LIVE BLOG : अखेर माजी गृहमंत्री पी चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात, मोठ्या गोंधळानंतर दिल्लीत सीबीआयची कारवाई

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Aug 2019 10:32 PM
सीबीआयचे मुख्य संचालक पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानी दाखल, गेल्या दीड तासांपासून देशाच्या राजधानीत हायव्होल्टेज ड्रामा
उमेदवार नसतानाही लोकसभेत जाहीर सभा घेणाऱ्या मनसेला मोठा दिलासा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर काही पक्षांविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली,
आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांना लागू होते, मतदारांना जागरूक करण्यासाठी सभा घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचं हायकोर्टाचं मत
माजी गृहमंत्र्यांच्या अटकेसाठी सीबीआयची धडपड, सीबीआय, ईडीचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरी पोहोचलं, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने करत पोलिसांना धक्काबुक्की
सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा चिदंबरम यांच्या घरात भिंतीवरुन उडी मारुन प्रवेश, कार्यकर्त्यांची घराबाहेर निदर्शने
सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा चिदंबरम यांच्या घरात भिंतीवरुन उडी मारुन प्रवेश, कार्यकर्त्यांचा घराबाहेर निदर्शने
चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली
LIVE UPDATE | चिदंबरम यांच्या घरसमोर हायहोल्टेज ड्रॅामा, गेटवरून उड्या मारून सीबीआयचं पथक घरात जाण्याचा प्रयत्न
सीबीआयची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी दाखल, कुठल्याही क्षणी चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता, चिदंबरम यांना घरातूनच होणार अटक
माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे, गेल्या 27 तासांपासून मी माझ्या वकिलांसोबत खटला लढण्याची तयारी करत होतो : पी. चिदंबरम
माझ्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल नाही, आयएनएक्सप्रकरणी मी कधीही आरोपी नव्हतो, पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम यांचा दावा
तपास यंत्रणांनी कायद्याचं पालन करायला हवं : पी. चिदंबरम
पी. चिदंबरम काँग्रेस कार्यालयात दाखल
पत्रकार परिषदेला सुरुवात
नवी दिल्ली : पी चिदंबरम यांच्यावरील कारवाईवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, मोदी सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतंय, ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केला जातोय

उत्तराखंडमधे पूरग्रस्त भागात मदतकार्य करणारं हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, उत्तरकाशीमधली घटना, वीजपुरवठा करणाऱ्या केबल्समधे अडकून अपघात झाल्याची माहिती
पुणे : कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना माध्यान्ह पोषण आहारातून विषबाधा, सुमारे 20 ते 25 मुलांना विषबाधा, मुलांना उलट्या आणि इतर त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल
नाशिक : जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरांनी फोडलं, 10 लाखांहून अधिक रक्कम लंपास केल्याची शक्यता, पोलीस तपास सुरु

कॉंग्रेसच्या निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीच्या रश्मी बागलही शिवसेनेत
कोल्हापूर : राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीच्या पूररेषा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु, पुरामुळे नागरी वस्तीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, कोल्हापूर महापालिका आयुक्तांचे आदेश
पी चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी
नागपूर : शहर पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल विजय खोडे यांची गळफास लावून आत्महत्या, गंभीर आजारामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरण, पी चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही, दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार
आयएनएक्स घोटाळा प्रकरण, पी चिदंबरम यांच्या वकीलांकडून सुप्रीम कोर्टात विशेष सवलत याचिका दाखल
इंदापूरची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती, या जागेवर जिंकण्याचा राष्ट्रवादीला विश्वास
सातारा : कराडमध्ये मध्यरात्री कुप्रसिद्ध गुंड पवन सोळवंडेवर गोळीबार, 9 गोळ्या छातीत घुसल्याने पवनचा मृत्यू, पवन सोळवंडेवर कराड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल
ड गेम्स 2चा निर्माता आणि दिगदर्शक अनुराग कश्यपविरोधात दिल्लीत दोन पोलीस तक्रारी

पाच ककारापैकी एक 'कडं' समुद्रात फेकल्याच्या सीनमुळेे शीख धर्मियांच्या भावना दुखवल्याचा तक्रारीत उल्लेख

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा 

1. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे  भोसले भाजपात जाणार, सूत्रांची माहिती, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उदयनराजेंमध्ये गोपनीय बैठक

2. शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनंतर शरद पवारांनी छगन भुजबळांना बोलवून घेतलं, मनधरणीच्या प्रयत्नांची शक्यता

3. राज ठाकरेंच्या चौकशीच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याच्या मनसेचा निर्णय मागे, 22 ऑगस्टला शांतता राखण्याचं राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

4.फेसबुक, ट्विटरसह इतर सोशल मीडिया अकाऊंट्स आधारशी संलग्नित करणं गरजेचं, अॅटर्नी जनरल यांचं सुप्रीम कोर्टात विधान, गुगल-यूट्यूबला कोर्टाची नोटीस

5.ग्राहाकांच्या सोयीसाठी कामकाजाच्या वेळा बदलण्याचा बँकांचा प्रस्ताव, तर स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी मोठ्या सवलतींची घोषणा

6. आखाती देशात वापरला जाणाऱ्या थुराया मोबाईलला बेळगावमध्ये रेंज, तपासयंत्रणा बुचकळ्यात, दहशतवादी शिरल्याच्या बातमीनं गांभीर्य वाढलं

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.