LIVE BLOG : जुहू चौपाटीवर 2 महिला समुद्रात बुडाल्या

Advertisement

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jul 2019 11:57 PM
नवी मुंबई - कामोठ्यात स्कोडा गाडीची 7-8 वाहनांना धडक, भरधाव वेगात आलेल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आपघात, अपघातात दोघांचा मृत्यू
Continues below advertisement
जुहू चौपाटीवर 2 महिला समुद्रात बुडाल्या :
जुहू चौपाटीवर आज संध्याकाळच्या वेळी भरतीच्या लाटेत दोन महिला बुडाल्या. माया महेंद्र सिंह आणि निशा कवनपाल सिंह अशी यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माया आणि निशामध्ये नणंद भावजय असे नाते असून त्या दोघी सायन येथील रहिवासी आहेत. रविवारच्या सुट्टीमुळे फिरण्यासाठी त्या दोघी चौपाटीवर गेल्या होत्या.

पार्श्वभूमी

1. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची आज मुंबईत बैठक, जे पी नड्डा, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती, विधानसभेच्या तोंडावर खलबतं होणार

2. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी मनसे निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा, कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ न देण्याचं राज यांच्यापुढे आव्हान

3. तासाभराच्या पावसानं नगरकरांची दाणादाण, रस्त्यांवर कमरेइतकं पाणी तर भोरमध्ये झालेल्या पावसानं पुणे-सातारा महामार्गावर पाण्याचा लोंढा

4. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाचरणी कोट्यवधीचं दान, यंदा 4 कोटी 40 लाखांची देणगी, तर दानपेटीत अमेरिका, युक्रेन, सिंगापूरचंही चलन

5. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास, आज दुपारी अंत्यसंस्कार

6. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज निवड, संघनिवडीआधीच धोनीची माघार, ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.