LIVE BLOG : अरविंद सावंतांच्या उमेदवारीवरुन मिलिंद देवरांचं टीकास्त्र
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचं ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं आहे
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 22 Mar 2019 11:18 PM
पार्श्वभूमी
1. लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणीतून, तर अमित शाह गांधीनगरमधून रिंगणात, लालकृष्ण अडवाणींचा पत्ता कापला2. नागपुरातून नितीन गडकरींच्या नावाची घोषणा, तर नगरमध्ये दिलीप गांधींचं तिकीट...More
1. लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणीतून, तर अमित शाह गांधीनगरमधून रिंगणात, लालकृष्ण अडवाणींचा पत्ता कापला2. नागपुरातून नितीन गडकरींच्या नावाची घोषणा, तर नगरमध्ये दिलीप गांधींचं तिकीट कापत सुजय विखेंना संधी, लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारेंना उमेदवारी3. नालासोपारा बॉम्बब्लास्ट प्रकरणातील वैभव राऊतचं समर्थन केल्यानं सिंधुदुर्गचे काँग्रेस उमेदवार वादात, जितेंद्र आव्हाडांकडून उमेदवारी रद्द करण्याची मागणी4. सांगलीचे प्रतिक पाटील आणि इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्येच राहणार, भाजप प्रवेशाच्या चर्चेला दोन्ही पाटलांकडून पूर्णविराम5. विदर्भ पाठोपाठ मराठवाड्यातल्या काही भागांना गारपिठीचा तडाखा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि नांदेड जिल्ह्यातील गावांचं नुकसान, उभी पिकं आडवी6. बारामुल्ला, बांदीपुरामध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश
शिवसेनेने आपली 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात रामदास आठवले यांनी मागितलेली मुंबईतील एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे आता जिथे-जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील, तिथे तिथे रिपाइं त्यांच्याविरोधात उमेदवार देणार, रिपाइंची अधिकृत घोषणा. कल्याण लोकसभेतही आपण शिवसेनेविरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा रिपाइं जिल्हाध्यक्षांनी केली. रामदास आठवले यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती