LIVE BLOG : विधानसभेला आपण 144-144 जागा लढू, प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला खुली ऑफर

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Aug 2019 11:11 PM
विधानसभेला 144 जागा तुम्ही लढा 144 जागा आम्ही लढतो,
प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसला खुली ऑफर,
आघाडीमध्ये वंचितला राष्ट्रवादी नको असल्याची सूत्रांची माहिती
मुंबई : प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जाहूर खय्याम यांचं मुंबईत निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 98 टक्के मतदान झाले आहे, शिवसेनेचे अंबादास दानवे तर आघाडीचे बाबुराव कुलकर्णी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही उमेदवारांनी आपापले मतदार अज्ञातस्थळी रवाना केले होते. मतदानात एमआयएम आणि इतर अपक्षांचा कौल कुणाला मिळतो? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शिवसेना भाजपकडे 330 मतं आहेत तर आघाडीकडे 250 मतं, तर एमआयएम अपक्ष मिळून 77 मतं आहेत.
नाशिक : अभिनेता सयाजी शिंदे, स्मिता तांबे यांच्या उपस्थित 22 ऑगस्टला बेल वृक्षांची लागवड करून साजरा करण्यात येणारा बेल महोत्सव महापालिका प्रशासनाने पुढे ढकलला, सप्टेंबर महिन्यात महोत्सव साजरा करण्याचा मनपा प्रशासनाचा निर्णय, स्थायी समितीची बैठक असल्याने कार्यक्रम पुढे ढकलल्याची उद्यान विभाग निरीक्षकांची माहिती
पूरस्थितीबाबत अभ्यास करण्यासाठी नंदकुमार वडणेरे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती गठीत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इन्कम टॅक्स आणि जीएसटी भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्राकडे करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे त्यांना नवीन घर आणि अतिरिक्त एक लाख रुपये देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
कोसळलेल्या आणि उद्ध्वस्त घरांची पुनर्बांधणी करणार, 5 ब्रास वाळू आणि 5 ब्रास मुरूम घर बांधण्यासाठी देणार, पूरग्रस्त कुटुंबियांना 3 महिने मोफत धान्य दिले जाणार : देवेंद्र फडणवीस
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 1 हेक्टरवरील नुकसानावर कर्जमाफ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : शिवसेनेत इनकमिंग सुरुच, काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित हातावर बांधणार शिवबंधन, गावित यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार
मुंबई : शिवसेनेत इनकमिंग सुरुच, काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित हातावर बांधणार शिवबंधन, गावित यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार
नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू,
सिन्नर तालुक्यातील डूबेर गावाजवळील घटना
राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरु, राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा, पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून यात्रेला सुरुवात
मुंबई : अमिताभ बच्चन यांची सांगली, कोल्हापूरच्या पुरग्रस्तांकरता मुख्यमंत्री साहाय्यता निधीला 51 लाखांची मदत, तर रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे 5 कोटींची मदत

रत्नागिरी : खेड रेल्वे स्थानकात मनोरुग्णाची दगडफेक, कोकण रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड, दगडफेकीत एक प्रवासी गंभीर जखमी, पोलिसांनी मनोरुग्णाला ताब्यात घेतलं

शिर्डी : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसला अपघात, आंबी खालसा शिवारातील घटना, चालक आणि वाहक जखमी जखमी, संतप्त प्रवाशांनी बसची काच फोडली
पुण्यात आठ वर्षीय मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या, कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय
डोंबिवलीच्या मधुबन चित्रपटगृहाचं सिलिंग कोसळलं, मिशन मंगल चित्रपट सुरु असताना घडला प्रकार, घटनेत महिला आणि लहान मुलगी झाली जखमी
धुळे एसटी-ट्रक अपघात, मृतांचा आकडा वाढून 15 वर, एसटीकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 हजार तर जखमींना एक हजार रुपये तातडीची मदत
पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेसेवा आजपासून पूर्ववत होणार, प्रवाशांची गैरसोय टळणार, गेल्या 20 दिवासांपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होती

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा 

1. कोहिनूरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीची नोटीस, 22 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, निवडणुकांच्या तोंडावर कारवाई केल्याचा विरोधकांचा आरोप

2. मुंबईत गणेशोत्सवाची लगबग, लाडक्या बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक, तर गोकुळाष्टमीसाठीही दहीहंडीपथकं सज्ज

3. पाकिस्तानशी आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला गर्भीत इशारा, तर कलम370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याची टीका

4. दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना भाजपच्या शाझिया इल्मी भिडल्या, नेटकऱ्य़ांकडून इल्मींवर कौतुकाचा वर्षाव

5. कावळ्यांची नाही तर मावळ्यांची चिंता करा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांचा सल्ला, तर भाजपचं काँग्रेसीकरण सुरु असल्याचा जयंत पाटलांचा टोला

6. योजनेला नावं ठेऊन वृक्षलागवडीसारख्या पवित्र कामाला नावं ठेवू नका, अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रश्नांना सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.