LIVE BLOG : पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2019 06:39 PM
नाशिक : मखमलाबाद चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडले, पहाटेच्या सुमारास एटीएम फोडून तब्बल 31 लाख रुपये लंपास, दोन दिवसातील दुसरी घटना, पोलिस तपास सुरु
पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश, आयएनएक्स मीडियाप्रकरणी सीबीआय कोर्टाचा निकाल
परभणी : शिवसेना, भाजपमधून मला ऑफर आहेत मात्र मी राष्ट्रवादीमध्येच राहणार,

राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांची जाहीर सभेत अजित पवार,धनंजय मुंडे यांच्यासमोर ग्वाही
मध्य रेल्वे विस्कळीत, कळवा येथील लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त काळ सुरू ठेवल्याने कल्याण-ठाणे वाहतूक पूर्णपणे ठप्प, दोन्ही धीम्या मार्गावरील गाड्या ठप्प, काल देखील याच कारणामुळे मध्य रेल्वे झालेली विस्कळीत, कळवा फाटक गेली 10 वर्षे रखडलेला मुद्दा
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, युतीचे अंबादास दानवे विजयी, एमआयएमकडून शिवसेनेला मतदान
नागपूर शहरात एका रात्रीत हत्येच्या तीन घटना, पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, हसनबाग, दिघोरी घाट, गोंडवाना चौक याठिकाणी हत्येच्या घटना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूर शहरात एका रात्रीत हत्येच्या तीन घटना, पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, हसनबाग, दिघोरी घाट, गोंडवाना चौक याठिकाणी हत्येच्या घटना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. शिवसेनेकडून अंबादास दानवे तर आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी हे निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे 330, महाआघाडीकडे 250 तर एमआयएम आणि अपक्ष मिळून 77 असे 657 मतदार आहेत. 19 तारखेला झालेल्या मतदानात 657 पैकी 647 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एमआयएमच्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. आज एमआयएमच्या मतदारांनी कोणाला मतदान केले हे देखील स्पष्ट होईल. युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या विजयाची शक्यता देखील अधिक वर्तवली जात आहे.

मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात, सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून देशपांडे यांनी काळ्या रंगाचं 'EDiot Hitler' लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं होतं
मुंबई : ईडी कार्यालयाला छावणीचं स्वरूप, ईडी कार्यालयाबाहेर
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पी चिदंबरम यांना आज दुपारी 2 वाजता सीबीआय कोर्टात हजर करणार, सीबीआय 14 दिवसांची कोठडी मागणार
नालासोपाऱ्यात दीड कोटींचं कोकेन जप्त, एक नायजेरियन तरुण अटक तर एकजण फरार, पालघर एटीएस पोलिसांची कारवाई
माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेस सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा 

1. हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात, मोठ्य़ा खाटाटोपानंतर अटक, निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांना जोरदार राडा

2. कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी, चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त

3. नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी कार्यरत, राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राणेंचा गौप्यस्फोट, भाजपप्रवेशासंदर्भात 10 दिवसांत निर्णय घेणार

4.राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, उदयनराजेंसह, महाडीकांच्या नावाची चर्चा, तर भुजबळांच्या सेना प्रवेशाचा सस्पेन्स कायम

5.आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमधला पत्रव्यवहार माझाच्या हाती, राष्ट्रवादीला उल्लेख टाळून काँग्रेसला गर्भित इशारा

6.देशातल्या सर्वात मोठ्या बिस्किट कंपनीला मंदीचा फटका, पार्ले बिस्किट कंपनीतल्या 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.