ट्रक आणि तीन दुचाकींचा अपघात, अपघातात पुण्यातील तीन तरुणांचा मृत्यू, तर पाच तरुण जखमी
सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे दोन समाजांमध्ये वाद निर्माण करणं आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला मुंबईच्या किला कोर्टाकडून एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, कालची रात्री जेलमध्ये घालवण्यानंतर आज सुटका होणार
पार्श्वभूमी
- काश्मीरच्या मुद्यावर मोदींनी मदत मागितल्याचा ट्रम्प यांचा खोटा दावा, काश्मीरप्रश्नी फक्त द्वीपक्षीय चर्चाच भारतीय परराष्ट्र खात्याचं स्पष्टीकरण
- विश्वासदर्शक ठरावावरुन कर्नाटक विधानसभेत राजकीय नाट्य सुरुच, विधानसभा अध्यक्षांकडून सकाळी 10पर्यंत कार्यवाही स्थगित, आज पुन्हा कामकाज
- यशस्वी प्रक्षेपणानंतर चांद्रयान-2 पृथ्वीच्या कक्षेत, 6 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार, इस्रोच्या कामगिरीचं जगभरातून कौतुक
- लिंगायत समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी हालचाली, 8 दिवसात अहवाल तयार करण्याचे मागासवर्ग आयोगाला आदेश, विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय
- मुंबईतल्या एमटीएनएल इमारतीला लागलेली आग नियंत्रणात, 73 कर्मचाऱ्यांना वाचवणाऱ्या अग्निशमन दलाची कौतुकास्पद कामगिरी, मात्र 1 कोटीचा रोबो ठरला फुसका बार
- महेंद्र सिंह धोनीला सैन्य़ात प्रशिक्षणाची परवानगी, लष्कर प्रमुखांकडून धोनीची विनंती मान्य
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -