LIVE BLOG : बीडीडी चाळींच्या पुनर्विकासावरुन आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
23 Aug 2019 10:49 PM
आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला २७ आॉगस्ट पासून नागपुरातून होणार सुरुवात
औरंगाबाद : कन्नड शहरातील मोंढा बाजारात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या SBI बँकेच्या मुख्य शाखेच्या बाहेर असलेल्या एटीएमला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही
औरंगाबाद : कन्नड शहरातील मोंढा बाजारात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या SBI बँकेच्या मुख्य शाखेच्या बाहेर असलेल्या एटीएमला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही
मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी वरळी, शिवडीतील बीडीडी चाळीच्या प्रश्नांना तोंड फोडलं, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ चार वर्षांपूर्वी फुटला होता, पण पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे मला इथे यावं लागलं, आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला

मुंबई : एअर इंडियाचा इंधन पुरवठा तेल कंपन्यांनी रोखला, कोची, पाटणा, पुणे, विशाखापट्टणम, रांची आणि मोहाली या सहा प्रमुक विमानतळावर एअर इंडियाच्या विमानांना इंधन नाही, थकीत पैसे न फेडल्याने तेल कंपन्यांचा निर्णय
भाजपच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद, आमच्या यात्रेनंतर अनेकांना उत्साह आला : मुख्यमंत्री
LIVE : भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह
LIVE : भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह
मुंबई : शेअर बाजारात 306 अंकांनी घसरण, सेन्सेक्स 36136 अंकांसह पाच महिन्याच्या निचांकी स्तरावर. रुपयाने आठ महिन्यांतील निचांकाची नोंद केली. 36 पैशांच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत रुपया 72.03 वर
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची थोड्याच वेळात चौकशी सुरु होणार
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची थोड्याच वेळात चौकशी सुरु होणार
औरंगाबादच्या जय टॉवर भागांमध्ये रात्री बारानंतर मुख्य पाईपलाईन फुटली आणि त्यामधून हजारो लिटर पाणी वाया गेलं. आधीच औरंगाबादला चार दिवसाआड पाणी येतं, तेही पुरेसं येत नाही. मात्र दुसरीकडे अशाप्रकारे पाण्याची नासाडी होत आहे. रात्री उशिरापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी येथे पोहोचले नव्हते. हे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती आणि पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. कितीही चौकशा करा, माझं तोंड बंद होणार नाही, राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, ईडीकडून तब्बल साडे आठ तास चौकशी, कृष्णकुंजवर कार्यकर्त्यांचा जयघोष
2. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी, सीबीआय कोर्टाचा निर्णय, दिवसातून अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी
3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पाच दिवसांत गुन्हे दाखल करा, मुंबई हायकोर्टाचे ईओडब्ल्यूला आदेश, अजित पवारांसह सर्वपक्षीय बडे नेते अडचणीत
4. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदेंच्या खांद्यावर, काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी निवड
5. चार दिवसाआड पाणी येणाऱ्या औरंगाबादमध्ये पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी रस्त्यावर, पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
6. विराट कोहलीसह टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फ्लॉप, अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या दिवसअखेरीस 6 बाद 203 धावा