LIVE BLOG : 11 वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jul 2019 07:34 PM
मुंबई : बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्टपासून संपावर जाणार, कामगार संघटनेकडून बेस्ट प्रशासनाला पत्र
एमटीएनएल इमारतीत लागलेली आग विझवण्यात रोबो अपयशी
11 वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत सरासरी 1 ते 2 टक्क्यांनी घसरण. दुसऱ्या गुणवत्ता यादीत 1 लाख 7 हजार 785 विद्यार्थ्यांपैकी एकूण 69 हजार 170 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे. यामध्ये 16 हजार 337 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे.
बीड : रिक्षा खड्ड्यात उलटून विद्यार्थ्याचा मृत्यू, लिंबागणेश येथील घटना, अन्य तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु


सोलापूर : कृत्रिम पावसासाठीच्या ढगांच्या निरीक्षणासाठी विमानाचा सराव, डीजीसीएच्या परवानग्या पूर्ण, उद्या सकाळी होणार विमानांचं उड्डाण घेणार, सोलापुरातील केंद्र शासनाच्या निरीक्षण केंद्राचे विमान करणार निरीक्षण
नवी मुंबई हिट अँड रन प्रकरणी 75 वर्षीय हरविंदर मठारु यांना अटक, बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप, अपघातात पाच जणही जखमी
नवी मुंबई हिट अँड रन प्रकरणी 75 वर्षीय हरविंदर मठारु यांना अटक, बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप, अपघातात पाच जणही जखमी
मालेगाव ब्लास्ट 2008 चा खटला आणखीन किती दिवस चालणार? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारला आहे. तसंच
उर्वरित साक्षीदार तपासणीचा अपेक्षित कालावधी तपशीलवार सादर करण्याचे आदेशही हायकोर्टने एनआयएला दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हा खटला जलदगतीने संपवणं बंधनकारक आहे, असंही हायकोर्टाने नमूद केलं.

आतापर्यंत 475 पैकी 124 साक्षीदार तपासून झाल्याची माहिती एनआयएने कोर्टात दिली. तसंच

गोपनीय साक्षीदारांचा तपशील सादर करण्यासाठी एनआयएने अवधी वाढवून मागितला आहे.
93 वं अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये, पत्रकार परिषदेत घोषणा
93 वं अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये, पत्रकार परिषदेत घोषणा
परभणी : दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधीच शासन पैसे देत नाही, त्यातच दूध डेअरीवरील अधिकारी, कर्मचारी प्रोटीन तपासणीत शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या दुधात चुकीचे प्रोटीन असल्याचं सांगून हे दूध परत करत असल्याने आज पाथरीमधील शासकीय दूध डेअरीवर शेतकऱ्यांनी आपल्या गायी वाजतगाजत आणल्या आणि इथेच दूध काढून प्रोटीन तपासणी करा, म्हणत 'दूध काढो' आंदोलन केलं.
आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकुळ, गर्दीचा फायदा घेत अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम केली लंपास
आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकुळ, गर्दीचा फायदा घेत अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम केली लंपास
आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकुळ, गर्दीचा फायदा घेत अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम केली लंपास
रत्नागिरी : गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. हे तीनही पर्यटक बेळगावमधील आहेत. गणेश संकपाळे, मल्लिका संकपाळे, वाद्यंमोडा नाईक अशी या तिघांची नाव आहेत. रविवारी (21 जुलै) संध्याकाळी ही घटना घडली.
नवी मुंबई : कामोठ्यात स्कोडा गाडीची 7 ते 8 वाहनांना धडक, भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, दोघांचा मृत्यू, तर पाच जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु,
कामोठे सेक्टर 6 मधील घटना

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. चांद्रयान-2 च्या प्रेक्षपणाची तयारी पूर्ण, इस्रोच्या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु, श्रीहरिकोटाहून आज दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी प्रक्षेपण

2. विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून 288 जागांसाठी तयारी सुरु, तर शिवसेनेकडूनही  स्वबळाची चाचपणी झाल्याची सूत्रांची माहिती

3. केवळ भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच, भाजप कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

4. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या सरकारचा आज अंतिम फैसला येण्याची शक्यता, कुमारस्वामींकडून सरकार वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु

5. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात वरुणराजाची कृपादृष्टी, औरंगाबाद, नांदेड, बीडसह जळगाव, धुळे, नंदूरबारमध्येही पावसाच्या सरी

6. कधी निवृत्त व्हायचं ते धोनीला ठाऊक आहे; विश्वचषकानंतर पंतला अधिक संधी देण्याचा आमचा प्लॅन, निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांची स्पष्टोक्ती

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.