LIVE BLOG : मुंबईतल्या बहुतांश भागातून गॅस गळती, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकालामधून अग्निशमन विभागाकडे तक्रारी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Sep 2019 11:33 PM
मुंबईतल्या बहुतांश भागातून गॅस गळती, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकालामधून अग्निशमन विभागाकडे तक्रारी, अग्निशमन विभागाच्या गाड्या गळतीच्या ठिकाणी रवाना
मुंबईतल्या बहुतांश भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत आहेत. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून लोक अग्निशमन विभागाकडे संपर्क करत आहेत.
मुंबईतल्या बहुतांश भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत आहेत. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून लोक अग्निशमन विभागाकडे संपर्क करत आहेत.
आघाडीच्या घटक पक्षांची बैठक संपली,
घटक पक्षांची काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी
, काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय प्रभारींची नियुक्ती, मुकुल वासनिक (विदर्भ), राजीव सातव (मराठवाडा), रजनी पाटील (पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण), अविनाश पांडे (मुंबई), आर. सी. खुंटिया (उत्तर महाराष्ट्र) यांची नेमणूक
बीड : परळीचे वैद्यनाथ देवस्थान आता संपूर्ण भारताशी 'कनेक्ट' ; रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत झाला समावेश, खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 22 सप्टेंबरला मुंबईत येणार, 370 कलम संदर्भात भाजप कार्यकर्त्यांसमोर गोरेगावच्या नेस्को मैदानात भाषण, मात्र 22 तारखेलाच युतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता
भिवंडी - पर्यावरण मंत्री रामदास कदमांची प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात धडक कारवाई, सोनाळे परिसरात गुरुदेव कंपाऊंड येथे प्लॅस्टिक पिशव्या बनवणाऱ्या कारखान्यांवर धाड, 10 कारखान्यांविरोधात कारवाई, लाखो टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस मंजूर, कर्मचाऱ्यांना मिळणार 15 हजार रुपये बोनस
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अवैध दारु साठा जप्त, जामनेर तालुक्यातील पाळधी नाचण खेडा येथे कारवाई, दोघांना अटक
मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिट उशिराने
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, मुंबई, ठाणे, कोकण विभागात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. मुंबईत रात्रभर पावसाची संततधार, आज, उद्या अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

1. महाराष्ट्र विधानसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी नरेंद्र मोदी आज नाशकात, निवडणुकांच्या तोंडावर काय घोषणा करणार याकडे लक्ष, महाजनादेश यात्रेचाही समारोप

2. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घ्या, काही राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी, बॅलेट इतिहासजमा झाल्याचं जाहीर करत आयोगाचा विरोधकांना दणका

3. 144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता, माझाच्या तोंडी परीक्षेत दिवाकर रावतेंचं मोठं विधान, तर आदित्य ठाकरेंकडून भाजपनं दिलेल्या आश्वासनाची आठवण

4. परळीत मुंडे भाऊ-बहीण आणि बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांमधली लढत निश्चित, शरद पवारांकडून बीडमधल्या 5 उमेदवारांची घोषणा, तर काँग्रेसचे दिग्गज रिंगणाबाहेरच

5. 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तीवाद पूर्ण करा, अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून वकिलांना डेडलाईन, तर कोर्टाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची अमित शाहांकडून ग्वाही

7. अमेरिका दौऱ्यावर निघालेल्या नरेंद्र मोदींना हवाई हद्द वापरण्यास पाकिस्तानचा नकार, याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही नाकारली होती परवानगी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.